Solapur City News

Solapur City News महाराष्ट्रासह देशभरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या Youtube चॅनेलला subscribe करा

सोलापूरात मुख्यमंत्र्यांच्या गाडीची स्टेअरिंग आमदार देवेंद्र कोठेंच्या हाती; सोशल मीडियावर देवेंद्रदादा चर्चेतसोलापूर - ...
28/04/2026

सोलापूरात मुख्यमंत्र्यांच्या गाडीची स्टेअरिंग आमदार देवेंद्र कोठेंच्या हाती; सोशल मीडियावर देवेंद्रदादा चर्चेत

सोलापूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळ्यानंतर विमानतळाला जाताना मुख्यमंत्र्यांच्या गाडीचे सारथ्य आमदार देवेंद्र कोठे यांनी केले.

सोलापूर शहराच्या विकासाचा विचार करून विकासकामांसाठी सातत्याने प्रयत्नशील असलेल्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ठामपणे उभे असल्याचे अनेकदा दिसून आले आहे. मंगळवारी झालेल्या सभेतही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देवेंद्र कोठे यांचे कौतुक केले. आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून प्रयत्न केलेल्या विकासकामांना गती देण्याची ग्वाही देखील भाषणातून दिली. सभेनंतर सोलापूर विमानतळाला जाताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्या गाडीतून प्रवास केला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, माजी आमदार राम सातपुते गाडीत होते.

देशमुख कुटुंबीय-फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा; शहरातील प्रश्नांवर सविस्तर संवादसोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
28/04/2026

देशमुख कुटुंबीय-फडणवीस यांच्यात बंद दाराआड चर्चा; शहरातील प्रश्नांवर सविस्तर संवाद
सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी सभेपूर्वी आमदार सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या भेटीमुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली.
मुख्यमंत्री फडणवीस हे बार्शी येथील भगवंताच्या महापूजेनंतर हेलिकॉप्टरद्वारे सोलापूर विमानतळावर दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी थेट देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी बाजार समितीचे संचालक मनीष देशमुख तसेच भाजपचे युवा नेते रोहन देशमुख यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचा सत्कार करून स्वागत केले.
यानंतर बंद दाराआड झालेल्या बैठकीत आमदार सुभाष देशमुख, मनीष देशमुख, रोहन देशमुख आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यात सुमारे १५ ते २० मिनिटे सविस्तर चर्चा झाली. या चर्चेत सोलापूर शहरातील प्रलंबित प्रश्न, विविध विकासकामांची गती, पायाभूत सुविधांशी संबंधित मुद्दे तसेच स्थानिक राजकीय घडामोडींवर सखोल विचारविनिमय झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
विशेष म्हणजे, ही भेट कोणत्याही अधिकृत कार्यक्रमाचा भाग नसल्याने तिचे महत्त्व अधिक वाढले आहे. बंद दाराआड झालेल्या चर्चेतील मुद्दे गोपनीय ठेवण्यात आले आहेत
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या भेटीमुळे सोलापूरच्या राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण आले असून, देशमुख कुटुंबीयांच्या राजकीय हालचालींवरही सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे. आगामी काळात या भेटीचे परिणाम काय दिसून येतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सोलापूरच्या तापमानात ०.२ अंशाने घट ;मात्र उष्णतेची लाट कायम सोलापूर- ​पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज (एप्रिल अखेरपर्यं...
28/04/2026

