Shrikant Joshi

  • Home
  • Shrikant Joshi

Shrikant Joshi EX MLC Marathwada Vidhanparishad. (BJP)
DM for paid pramotion, advertise etc. politican Hello,
I am Shrikant A. Due to this, people's mood deteriorates.
(2)

Joshi, a former MLA from Marathwada Graduate Constituency. I have created this page to connect with people through knowledge and information. My intention is to do some constructive work through all this. Nowadays, along with social media, almost all the media, we only get to read and see blatant and negative news and incidents. The purpose behind the creation of this page is to prevent this from happening and to make people fun.

ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी(जन्म :२१ मे, १९२८ – मृत्यू :२३ डिसेंबर,२०१०)मराठी साहित्यविश्वात पत्रकार, संपादक, लघुकथा लेखक, ...
21/05/2026

ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी
(जन्म :२१ मे, १९२८ – मृत्यू :२३ डिसेंबर,२०१०)
मराठी साहित्यविश्वात पत्रकार, संपादक, लघुकथा लेखक, कादंबरीकार आणि चरित्रकार म्हणून ठसा उमठवणारे नाव म्हणजे ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी. २१ मे १९२८ रोजी जोगेश्वरी, मुंबई येथे जन्मलेले नाडकर्णी हे अस्सल मुंबईकर. पण त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची झेप स्थानिक नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचलेली होती.
नाडकर्णी यांचे लेखन क्षेत्र हे अनेक अंगांनी बहरलेले होते. ‘पाऊस’, ‘भरती’, ‘चिद्घोष’, ‘प्रस्थान’ हे त्यांच्या लघुकथासंग्रहांमधून मानवी मनाच्या बारकाव्यांचे अत्यंत संवेदनशील दर्शन घडते. ‘दोन बहिणी’, ‘कोंडी’, ‘नजरबंदी’, ‘वलयांकित’ या त्यांच्या कादंबऱ्या आजही विचारांना चालना देणाऱ्या आहेत.
ते केवळ कल्पक लेखक नव्हते, तर एक कुशल चरित्रकारही होते. एम. एफ. हुसेन, पिकासो, गायतोंडे, डी. डी. दलाल, हिचकॉक यांसारख्या दिग्गजांवरील त्यांच्या चरित्रात्मक लेखनात गहन अभ्यास आणि समज जाणवते. ‘अनवाणी’ हे हुसेन यांच्यावरील पुस्तक विशेष गाजले.
साहित्याबरोबरच कलासमीक्षा हे त्यांच्या लेखनातील एक महत्त्वाचे अंग. ‘अश्वत्थाची सळसळ’, ‘अभिनय’, ‘प्रतिभेच्या पाऊलवाटा’, ‘प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट्स ग्रुप’ या त्यांच्या समीक्षा ग्रंथांनी मराठी आणि इंग्रजी वाचकांना विचारप्रवृत्त केलं.

हुसेनसारखे कलाकारही त्यांचा सल्ला मानत. त्यांच्या कलासमीक्षेचा सुवर्णमहोत्सव जहांगीर आर्ट गॅलरीत साजरा करण्यात आला, आणि त्यावेळी हुसेन यांनी स्वत:चे अमूल्य चित्र त्यांना भेट दिले. त्यांच्या लिखाणात स्पष्टता, परखडपणा आणि वैचारिक सखोलता होती कुठलाही संकोच नव्हता.
नाडकर्णी यांनी एम.ए. (इंग्रजी) पूर्ण केल्यानंतर १९५१ मध्ये लंडनच्या भारतीय हायकमिशनमध्ये नोकरी स्वीकारली. परंतु मातृभूमीची ओढ त्यांना परत घेऊन आली. १९५६ पर्यंत त्यांनी मुंबईत महाविद्यालयांमध्ये इंग्रजीचे अध्यापन केले. त्यानंतर चार वर्षे त्यांनी जाहिरात क्षेत्रात कॉपीरायटर म्हणून काम केले.
‘तुकाराम शेंगदाणे’ या टोपणनावाने त्यांचे लिखाण प्रसिद्ध होऊ लागले आणि त्यांच्या कथा ‘मौज’सारख्या नियतकालिकांतून झळकू लागल्या. त्यांनी इंग्रजी पत्रकारिताही उत्तम केली.

