25/09/2026
तुम्ही साहिलची गुणवत्ता सांगा.... ........ साहिल वाकोडे.....
वर्ग दहावी - 90 %
वर्ग बारावी - 76 % (विज्ञान शाखा)
जेईई - 614 वी रँक ( ही ऑल इंडिया रँक आहे... कॅटेगरी नुसार नाही अथवा आरक्षण नुसार नाही... सामान्यतः 14 लाख विद्यार्थ्यांमध्ये ही रँक मिळविली होती... म्हणून त्याला IIT Bombay मध्ये प्रवेश मिळाला होता... )
IIT Bombay मध्ये त्याचा मागील वर्षीचा CGPA 8.5 होता ( हा IIT Bombay ने दिलेला CGPA आहे... ) CGPA म्हणजे क्युम्युलेटिव्ह ग्रेड पॉईंट एव्हरेज (Cumulative Grade Point Average) संचित श्रेणी गुण सरासरी... CGPA च्या स्केलवर जास्तीत जास्त 10 पॉईंट असतात... म्हणजे साहिलने 10 पैकी 8.5 एवढा मोठा CGPA प्राप्त केला होता...
CGPA चे त्या वर्षाच्या टक्केवारीत रूपांतरण करण्यासाठी त्याला 9.5 ने गुणावे लागत असते... म्हणजे साहील ने IIT Bombay मध्ये मागील वर्षी 8.5 × 9.5 = 80.75 % एवढे टक्के मिळविले होते... अशी टक्केवारी भारतातील सर्व IIT मधील सर्वोत्तम विद्यार्थीच मिळवित आले हा इतिहास आहे...
आज भारतातील सर्व मिडीया आणि त्याहीपेक्षा जास्त आरक्षण विरोधी , शेंडीवाले आणि राजकीय PR team वाले प्रोफेसर सूर्यनारायण डुल्ला चे शिक्षण, पदव्या , संशोधन , पुरस्कार आणि बरचं काही सांगण्यात व्यस्त आहेत.... माञ साहिल च्या गुणवत्तेवर कुणी बोलायला तयारच नाही...
बरं हे काही नवीन नाही..भारतात अगदी अगोदरपासूनच शिक्षणाच्या नावावर जातीवाद्यांकडुन जातीवाद , भेदभाव , उचनिचता हे सर्व पोसण्यात आलं... त्यावेळी ते खुलेआम व्हायचं तर आता छुप्या पध्दतीने होते एवढाच फरक आहे....
आज ते छुप्या पध्दतीने होते म्हणून सिध्द करावे लागते , त्याची चौकशी करावी लागते आणि यासर्व बाबीत जातींचे शोधकार्य अथवा आरक्षणाचे दाखले एवढे दिले जातात की मुळ विषय मागे पडुन संपुर्ण प्रकरण धुळ खात पडते अथवा न्यायासाठी धडपडणारे न्यायाच्या प्रतीक्षेत थोडे थोडे मरत राहतात... https://www.facebook.com/shikshakmitraa
आजमाञ प्रोफेसर सूर्यनारायण डुल्ला च्या विविध पदव्यांच्या कागदांच्या , संशोधनाच्या , पुरस्काराच्या खाली साहिलची गुणवत्ता आणि त्याची हत्या लपविण्यासाठी येथील आरक्षण विरोधी , वर्णव्यवस्थावादी , मनुवादी लोक प्रयत्न करत आहेत...
माञ
ते प्रोफेसर डुल्ला चे शिक्षण, पदव्या,पुरस्कार सांगतील
तुम्ही साहिल ची गुणवत्ता जगाला सांगा...
आपल्या देशातील सर्वात मोठा आतंकवाद हा जातीयवाद आहे.