सोलापूरच्या तापमानात ०.२ अंशाने घट ;मात्र उष्णतेची लाट कायम
सोलापूर- ​पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज (एप्रिल अखेरपर्यंत) ​तापमान स्थिती: हवामान अंदाजानुसार, एप्रिल अखेरपर्यंत सोलापूरचे कमाल तापमान ४३°C ते ४५°C च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. जरी आज तापमानात ०.२ ने घट झाली असली, तरी हे बदल स्थानिक वाऱ्यांमुळे असू शकतात मुख्यत्वेकरून उष्णतेची तीव्रता कायम राहील.
​उष्णतेची लाट जेव्हा एखाद्या ठिकाणचे तापमान सरासरीपेक्षा ४.५°C ते ६.४°C ने जास्त असते, तेव्हा त्याला 'उष्णतेची लाट' मानले जाते. सोलापूरसाठी सध्याची स्थिती ही तीव्र उष्णतेच्या लाटेची आहे. ही स्थिती किमान ५ मे पर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. ​रात्रीचे तापमान किमान तापमान २८.०°C असणे याचा अर्थ रात्रीदेखील हवा गरम राहणार आहे, ज्यामुळे शरीराला नैसर्गिकरित्या थंड होण्यास पुरेसा वेळ मिळणार नाही.
​उष्णतेच्या लाटेत घ्यायची काळजी.
​अशा कडक उन्हात स्वतःचे संरक्षण करण्यासाठी खालील उपाय अत्यंत आवश्यक आहेत ​तहान लागलेली नसली तरीही पुरेसे पाणी प्या. ​ओआरएस लिंबू सरबत, ताक, शहाळे किंवा घरगुती पन्हे यांसारख्या पेयांचा वापर वाढवा. यामुळे शरीरातील क्षार टिकून राहतात. ​अल्कोहोल, चहा, कॉफी आणि साखरयुक्त पेये टाळा, कारण यामुळे शरीरातील पाणी लवकर कमी होते.
प्रवासाचे आणि कामाचे नियोजन.
​दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळा.
​जर बाहेर जाणे अनिवार्य असेल, तर डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा. ​हलक्या रंगाचे, सैल आणि सुती कपडे वापरा. आहार घेताना ​तळलेले आणि जास्त मसालेदार पदार्थ खाणे टाळा. ​प्रथिनेयुक्त आहार कमी करा, कारण तो पचताना शरीरात अधिक उष्णता निर्माण होते.
​ताजी फळे आणि पालेभाज्यांचा समावेश करा.
​ घर थंड ठेवण्यासाठी उपाय​ दिवसा खिडक्या आणि पडदे बंद ठेवा जेणेकरून बाहेरची गरम हवा आत येणार नाही. रात्री तापमान कमी झाल्यावर खिडक्या उघडा. ​खसचे पडदे किंवा कुलरचा वापर करताना त्यात पुरेसे पाणी असेल याची खात्री करा. गंभीर लक्षणे ओळखा ​जर कोणाला चक्कर येणे, खूप ताप येणे, उलट्या होणे किंवा डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर तो उष्माघाताचा प्रकार असू शकतो. अशा वेळी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. ​सोलापूरमधील सध्याचे तापमान पाहता, विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.

28/04/2026

उजनी धरण :-
दैनिक पर्जन्यमापक -
दिनांक - २८/०४/२०२६ रोजी सकाळी ६.०० वाजता
यावर्षी उपलब्ध पाणी
👉🏻उपलब्धता- (प्लस) 15.22%

मागील वर्षी :-
👉🏻उपलब्धता- (मायनस) 12.98%

सोलापूर अन्नधान्य वितरण कार्यालयाचे आणखी एक गैरप्रकरण उघडकीसप्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे पुन्हा एकदा वादा...
27/04/2026