नाडकर्णी यांच्या लेखन व समीक्षेला देशविदेशात मान्यता मिळाली. फ्रेंच सरकारने १९८६ मध्ये त्यांना ‘अक्षरांचे शिलेदार’ या किताबाने सन्मानित केले, तर ब्रिटिश सरकारने १९९४ मध्ये त्यांना गौरवचिन्ह बहाल केले. हे पुरस्कार त्यांच्या कलाजाणिवा आणि लेखनसमृद्धीचे प्रमाण होते.
आपल्या अठराव्या वर्षी सुरू झालेली लेखनयात्रा त्यांनी तब्बल ६४ वर्षे अखंड चालू ठेवली. त्यांचे लेखन, समीक्षा, भाष्य हे केवळ विचारप्रवर्तक नव्हे, तर काळाच्या पुढे जाणारे होते. त्यांनी चित्रकला, नाटक, साहित्य आणि चित्रपट यांच्यावर केलेले लेखन आजही मार्गदर्शक ठरते.
२३ डिसेंबर २०१० रोजी या प्रतिभाशाली लेखकाने जगाचा निरोप घेतला. पण त्यांची प्रतिभा, त्यांचे विचार, त्यांचे शब्द आजही वाचकांच्या मनात जिवंत आहेत.
ज्ञानेश्वर गणपत नाडकर्णी यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ

21/05/2026

आंतरराष्ट्रीय चहा दिनाच्या सर्व चहाप्रेमींना हार्दिक शुभेच्छा..!
#आंतरराष्ट्रीयचहादिन #चहा_प्रेम #चहाप्रेमी

21/05/2026

जागतिक जैवविविधता दिन विशेष मालिका part - 3
#जागतिक_जैवविविधता_दिन

सुभेदार मल्हारराव होळकर(जन्म:१६ मार्च १६९३ – मृत्यू:२० मे १७६६)मराठा इतिहासात पराक्रम, निष्ठा आणि धाडसाचे मूर्तिमंत उदाह...
20/05/2026

