कोकण वार्ता

कोकण वार्ता social media news network

✨आई हा नवीन मराठी काव्यसंग्रह आता उपलब्ध💥 घरपोच ऑर्डर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या ऑनलाइन लिंक वर क्लिक करून आपली ऑर्डर आज...
10/07/2026

✨आई हा नवीन मराठी काव्यसंग्रह आता उपलब्ध💥 घरपोच ऑर्डर मिळवण्यासाठी खाली दिलेल्या ऑनलाइन लिंक वर क्लिक करून आपली ऑर्डर आजच बुक करा.

👇🏻
Amazon: https://amzn.in/d/04gy5A6I

Flipkart: https://www.flipkart.com/product/p/itme?pid=9789376861538

Astitva Store: https://astitvaprakashan.com/product/aai/

Classic Shelf: https://classicshelf.in/products/aai

आजच आपला कोर्स प्रवेश निश्चित करा 🏃
27/05/2026

आजच आपला कोर्स प्रवेश निश्चित करा 🏃

25/01/2025

🟠📶फुणगूसच्या युवा कार्यकर्त्यांनी BSNL टॉवर चे रखडलेले काम चालू करण्याबाबत पालकमंत्री श्री उदय सामंत यांना सामाजिक कार्यकर्ते सुभाष लांजेकर तसेच साईम खान, अफाक बोदले, परवेझ नाईक यांनी दिले निवेदन.

त्याचं प्रमाणे या टॉवर संदर्भात BSNL च्या जनसंपर्क अधिकारी श्रीमती दीप्ती पंडित यांना देखील निवेदन देण्यात आले.

🪩 कोकण वार्ता मराठी न्यूज 🖊️

22/01/2025

💥💥 *ब्रेकींग बातमी*

🔵दहावीच्या विद्यार्थ्यांना २० जानेवारीला हॉल तिकीट मिळणार; बोर्डाने केले जाहीर.

◾पुणे- फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात १० आणि १२ वीच्या परीक्षा होणार आहेत. या परीक्षांचे हॉलतिकिट कधी मिळणार याबाबत पालक व विद्यार्थ्यांना प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा संपली आहे. पुढील दोन दिवसांत मुलांना हॉलतिकीट मिळणार आहे. दहावी बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट येत्या सोमवारी म्हणजेच २० जानेवारीला ऑनलाईन दिली जाणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावीच्या परीक्षेचं हॉल तिकीट सोमवारपासून उपलब्ध होणार आहे. शाळेला हे हॉल तिकीट प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावे लागणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क लागणार नाही असे राज्य शिक्षण मंडळानं स्पष्ट केलं आहे. राज्य मंडळातर्फे दहावीची लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्च दरम्यान, होणार आहे. या परीक्षेसाठी www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीनं विद्यार्थ्यांचं हॉल तिकीट उपलब्ध करून दिले जाणार आहे.

#कोकणवार्तामराठीन्यूज

🪩 कोकण वार्ता मराठी न्यूज 🖊️

17/01/2025

◾जिल्हास्तरीय स्पर्धेत पाली कुस्ती केंद्रातील नऊ कुस्तीपटूना सुवर्णपदक

◾रत्नागिरी राज्य क्रिडादिनानिमित जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत जिल्हा कुस्ती असोसिएशनने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद व निवड चाचणी कुस्ती स्पर्धेत स्वप्निल घडशी यांच्या मार्गदर्शनाखाली पाली कुस्ती केंद्रातील तब्बल नऊ कुस्तीपटूंनी सुवर्ण पदक पटकावली आहेत..

रत्नागिरीत पार पडलेल्या जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत पाली कुस्ती केंद्रातील नऊ खेळाडूंनी सहभाग घेतला होता. सर्व खेळाडू स्वप्निल घडशी यांच्या मार्गदर्शनाखाली पाली येथे कुस्ती सराव करतात. नियमित व्यायाम व सरावामुळे सर्व खेळाडूंनी सुवर्ण पदकाला गवसणी घातली. यामध्ये महाराष्ट्र केसरीसाठी अतुल गराटे (६५ किलो) भावेश सावंत (५७ किलो) साहिल खटकूळ (79 किलो) तर कुमार गटात
कीर्ती सावंत (५५ किलो), वेदांत नागले (५५ किलो), गौरव नागले (७१ किलो), वरद ताम्हणकर (८० किलो), दुर्वांक नागले (११० किलो), महिला गटात सायली यादव ५५ किलो या विजेत्या खेळाडूंचा समावेश आहे. या सर्वांची निवड राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी करण्यात आली आहे

🪩 कोकण वार्ता मराठी न्यूज 🖊️.