सोलापूर अन्नधान्य वितरण कार्यालयाचे आणखी एक गैरप्रकरण उघडकीस
प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात
सोलापूर - आपल्या प्रशासकीय सेवेत शिस्तप्रिय राखून अवैधरित्या गॅस चालविणाऱ्या व रास्त भाव दुकानदार अश्या अनेकांचे धाबे दणाणून सोडणारे प्रभारी अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे हे आता स्वतःच्या अधिकाराचा गैरप्रकार करत कालच प्रसार माध्यमातून एक प्रकरण उघडकीस येतो ना येतो,तोच पुन्हा एक प्रकरण चव्हाट्यावर येऊन धडकला आहे. जुळे सोलापुरातील आणखी एका रास्त भाव धान्य दुकान असलेल्या संस्थेने आपले दुकान अशोक चौक भागात स्थलांतर करुन मिळावे असा अर्ज अन्नधान्य वितरण कार्यालयात दाखल केला. मूळ अर्जात जुळे सोलापूर पासून अशोक चौक परिसर हे २ किलोमीटर अंतरावर असल्याचे नमूद केले, त्याप्रमाणे संबंधित पुरवठा निरीक्षकांनी सदर मागणी नियमबाह्य असल्याचे अहवाल वरिष्ठ कार्यालय असलेल्या अन्नधान्य वितरण अधिकारी ह्यांच्याकडे सादर करण्यात आले. त्याप्रमाणे वरिष्ठ कार्यालयाकडून सदर प्रकरण फेटाळण्यात आले. त्या अनुषंगाने संबंधित संस्थेने उपायुक्त कार्यालय पुरवठा विभाग पुणे येथे अपिल अर्ज दाखल केला. तिथेही त्यांचा अर्ज फेटाळला गेला, तदनंतर सदर संस्थेने अन्न व नागरिक पुरवठा मंत्री, मुबंई मंत्रालयात पुन्हा अपिल अर्ज करण्यात आले. तिथूनही फेरचौकशी होऊन मंत्री महोदयाच्या आदेशात सध्यास्थितीत असलेल्या दुकानापासून २ किलोमीटर पर्यत असलेल्या जागेत पाहणी करुन, संस्थेच्या मागणी नुसार आसपास च्या दुकानातून अपात्र शिधापत्रिका संबंधित दुकानास जोडण्यात यावे त्याप्रमाणे आदेशाचे पालन करावे असे स्पष्ट उल्लेख असताना देखील चक्क प्रभारी अन्न धान्य वितरण अधिकारी असलेले ओंकार पडोळे ह्यांनी दस्तुरखुद्द अन्न व नागरिक पुरवठा मंत्री मंत्रालय मुबंई ह्यांच्या आदेशाला फाटा देत जुळे सोलापूर पासून २ किलोमीटर अंतर न पाहता जवळपास ५ किलोमीटर असलेल्या अंतरावर दुकानाची मंजुरी दिले.त्याच प्रमाणे संबंधित दुकानास आसपास असलेल्या दुकानातून अपात्र असलेल्या शिधापत्रिकाधारकांना दुकानात पात्र म्हणून जोडण्यात यावे असा चक्क बेकायदेशीर सूचना संबंधित कार्यालयास दिले. आसपास असलेल्या दुकानात जे अपात्र शिधापत्रिका धारक आहेत त्यांचे उत्पन्न ५९,०००/- हजार च्या वर असलेल्यामूळेच अपात्र ठरविलेले असतानाही त्यांना अन्न सुरक्षा लाभार्थी योजनेत समाविष्ठ करण्यासाठी मोघलशाही फर्मान सोडण्यात आले. ह्यावरून प्रभारी असलेले अन्न धान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे आपल्या अधिकाराचा गैरवापर केलाचा पुन्हा एकदा स्पष्ट होताना दिसत आहे. कालच अश्याच एका बेकायदेशीर प्रकरण समोर येत पडोळे ह्यांनी आपल्या चुकीच्या कार्य पद्धतीचा खाते उघडल्याने आता हे दुसरे प्रकरण समोर आल्याने आणखी किती प्रकरण समोर येणार ह्याची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. आता ह्याकडे जिल्हाधिकारी लक्ष देणार का ह्याकडे लक्ष वेधून आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या भाजपाच्या विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळ्याची तयारी पूर्णआमदार देवे...
27/04/2026

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या भाजपाच्या विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळ्याची तयारी पूर्ण

आमदार देवेंद्र कोठे यांनी पोलीस प्रशासना समवेत केली तयारीची पाहणी : विजयी मेळावा आणि कृतज्ञता सोहळ्यात सहभागी होण्याचे सोलापूरकरांना आवाहन

सोलापूर - भारतीय जनता पार्टीतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मंगळवारी दुपारी १२ वाजता होणाऱ्या विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे. सोमवारी सायंकाळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण, महापालिकेचे सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी पोलीस प्रशासनासमवेत सभेच्या स्थळाची पाहणी केली.

यावेळी पोलीस उपायुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, पोलीस उपायुक्त गौहर हसन, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर खिरडकर, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त पंडित, सदर बझार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर उपस्थित होते.

आमदार देवेंद्र कोठे याप्रसंगी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरकरांना दिलेल्या शब्दानुसार दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी १३७८ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. अक्कलकोट रोड औद्योगिक वसाहत आणि होटगी रोड औद्योगिक वसाहतीसाठी ५६ कोटी रुपये मंजूर केले आहेत. सोलापूरकरांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या आयटी पार्क आणि सोलापूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विषयदेखील मार्गी लागला आहे. उजनी धरण येथे फ्लोटिंग सोलार पी व्ही बॅटरी ऊर्जा साठवण प्रणाली व शाश्वत एआय कॅम्पसकरिता तब्बल एक लाख २८ हजार ८८३ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार झाला आहे. सोलापूरकरांच्या विकासाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद तसेच नगरपालिका निवडणुकीत सोलापूरकरांनी भाजपाला भरभरून मतदान केले आहे. निवडणुकीत भाजपाला दिलेल्या यशाबद्दल सोलापूर शहर जिल्ह्यातील मतदारांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींच्या सत्कारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापुरात येत आहेत.