सुभेदार मल्हारराव होळकर
(जन्म:१६ मार्च १६९३ – मृत्यू:२० मे १७६६)
मराठा इतिहासात पराक्रम, निष्ठा आणि धाडसाचे मूर्तिमंत उदाहरण म्हणून सुभेदार मल्हारराव होळकर यांचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे दिल्लीवर भगवा फडकावण्याचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्याचे भाग्य मल्हाररावांना लाभले.
मराठ्यांचा उत्तरेकडील विस्तार, पेशवाईचा भक्कम आधारस्तंभ आणि इंदूर संस्थानाचे संस्थापक या तीन महत्त्वाच्या भूमिकांमुळे मल्हारराव इतिहासाच्या पानांमध्ये अजरामर झाले. शिपाई म्हणून लढाईची सुरुवात करून त्यांनी सरदारपद मिळवले आणि मराठ्यांच्या साम्राज्यवाढीत सिंहाचा वाटा उचलला.
१६९३ साली पुण्याजवळील होळ गावात जन्मलेल्या मल्हाररावांचे बालपण साधेपणात गेले. त्यांचे वडील खंडोबाचे भक्त होते आणि म्हणूनच त्यांनी आपल्या मुलाचे नाव मल्हार ठेवले. पण लहानपणीच वडिलांचे छत्र हरवले आणि मामा भोजराज बारगळ यांनी त्यांचे पालनपोषण केले. तरुणपणी दाभाड्यांच्या सरदार कंठाजी कदमबांडे यांच्या पेंढारी टोळीत त्यांनी शिपाई म्हणून प्रवेश केला. पण ते केवळ शिपाई म्हणून मर्यादित राहणारे नव्हते! त्यांच्या अप्रतिम युद्धकौशल्यामुळे लवकरच त्यांची कीर्ती दूरवर पोहोचली. याच काळात बाजीराव पेशव्यांशी त्यांची मैत्री झाली. दोघांचेही ध्येय एकच मराठा साम्राज्याचा विस्तार आणि दिल्लीच्या मुघलसत्तेचा नायनाट!
बाजीराव पेशव्यांनी त्यांच्या पराक्रमाची दखल घेत मल्हाररावांना माळवा प्रांताची सुभेदारी बहाल केली आणि त्यानंतर त्यांच्या हातातील तलवार कधी म्यान झाली नाही.
मराठ्यांचे साम्राज्य दक्षिणेत प्रबळ होत असतानाच, उत्तरेत मुघलांची सत्ता अजूनही अस्तित्वात होती. त्या सत्तेला हादरा देण्याची जबाबदारी मल्हारराव होळकरांवर सोपवण्यात आली.
१७३७ मध्ये त्यांनी दिल्लीवर हल्ला चढवला आणि मराठ्यांचा भगवा झेंडा राजधानीत रोवला! मुघल बादशहाला ही मोठी नामुष्की वाटली. यानंतर १७४७ मध्ये त्यांनी इंदौरमध्ये होळकर घराण्याची स्थापना केली. त्यांनी राजवाडे, राजमहल बनवला इंदौर भागाची पाया उभारणी केली.
मराठ्यांच्या उत्तरेकडील विजयात मल्हाररावांचे योगदान अमूल्य होते.
१७२८ – निजामाविरुद्ध निर्णायक विजय.
१७३७ – दिल्लीवर मराठ्यांचा हल्ला! इतिहासात पहिल्यांदाच मराठ्यांनी दिल्लीपर्यंत मजल मारली आणि मुघल दरबार हादरला.
१७३८ – भोपाळच्या लढाईतही त्यांनी अपार पराक्रम गाजवला.
"मल्हार आया... मल्हार आया!" एवढं ऐकताच मुघल फौजा गडबडून जायच्या. १७५८ हे मराठा इतिहासातील महत्वपूर्ण वर्ष ठरले. मल्हारराव होळकर, राघोबादादा आणि इतर मराठा सरदारांनी मिळून लाहोर आणि सरहिंद जिंकले. मराठ्यांचा विजय अटकेपर्यंत पोहोचला आणि मराठ्यांचा भगवा झेंडा अटक किल्ल्यावर रोवला गेला. "अटकेपार झेंडा रोवणं" हा मराठ्यांचा ऐतिहासिक सन्मान मल्हाररावांसारख्या योद्ध्यांमुळेच अमर राहिला! १७६१ मध्ये पानिपतच्या तिसऱ्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला. काही इतिहासकार मल्हाररावांवर "ते युद्धातून माघारी परतले" असा आरोप करतात. पण खरं म्हणजे, सदाशिवराव भाऊंनी आपल्या पत्नीला सुरक्षित नेण्याची जबाबदारी मल्हाररावांवर सोपवली होती.
पराभवानंतरही त्यांनी मराठ्यांचे तुकडे पडू दिले नाहीत. माधवराव पेशव्यांसोबत मिळून त्यांनी साम्राज्य पुन्हा उभारीस आणले.
सततच्या मोहिमा, रणांगणातील संघर्ष, आणि साम्राज्यासाठी अहोरात्र केलेले परिश्रम यामुळे त्यांची तब्येत बिघडत गेली. शेवटी, २० मे १७६६ रोजी आलमपूर येथे या पराक्रमी सेनानीने अखेरचा श्वास घेतला.
मल्हारराव होळकर हे केवळ एक सरदार नव्हते, ते मराठेशाहीचा एक मजबूत आधारस्तंभ होते.
त्यांनी दिल्लीपर्यंत मराठ्यांचा पराक्रम पोहोचवला अटकेपार झेंडा लावण्याच्या मोहिमेत मोलाचा वाटा उचलला. इंदौर संस्थानची स्थापना केली आणि मराठ्यांचे उत्तरेतील बळ वाढवले. त्यांच्या पाठोपाठ अहिल्याबाईंनी इंदौरचा लौकिक वाढवला.
अशा या महान योद्ध्याला मानाचा मुजरा!
श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ

