25/03/2018
रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरीपासून सुमारे 40 कि.मी. वर गणपतिपुळेकडून जयगडकडे जाताना लागणारं “रीळ” हे अगदी छोटं खेडेगाव ! जेमतेम अडीच हजार लोकांची वस्ती, पाच मंदिरे, दहा वाड्या आणि शांत, स्वच्छ समुद्र किनारा ! याच रीळमध्ये सुमारे 150 वर्षांपूर्वी भिकाजी काणे म्हणजेच बापू खोत यांनी आंब्याची कलमे लावून जगवण्याचा यज्ञ केला. खरंतर तेव्हा व्यावसायिक दृष्टीकोनातून आंबा ह्या फळाचे महत्त्व वाढेल आणि जिथे रस्तेच नाहीत, सुमारे 40 कि.मी. चा परिसर पायी आणि मुंबई पर्यंतचे अंतर बोटीने अशा रीळ मधून तो आंबा खरेदीदारापर्यंत पोहचू शकतो असा विचार करण सुद्धा केवळ धाडस होतं. पण असा विचार करणारे द्रष्टे बापू खोत हे खरोखरच कमालीचे जिद्दी व्यक्तिमत्त्व होतं. त्यांच्या काळात सुमारे 500 आंबा कलमे त्यांनी लावली आणि जगवली. रस्ते आणि सोयीसुविधांचा अभाव यामुळे झाडांना पाणी सुद्धा डोक्यावरून वाहून नेऊन घालावे लागत असे. अशा परिस्थितीतून दूर्दम्य ईच्छाशक्तीवर जगवलेली झाडे बहरत होती आणि बापूंच्या हातांना जोड देणारे भाऊही (त्यांचे चिरंजीव – कमलाकर काणे) आता बापूंच्याच मार्गावरून ध्येयासक्तीने वाटचाल करू लागले. जुनी कलमे तर बहरत होतीच आणि शिवाय नवीन लागवडही सुरू होती आणि जयगडहून बोटींनी जाणा-या आंब्याच्या पेट्यांना आता ट्रक वाहतूक हा पर्यायही उपलब्ध झाला होता. वाशी मार्केट हा एक महत्त्वाचा दलालांकरवी विक्री करण्याचा पर्याय होता. अर्थात एकमेव पर्याय होता.
कलमांची संख्या तर वाढत होतीच, त्याचबरोबर कलमांची निगा राखण्याच कामही अभ्यासपूर्वक चालू होते. बापूंनंतर भाऊंनीही ज्या जिद्दीने आंबा व्यवसायाचा व्याप वाढवीला होता त्यांच्या प्रयत्नांना यशस्वी साथ दिली त्यांचे पुत्र अण्णा (दिगंबर काणे) ह्यांनी आणि अण्णांच्या व्यावसायिक कारकीर्दीच्या सुरूवातीच्या टप्प्यावर आंबा प्रोसेसिंग युनीटचा एक वेगळा पण समर्थ पर्याय निर्माण करण्याचा विचार त्यांनी केला. 1978 साली RIL या ब्रॅण्डने Alphonso Mango Pulp चे Tin मार्केटमध्ये आले. आता आंबा विक्री आणि आंबा कॅनिंग असे दोन्ही व्यवसाय स्थानिकांना रोजगारही उपलब्ध करून देत होते.
जुन्या कलमांची निगराणी, पोषण, कलमांची संख्या वाढ, आंब्याचा दर्जा सुधारण्यासाठीचे विशेष प्रयत्न, Mango Pulp चे उत्पादन आणि त्याची क्वालिटी, स्वतःबरोबरच कामगारांचीही आर्थिक उन्नती या सर्वच आघाड्यांवर अण्णा यशस्वी मेहनत घेत होते. 2007-08 च्या सुमारास मनोज, मकरंद हे दोघे अण्णांचे चिरंजीव याच व्यवसायात उतरले आणि कोकणातून मुंबई-पुण्याकडे नोकरीसाठी स्थलांतर करण्यापेक्षा खेड्यात राहूनच आंबा बागायती आणि शेती या वडिलोपार्जित चालत आलेल्या व्यवसायात वृद्धी करू या ध्येयासक्तीने दोघांनी नेटाने प्रयत्न सुरू केले. याचीच फलश्रुती म्हणून RIL Fruit Canning Industry चे रूपांतर BEST मध्ये झाले, Product Range वाढली. Mango Pulp Canning बरोबरच Snacks, Syrups, पीठं आणि विविध कोकण उत्पादने यांचे Production आणि Marketing जोरात होऊ लागले. त्याचबरोबर GreenKy Agro Exports या ब्रॅण्डच्या माध्यमातून आता आंबा पुण्यात स्वतःच्याच वितरण व्यवस्थापनातून थेट गि-हाईकापर्यंत पोहोचण्याचा महत्त्वाचा टप्पा गाठला गेला.
आंबा सगळ्यांच लाडक फळ ! लहानांपासून वयस्करांपर्यंत आंबा आवडत नाही असे सापडणे विरळाच ! त्यात रत्नागिरी हापूस आंब्याच तर विशेष कौतुक आणि प्रत्येकाच्या मनात स्थानही आहे. कमी वेळेत जास्त पैसे मिळवण्यासाठी बाजारात विक्रेत्यांकडून काही चूकीच्या गोष्टी आमलात आणल्या जातात. जसे की कोणताही आंबा रत्नागिरी हापूस म्हणून विकणे किंवा वेळे आधी अनैसर्गिक पद्धतीने केमिकल्सचा वापर करून आंबा पिकविणे किंवा फळांची लाग जास्त यावी यासाठी अमाप केमिकल्सचा वापर इत्यादि. या किंवा यासारख्या अनारोग्य निर्माण करणा-या गोष्टींपासून गि-हाईकाची फसवणूक होऊ नये आणि अस्सल दर्जेदार रत्नागिरी हापूस अतिशय रास्त दरात थेट गि-हाईकापर्यंत पोहोचवावा अशा सद्हेतुने सुरू केलेले GreenKy Mango House यशस्वी ठरले आणि पुणेकरांच्या पसंतीस उतरले. व्यवसायातील सचोटी, विश्वास या मूल्यांवर आधारीत चालत आलेला काणे कुटुंबाचा व्यवसाय पुण्यातही विस्तारत आहे. मुंबई (वाशी मार्केट), पुणे, सांगली, कोल्हापूर, अहमदाबाद (गुजरात) अशा विविध ठीकाणी GreenKy Agro Exports रत्नागिरी हापूस आंबा उपलब्ध होतो.
फळांचा राजा, आंबा आता लपकरच येत आहे तुमच्या भेटीला, नैसर्गिकरीत्या पिकविलेला, अवीट गोडीचा हापूस आंबा आम्ही अगदी माफक दरात उपलब्ध करत आहोत ! आता आमच्या प्रचत्नांना फक्त तुमची साथ हवी आहे ! मग येताय ना आंबा खरेदीला.....
GreenKy Mango House
Shop No. 21, C Wing, Rohan Prarthana, Near Gandhi Bhavan, Kothrud, Pune
Mrs. Medha Vaidya 9822688288, 9422508501