विकासाच्या सोहळ्याचे होऊया साक्षीदार

सोलापूर शहर जिल्ह्याचा सर्वांगीण विकास मोठ्या प्रमाणावर होत असताना या विकासाच्या सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी सोलापूरकरांना मिळाली आहे. त्यामुळे मंगळवारी होणाऱ्या विजयी मेळावा व कृतज्ञता सोहळ्यासाठी भाजपाच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि शहर-जिल्हावासियांनी उपस्थित रहावे आणि विकासाच्या सोहळ्याच्या साक्षीदार व्हावे.
-- देवेंद्र कोठे, आमदार, शहर मध्य

भाजपाच्या यशाचे कौतुक

भारतीय जनता पार्टीला सोलापूर महानगरपालिकेसह जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुकांमध्येही मिळालेल्या भरघोस यशाचे कौतुक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करणार आहेत. या सोहळ्यात शहरवासीयांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.
-- विनायक कोंड्याल, महापौर, सोलापूर

मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी अशी असेल व्यवस्था

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवारी होणाऱ्या सभेसाठी १०० बाय ३०० फुटांचे तीन भव्य मंडप उभारण्यात आले आहेत. तर सभेचे व्यासपीठ ४० बाय ६० फुटांचे व्यासपीठ असणार आहे. २० हजार जणांना बसण्याकरिता खुर्च्या ठेवण्यात आल्या आहेत. तसेच ५०० सोफे देखील ठेवण्यात आले आहेत.

मुख्यमंत्र्यांकडून सभेसाठी विशेष सूचना

सभेला येणाऱ्या सोलापूरकरांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरिता स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यानुसार नागरिकांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी १०० मोठे कुलर लावण्यात आले आहेत. तसेच ४ टनचे ६ वातानुकूलित यंत्रणा उभारण्यात आली आहे. सभास्थळी येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून ३० हजार पाण्याच्या बाटल्या आणि २०० पाण्याचे जार अशी मुबलक व्यवस्था करण्यात आली असून खबरदारीचा उपाय म्हणून सभेस्थळी रुग्णवाहिका तसेच डॉक्टरांचे पथकही राहणार आहे, असे आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले.

27/04/2026

सोलापूर महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या अभूतपूर्व विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी *विजयी मेळावा* आणि आयटी पार्क, 1378 कोटींची समतोल पाणीपुरवठा योजना, MIDC मधील सुविधांकरिता 56 कोटींचा निधी, अभियांत्रिकी महाविद्यालयाला मंजुरी, उजनी धरण येथील प्रकल्पाकरिता एक लाख 28 हजार कोटींच्या गुंतवणुकीचा निर्णय घेणाऱ्या *इन्फ्रामॅन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हणजे महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ* यांच्या प्रमुख उपस्थितीत *कृतज्ञता सोहळा* आयोजित करण्यात आला आहे. आपण सर्वांनी मोठ्या संख्येने वाजत-गाजत अवश्य यावे.

स्थळ - हरिभाई देवकरण प्रशाला मैदान, सोलापूर
वेळ - मंगळवार दिनांक 28 एप्रिल 2026 रोजी दुपारी 12 वाजता.

स्वागतोत्सुक - आमदार देवेंद्र दादा कोठे व भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर-जिल्हा

सोलापूर - सोलापूरात आजचे तापमान 44° च्या जवळ आले असून आज दिवसभर उन्हामुळे रस्ते सामसूम पाहावयांस मिळाले
27/04/2026

सोलापूर - सोलापूरात आजचे तापमान 44° च्या जवळ आले असून आज दिवसभर उन्हामुळे रस्ते सामसूम पाहावयांस मिळाले

योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे थाटामाटात उद्घाटनइतिहास साक्ष आहे! अडचणीत असणाऱ्यांना बाहेर काढण्याचं का...
19/04/2026

योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन वास्तूचे थाटामाटात उद्घाटन
इतिहास साक्ष आहे! अडचणीत असणाऱ्यांना बाहेर काढण्याचं काम रमणशेट्टीनीं केले - आमदार देवेंद्र कोठे