निसर्ग, सौंदर्य आणि संवेदनेचे कवी  सुमित्रानंदन पंत!‘भारत माता ग्रामवासिनीखेतों में फैला है श्यामलधूल भरा मैला सा आँचल,ग...
20/05/2026

निसर्ग, सौंदर्य आणि संवेदनेचे कवी सुमित्रानंदन पंत!
‘भारत माता ग्रामवासिनी
खेतों में फैला है श्यामल
धूल भरा मैला सा आँचल,
गंगा यमुना में आँसू जल,
मिट्टी कि प्रतिमा उदासिनी’
कविता हिन्दी असली तरी मनाला भावणारी आहे. लेखक सुमित्रानंद पंत यांच्या कविताच अश्या आहेत की वाचक कुठलाही असो त्या प्रत्येकाला तेवढ्याच भावतात. सुमित्रानंदन पंत हे काव्यविश्वातील छायावादी काळातील महान कवी म्हणून ओळखले जातात. सुमित्रानंदन यांचा जन्म २० मे १९०० रोजी नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या अल्मोडा येथे झाला. निसर्गसौंदर्याचे सुंदर वर्णन त्यांच्या कवितांमध्ये आढळते. पंत हे हिंदी कवितांच्या नव्या प्रवाहाचे प्रवर्तक होते. निसर्ग चित्रण, सौंदर्य, तत्त्वज्ञान, पुरोगामी चेतना आणि गूढवाद यांचा विस्तार करणाऱ्या पंत यांच्या कलाकृती हा हिंदी भाषेसह जगातील सर्जनशील जगाचा अनोखा वारसा आहे. त्यांचे बालपणीचे नाव गोसाईदत्त होते. गावात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अल्मोडा येथे आले. अल्मोडा येथेच वयाच्या दहाव्या वर्षी त्यांनी आपले नाव गोसाईदत्तवरून बदलून सुमित्रानंदन पंत केले. एवढ्या लहान वयात असे नामकरण त्याची सर्जनशीलता दर्शवते. पल्लव' हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह १९२६ साली प्रकाशित झाला. हिंदीमध्ये ज्याला छायावादी काव्य म्हणतात, त्याची सर्व वैशिष्ट्ये, गुणदोष, सामर्थ्य आणि मर्यादा त्यांच्या पल्लव या संग्रहात आढळतात. सौंदर्याचे वेड, स्त्रीकडे पहाण्याची उदात्त दृष्टी, करुणा व अश्रू यांच्याकडे असलेली स्वाभाविक ओढ, सूक्ष्मतेचा हव्यास, नवी प्रतीके आणि प्रतिमा यांचा चपखल उपयोग, विशेषणविपर्यास इ. पाश्चात्य प्रभावातून आलेले काव्यविशेष तसेच स्वर, नाद आणि रंग यांत तल्लीन होण्याची तरल संवेदनशीलता, निसर्ग-घटनांबद्दल सानंद आश्चर्य, कौतुक व जिज्ञासा ही सर्व वैशिष्ट्ये त्यांच्या पल्लवमध्ये आढळतात. त्याचप्रमाणे त्यांच्या इतर रचनांमध्ये वीणा, गुंजन, ग्राम्य, अनिमा, युगांत आणि लोकायतन यांचा समावेश होतो.

