26/08/2026
अभियानाच्या शाळा पाहणीदरम्यान पोलिसांकडून अडवणूक
काटोल तालुका, जि. नागपूर
ग्रामीण भागातील शासकीय शाळांमधील मूलभूत सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी अभियानाची टीम आज काटोल तालुक्यातील लाडगाव येथे शाळा पाहणीसाठी गेली होती.
शाळेची प्रत्यक्ष परिस्थिती जाणून घेण्यासाठी टीम पाहणी करत असताना पोलिसांनी टीमला थांबवून शाळेची पाहणी करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला.
या घटनेनंतरही टीमने शांतता आणि संयम राखत आपला उद्देश स्पष्ट केला. आमचा उपक्रम कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शैक्षणिक व मूलभूत सुविधांची वस्तुनिष्ठ माहिती जाणून घेणे आणि आवश्यक सुधारणा प्रशासनाच्या निदर्शनास