सोलापूर- योगीनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, शेळगी येथे उभारण्यात आलेल्या ‘योगीनाथ सभागृह’ या नूतन वास्तूचे उद्घाटन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने करण्यात आली. या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षस्थान डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंडयाल, रोहिणी तडवळकर भाजपा शहर अध्यक्षा, दिलीप पतंगे, प्रगती बागल शहर उपनिबंधक उपस्थित होते. पतसंस्था काढताना अनेक अडचणी समोर आले. परंतु कोणत्याही अडचणीला न घाबरता आम्ही संस्थेत अनेकांना कर्ज वाटप करून झिरो एनपीए मध्ये चालवून आज संस्था आम्ही एका लहान रोपाचे एका मोठ्या वृक्षात रूपांतर झालेले पाहत आहोत असे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक चंद्रकांत रमणशेट्टी यांनी प्रास्ताविक करत संस्थेचा आतापर्यंतचा प्रवास व आर्थिक लेखाजोखा उपस्थितांसमोर मांडले.
याप्रसंगी आमदार देवेंद्र कोठे म्हणाले की, मी रमणशेट्टी यांना लहानपणापासून ओळखतो. त्यांची काम व समाजमनात त्यांनी चांगल्या कार्याची ओळख निर्माण केली आहे. मी लहान असताना फक्त पक्ष वेगळे होते. परंतु ते आज त्यांनी जे कार्य केले आहे ते कार्य राजकारणात व समाजकारणात केले आहे ते कोणाला आज जमत नाही ते त्यांनी पूर्णतःवाला आणून दाखवले. अडचणीत असणाऱ्यांना बाहेर काढण्याचं काम रमणशेट्टी यांनी केले आहे असा इतिहास आहे. राजकारण समाजकारणात त्यांनी त्याग केलं आहे. तसेच पतसंस्थेतही त्यांनी त्याग करून पतसंस्था पुढे आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.असे मत देवेंद्र कोठे यांनी व्यक्त केले.
योगीनाथ पतसंस्थेच्या या नूतन वास्तूमुळे परिसरातील आर्थिक व सामाजिक विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी चेअरमन महेश ठेसे यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन डाॅ.ममता बोल्ली यांनी केले. या सोहळ्यास संस्थेचे सर्व संचालक, संचालिका, कर्मचारी, सभासद व भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

19/04/2026

इतिहास साक्ष आहे! अडचणीत असणाऱ्यांना बाहेर काढण्याचं काम रमणशेट्टीनीं केले - आमदार देवेंद्र कोठे

18/04/2026

⭕समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यात माध्यमांचे महत्त्वाचे योगदान- महेश मुद्दा
सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद; बिल्डर्स असोसिएशन चे उपाध्यक्ष महेश मुद्दा यांचे प्रतिपादन

विमानसेवा व आयटी पार्कमुळे सोलापूर विकासाच्या नव्या उंबरठ्यावरबिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश मुद...
18/04/2026

विमानसेवा व आयटी पार्कमुळे सोलापूर विकासाच्या नव्या उंबरठ्यावर
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश मुद्दा यांचे प्रतिपादन
सोलापूर- सोलापुरात सुरू झालेली विमानसेवा आणि प्रस्तावित आयटी पार्क यामुळे शहराच्या विकासाला मोठी चालना मिळणार असून आयटीसह विविध उद्योगांच्या वाढीसाठी नवे दालन खुले होईल, असा विश्वास बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष महेश मुद्दा यांनी व्यक्त केला.
बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर ते पहिल्यांदाच सोलापूर दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांचा सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी ते बोलत होते संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांच्या हस्ते मुद्दा यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उमा मुद्दा, बिल्डर्स असोसिएशनचे माजी राज्याध्यक्ष दत्ता मुळे, संघाचे खजिनदार किरण बनसोडे आदी उपस्थित होते
मुद्दा पुढे म्हणाले की, सोलापूरबद्दल जे ऐकले होते त्यापेक्षा शहराचे वातावरण अधिक सकारात्मक आणि विकासाभिमुख असल्याचे प्रत्यक्ष पाहून समाधान वाटले. विमानसेवेच्या माध्यमातून सोलापूरचा देश-विदेशाशी संपर्क वाढेल, परिणामी गुंतवणूक आणि उद्योगांची वाढ होईल. संपर्काचे जाळे मजबूत झाल्यास आयटी उद्योगांसह इतर क्षेत्रांमध्येही मोठा विस्तार अपेक्षित आहे.
ते म्हणाले की, इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले असून नव्या पिढीला नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा मोठा फायदा होणार आहे. यामुळे शहरात आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन घडण्यास मदत होईल. सोलापूर भविष्यात झपाट्याने प्रगती करणारे शहर म्हणून ओळख निर्माण करेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
सोलापूर दौऱ्यादरम्यान त्यांनी महापालिका आयुक्त तसेच विविध बिल्डर्स यांच्या प्रकल्पांना भेट दिली. शहरातील विकासकामे आणि प्रकल्प पाहून समाधान झाल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकारांच्या भूमिकेबाबत बोलताना ते म्हणाले की, समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यात माध्यमांचे योगदान महत्त्वाचे आहे. पत्रकारांच्या माध्यमातून समाजात सुधारणा घडतात आणि जनजागृती होते. सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे कार्य कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगमेश जेऊरे यांनी केले, तर उपाध्यक्ष आफताब शेख यांनी आभार मानले. या प्रसंगी शहरातील विविध वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्यांचे पत्रकार, कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Address

Solapur
413002

Alerts

Be the first to know and let us send you an email when Solapur City News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share