◾मारळ येथे श्री देव मार्लेश्वर यात्रोत्सवानिमित्त आमदार शेखर निकम यांची सदिच्छा भेट व मार्लेश्वर देवाचे घेतले दर्शन◾देवर...
14/01/2025

◾मारळ येथे श्री देव मार्लेश्वर यात्रोत्सवानिमित्त आमदार शेखर निकम यांची सदिच्छा भेट व मार्लेश्वर देवाचे घेतले दर्शन

◾देवरुख-* संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावातील ऐतिहासिक व पवित्र श्री देव मार्लेश्वर मंदिरात आमदार शेखर निकम यांनी सपत्नीक उपस्थिती दर्शवून मनोभावे पूजा केली. देव मार्लेश्वर यांना अभिषेक करून त्यांनी मतदारसंघातील सर्व जनतेला सुख-समाधान आणि भरभराट लाभावी, तसेच त्यांच्या कार्यकाळात मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी शक्ती मिळावी, असा आशीर्वाद मागितला.

यावेळी मार्लेश्वर मंदिर समिती व ग्रामस्थांनी आमदार शेखर निकम यांचा यथोचित सत्कार केला. आमदार शेखर निकम यांनी यात्रोत्सवात सहभागी भाविकांशी संवाद साधत त्यांचे सुख-दु:ख जाणून घेतले. त्यांनी ग्रामस्थांकडून मार्लेश्वर परिसरातील विकासात्मक गरजांविषयी माहिती घेतली आणि यावर सकारात्मक चर्चा केली. यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा, भाविकांसाठी निवास व्यवस्था, आणि इतर सुविधांबाबत मार्गदर्शन केले.

यानंतर, आमदार शेखर निकम यांनी श्री देव मार्लेश्वर मठाला भेट दिली. त्यांनी मठाच्या विकासकामांवर सविस्तर चर्चा करत भाविकांसाठी आवश्यक सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. यात्रोत्सवात सहभागी झालेले असंख्य भाविक, स्थानिक पदाधिकारी, व कार्यकर्त्यांनी आमदार शेखर निकम यांचे स्वागत केले. मार्लेश्वर यात्रोत्सव हा ग्रामस्थांसाठी आणि भाविकांसाठी एक पवित्र व हृदयस्पर्शी सोहळा असल्याचे आमदार निकम यांनी नमूद केले. श्री देव मार्लेश्वराच्या आशीर्वादाने या पवित्र भूमीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन आमदार शेखर निकम यांनी दिले.

#कोकणवार्तामराठीन्यूज

🪩 कोकण वार्ता मराठी न्यूज 🖊️

12/01/2025

#राष्ट्रीय_युवा_दिवस
भारत सरकारने १९८५ मध्ये १२ जानेवारी या दिवसाला ‘राष्ट्रीय युवा दिन’ म्हणून साजरा करायचे ठरवले.
या दिवसाला असं काय महत्व आहे? तर हा दिवस म्हणजे #स्वामी_विवेकानंद यांची जयंती.
” उठा, जागे व्हा आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुम्हाला तुमचे ध्येय मिळत नाही” हा संदेश स्वामी विवेकानंद यांनी तरुणांना दिला.
स्वामी विवेकानंद म्हणजे योद्धा, संन्यासी, आणि तरुण पिढीचे अखंड प्रेरणास्रोत, ज्यांनी फक्त भारतातल्या युवा पिढि समोरच आदर्श नाही तर संपूर्ण जगातल्या युवा पिढीसमोर आदर्श ठेवला. सगळे देश भारताकडे मोठ्या आशेने बघतो आहे. का तर ? कारण भारत एक संधीचा देश आहे, या देशात अनेक संधी आज वाट बघत आहेत. जग भारताकडे आशेने बघते आहे कारण आज आपला देश सर्वात तरुण देश आहे. ज्या देशाची ६५ टक्के लोकसंख्या तरुण असेल, ३५ वर्षांच्या आतली असेल, तो देश किती भाग्यवान आहे, आमच्याकडे आज कोटी कोटी युवा जनता आहे. आणि जिथे ही तरुणाई असते न, तिथे संकल्पाना काही सीमा नसतात, बंधने नसतात. कधी कधी आपल्या देशात युवकांच्या वेगवेगळ्या व्याख्या ऐकायला मिळतात. शास्त्रापासून आजपर्यंत तरुणाईच्या अनेक व्याख्या झाल्या आहेत. प्रत्येकाचा आपापला दृष्टीकोन असतो, अनेकांना वय हेच तारुण्याची ओळख आहे असे वाटते. युवापिढी म्हणजे नव्या विचारांची आणि आधुनिकतेची सांगड घालून आपले म्हणणे समाजापुढे मांडणारी नव्या जोशाची पिढी. खरं पाहता आपल्याला विविध प्रकारच्या क्षेत्रात चांगले यश पादाक्रांत करण्याची सुवर्ण संधी आणि पुरेसा वेळ आहे. भारताच्या एकुण लोकसंख्येपैकी तरुणांची संख्या अधिक आहे.तरूण म्हणजे प्रचंड उत्साह, काहीतरी करून दाखवण्याची धडपड, तरुण म्हणजे प्रचंड जोश,तरुण म्हणजे अफाट इच्छाशक्ती….अशी कितीतरी विशेषण तरुणांना लागू पडतात. जगात तरुणांची संख्या अधिक आहे, त्यामुळे विविध तंत्रज्ञानात तरुणांची भरारी विलक्षणीय आहे. कधी तरुणाईचे पाऊल भलत्याच दिशेने पडताना दिसत आहे. त्याच कारण म्हणजे व्यसनाधीनता, चंगळवाद ,सोशल मिडीयाचा अतिरेक. ही तरुणपिढीला लागलेली वाळवी आहे. कुठल्याही देशाची प्रगती ही तिथल्या तरुणांवर अवलंबून असते त्यामुळे आपल्या देशाला भक्कम आधार आपण तरुणच देऊ शकतो हे प्रत्येकाने ध्यानात घेणे गरजेचे आहे. विशेषतः भारताचं सरासरी वय हे २५ आहे. त्यामुळे भारत जगातील सर्वात तरुण देश ठरतो.
आजच्या युवा दिवसाच्या शुभेच्छा.