सुमित्रानंदन पंत यांचे निसर्गावरील प्रेम अप्रतिम आहे. निसर्ग त्यांच्यासाठी परिचारिका, बहीण, सोबती ते शिक्षिका सर्व काही आहे. दूरदर्शनला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणतात, "हिमालयात जन्माला आल्यामुळे सौंदर्य ही नेहमीच माझी पाहुणी राहिली आहे." पंतांसाठी कविता हे प्रेम, आपुलकी, उत्कटता आणि आसक्ती या सर्व भावनांच्या अभिव्यक्तीचे माध्यम आहे, ज्यामध्ये ते निसर्गाचे चित्रण करतात. त्यांच्या कवितांचे निसर्गप्रेमाच्या दृष्टिकोनातून विश्लेषण केले असता असे लक्षात येते की, 'वीणा' आणि 'पल्लव'मध्ये निसर्ग सुमित्रानंदन पंतांबद्दल कुतूहल निर्माण करतो, तर 'युगांत' येताच निसर्ग मार्गदर्शकाचे रूप धारण करतो. पंतांची दृष्टी समक्रमित आहे. मार्क्सच्या विचारांचा आणि श्री अरबिंदो आणि विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा सुंदर समन्वय त्यांच्या कृतींमध्ये दिसून येतो. भारतीय अध्यात्माचे प्रशंसक असलेल्या पंत यांच्या दृष्टीने विज्ञान आणि अध्यात्म यांचा समन्वय या युगासाठी अत्यंत आवश्यक आहे. त्याच वेळी पंत यांची स्त्रियांकडे पाहण्याची दृष्टी उदारमतवादी आहे. शारीरिक बुद्धिमत्तेशिवाय, ते स्त्रियांना भावनांचा गठ्ठा मानत असे.

ते म्हणतात, "माणुसकी तेव्हाच विकसित होईल जेव्हा स्त्रिया या पृथ्वीवर मुक्तपणे वावरू शकतील, जेव्हा कोणतीही भीती नसेल." स्वर्णकिरण, स्वर्णधूली, युगपथ, उत्तरा, वाणी, हे काव्य संग्रह मानवाच्या उज्ज्वल भविष्याविषयी आणि त्याच्या अंतिम श्रेयस प्राप्त करण्याच्या सामर्थ्याविषयी कवीचा आशावाद व्यक्त करतात. काव्याखेरीज त्यांनी काही काव्यरूपके, नाटके व कथासंग्रहही लिहिले आहेत. ज्योत्स्ना हे नाटक रजतशिखर, शिल्पी, अलिमा, सौवर्ण इ. त्यांची काव्यरूपके विशेष प्रसिद्ध आहेत. पाँच कहानियाँ हा त्यांचा कथासंग्रह आहे. गद्यपथ हा त्यांचा समीक्षात्मक ग्रंथ आणि साठ वर्ष–एक रेखांकन ( हा आत्मचरित्रात्मक ग्रंथ आहे. पंत यांना त्यांच्या "चिदंबरा" या कार्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार आणि 'काला और बुधा चांद'साठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंत यांना त्यांच्या "चिदंबरा" या कार्यासाठी ज्ञानपीठ पुरस्कार आणि 'काला और बुधा चांद'साठी साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रयागराज येथे २८ डिसेंबर १९७७ रोजी निसर्ग आणि अनुभवाचे कवी आणि भाषेची समृद्ध स्वाक्षरी असलेले सुमित्रानंदन पंत यांचे निधन झाले. या भौतिकवादी युगात आंतरिक जीवनमूल्यांकडे लक्ष वेधणाऱ्या या निसर्गाच्या नाजूक कवीचा आभाळ हिंदी साहित्यविश्वात सदैव राहील. हिन्दी कवी सुमित्रानंद पंत यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ
#सुमित्रानंदनपंत #सुमित्रानंद #पंत #कविताहिन्दी

अभिनयाचा शांत, समर्थ चेहरा  नाना पळशीकर!केवळ आपल्या मुद्राभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे अभिनेते नारायण पळशीकर...
20/05/2026

