28/02/2026
पिंपळनेर शिवारात कांदा आणि लसूण पिकाच्या आड अफूची बेकायदेशीर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर पोलिसांनी धाड टाकून मोठी कारवाई केली आहे.
या कारवाईत तब्बल ४२ किलो ३५५ ग्रॅम वजनाची अफूची झाडे जप्त करण्यात आली असून त्याची अंदाजे बाजार किंमत १० लाख ५८ हजार ८७५ रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.