🪩 मराठी न्यूज मराठी न्यूज 🖊️

🔵🔴*पिवळे केशरी आणि पांढरे रेशन कार्ड होणार आता हद्दपार* ◾पिवळ्या पांढऱ्या आणि केशरी रेशन कार्डची छपाई राज्य सरकारने केली...
10/01/2025

🔵🔴*पिवळे केशरी आणि पांढरे रेशन कार्ड होणार आता हद्दपार*

◾पिवळ्या पांढऱ्या आणि केशरी रेशन कार्डची छपाई राज्य सरकारने केली बंद.भविष्यात आता अशी रेशन कार्ड दिसणार नाहीत. ज्या रेशन कार्डचे पाच ते सहा पेज असायचे त्यावर लाभार्थ्यांनी किती धान्य घेतले आहे हे समजायचे परंतु आता या शिधापत्रिकेचे रूपांतर ई शिधापत्रिकेमध्ये होणार आहे. अशी माहिती सूत्रानुसार सांगण्यात आली आहे.माहितीनुसार आतापर्यंत लाभार्थ्यांकडून ई पॉज द्वारे थम देऊन वितरित केलेल्या मालाची रेशन कार्डावरून नोंद घेतली जात होती. पण आता ई पॉज आल्यामुळे ते थम दिल्याचे ऑनलाईन आपल्याला दिसून येतात. त्यामुळे शासनाने ही जुनी पिवळी, पांढरी, केशरी, शिधापत्रिका बंद केलेली आहे. आता नवीन लाभार्थ्यांना नवीन ई शिधापत्रिका मिळणार आहेत .ही शिधापत्रिका कुठल्याही सरकारी दवाखान्यात जे कार्ड दाखवून लाभ घेता येतात.ते लाभ या ई शिधापत्रिकावर देखील मिळणार आहेत. ही नवीन शिधापत्रिका एका पानाची असणार असून या नवीन रेशन कार्ड मध्ये कॉलम असणार आहेत. त्या कॉलम नुसार कुठला लाभार्थी कुठल्या योजनेत बसतो हे समजणार आहे. नवीन ई पॉज शिधापत्रिकेंमुळे कुठलीही अडचण येणार नाही. पण जयांच्याकडे जुनी रेशन कार्ड आहेत ते नागरिक पूर्वीची रेशन कार्ड वापरू शकणार आहेत. पण नवीन जे रेशन कार्ड काढणार आहेत.त्यांना आता नवीन ई शिधापत्रिका मिळणार आहेत. महाराष्ट्रात सर्वांनाच आता इथून पुढे नवीन स्वरूपातील ई शिधापत्रिका मिळणार आहेत. सध्या याचा वितरण नागपूर जिल्ह्यामध्ये सुरू झालेला आहे. 🪩👏💻🔥🎉

Address

Ratnagiri

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when कोकण वार्ता posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share