Prem Kale

Prem Kale Always Be H@ppy , Everything comes to U at The Right Time.

05/11/2024

तुळजापूर पर्यटनस्थळ ते धाराशिव रेल्वेमार्ग, महायुतीचे उमेदवार राणा जगजितसिंह पाटलांनी प्रचारादरम्यान, विकासा.....

04/11/2024
31/10/2024
31/10/2024

..या अफाट आपुलकी व प्रेमाने मी भारावून गेलो आहे!

एवढी अफाट आपुलकी आणि निरपेक्ष प्रेम वाट्याला येणे हे खरं तर माझे भाग्य आहे. आपल्या सर्वांच्या स्नेहाने आणि मायेने मी पुरता भारावून गेलो आहे. मागील अडीच वर्षांच्या कालावधीत आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून आपण सर्वांनी मिळून भविष्याचा अचूक वेध घेतला आहे. जिल्ह्याचा कायापालट होईल असे अनेक प्रकल्प आणि योजनांना मोठी गती मिळाली आहे. पुढील काळात यापेक्षाही मोठी झेप आपल्याला घ्यावयाची आहे. आई-वडिलांची शिकवण, कुटुंबियांची साथ, आपल्या सर्वांची उत्स्फूर्त सोबत आणि थोरामोठ्यांचे आशीर्वाद नेहमीच मोठे पाठबळ देत आले आहेत.

आजवर अनेक संकटांवर मात करीत आपण मिळवलेल्या प्रत्येक यशात तुमच्या सर्वांचा मोठा वाटा आहे. सर्वांचा विश्वास आणि सहकार्य या बळावरच मोठ्या हिमतीने आपण इथवर पोहोचलो आहोत. अनेक आव्हाने परतवून लावण्याची शक्ती नेहमीच या पाठबळातुन मिळत आली आहे. त्याच्या जोरावरच आपण अनेक मोठी कामे केली आणि भविष्यातही एकजुटीने जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.

अशक्यप्राय वाटणारी अनेक कामे, अनेक प्रकल्प आपण सातत्याने पाठपुरावा करून मार्गी लावले. सर्वांनी मोठ्या विश्वासाने नेहमी दिलेल्या सोबतीचा हा परिपाक आहे. संतश्रेष्ठ गोरोबाकाका आणि जगन्माता कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेची सेवा करण्याचे भाग्य सर्वांनाच मिळत नाही. आपल्या सर्वांच्या अपेक्षा, सूचनांचा आदरपूर्वक विचार करून भविष्यातील अनेक बाबींची आखणी केली आहे.

वाढदिवसाच्या दिवशी पुन्हा हाच विकासाचा संकल्प आपल्या सर्वांच्या साक्षीने सोडतो. आपल्या जिल्ह्याचा कायापालट हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवून आणखी वेगाने काम करणार आहे. आज जन्मदिवसाचे औचित्य साधून आपण सर्वांनी व्यक्त केलेला विश्वास आणि शुभेच्छारुपी आशीर्वाद म्हणजे महाविजयाचा स्पष्ट संकेत आहे. आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या धाराशिव जिल्ह्याचा कायापालट करण्यासाठी आणखी ताकदीने काम करूया.

आपल्या शुभेच्छा आणि स्नेहाप्रती आपले धन्यवाद मानण्यापेक्षा सर्वांच्या स्नेहपूर्वक ऋणात राहणेच मी पसंत करेन..

#वाढदिवस #शुभेच्छा #धन्यवाद

31/10/2024

दीपावलीच्या मन:पूर्वक शुभेच्छा..

आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि भरभराट येवो हीच देवी लक्ष्मी चरणी प्रार्थना..

Address

Tuljapur
Tuljapur
413501

Telephone

+917845962314

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Prem Kale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Prem Kale:

Share