अभिनयाचा शांत, समर्थ चेहरा नाना पळशीकर!
केवळ आपल्या मुद्राभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारे अभिनेते नारायण पळशीकर म्हणजेच नाना पळशीकर. !
फक्त अभिनयच नव्हे तर जेमतेम मॅट्रिकपर्यंत शिक्षण झाल्यावर देशप्रेमाने प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्ययुद्धात उडी घेतली आणि त्यासाठी तुरुंगवासही भोगला. २० मे १९०८ रोजी मध्य प्रदेश येथे जन्मलेले पळशीकर त्यांच्यावर मराठीपेक्षा हिंदी भाषेचे संस्कार खूप होते. त्या काळात नागपूरला एक चित्रपट संस्था मूकपट तयार करत होती. त्या मूकपटात नारायण यांना काम मिळाले. त्याचवेळी त्यांनी त्यांचे नाव 'नाना पळशीकर ' असे केले. चित्रपट क्षेत्रात नाव कमवावे या हेतूने नाना प्रभात कंपनीत पुण्याला गेले. पण तिथे काम मिळाले नाही. मग ते मुंबईला गेले आणि तिथे रोज एक रुपया रोजंदारीवर रणजित स्टुडिओमध्ये काम करू लागले. त्यावेळी रणजीत स्टुडिओत १९३५ साली 'देशदासी ' या चित्रपटाचे काम चालले होते त्या चित्रपटात त्यांना छोटी भूमिका मिळाली. त्यानंतर 'बॅरिस्टर की बीबी ' या चित्रपटात छोटी भूमिका मिळाली.

हळूहळू करत चित्रपट क्षेत्रात ते नावलौकिस आले त्यांच्या नावाचा बोलबाला पाहून व्ही. शांताराम यांनी त्यांना राजकमल कलामंदिर मध्ये बोलवून घेतले. त्यांना 'माली' या हिंदी चित्रपटात आणि 'भक्तीचा मळा' या मराठी चित्रपटात भूमिका दिली. 'माली' या चित्रपटासाठी त्यांनी एक हिंदी गीतही लिहिले. 'भक्तीचा मळा' हा त्यांचा पहिला मराठी बोलपट. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातून कामे केली.
त्यांनी अनेक हिंदी चित्रपटातून कामे केली त्यामुळे त्यांना मराठी चित्रपटात कामे करण्यास वेळही मिळत नसे. तरीही १९५५ च्या 'मूठभर चणे', १९६२ च्या 'प्रेम आंधळं असतं' आणि १९६३ च्या 'फकिरा' या चित्रपटात त्यांनी भूमिका केल्या. त्याचप्रमाणे 'जेम्स आयव्हरीच्या 'द गुरु' नावाच्या अमेरिकन चित्रपटातही त्यांनी काम केले. एकदा नागपूर येथे हिंदू महासभेच्या कार्यक्रमात कॅम्प फायरचे आयोजन करण्यात आली. त्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हेगडेंवार तेथे होती. नाना पळशीकर यांनी एक छोटा कार्यक्रम केला होता. तो पाहून त्यांनी नानांची प्रशंसा केली आणि म्हणाले, " तू खूप चांगला अभिनय करतोस, तू सिनेमात गेलास तर चांगले नांव कमवशील.” आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणेच खरंच पळशीकर हे चित्रपट सृष्टीत एकेकाळी गाजलेलं नाव. त्यांनी चित्रपट सृष्टीत फक्त नावच कमवलं नाही तर आपली एक ओळख निर्माण करून स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवला.

नाना पळशीकर यांनी चार मराठी चित्रपटात भूमिका केल्या आणि शंभरहून अधिक हिंदी चित्रपटात भूमिका केल्या. त्यांना 'कानून ' ह्या चित्रपटातील भूमिकेसाठी, तसेच एकूण तीन चित्रपटासाठी त्यांना सर्वोतकृष्ट अभिनेता म्हणून 'फिल्मफेअर' पारितोषिके मिळाली. त्याचप्रमाणे १९८२ साली बोलपट चित्रपटसृष्टीच्या अमृतमहोत्सवनिमित्त त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते त्यांना पारितोषीक देण्यात आले. कंगन, कुवारा बाप (१९४२), दो बिघा जमीन, बाप बेटी, श्री.४२०, जेलर, अनाडी, दोस्ती, शेर और सपना, कानून, माया, हेमराज, आखरी खत, आदमी और इन्सान, ललकार शोर, धुंद, प्रेम पर्वत, आक्रोश, गांधी, आणि शेवटचा चित्रपट कानून क्या करेगा अशा या प्रसिद्ध हिंदी चित्रपटात त्यांनी काम करत आपल्या अभिनयाची छाप सोडली. शेवटी २ जून १९८४ रोजी हा कलाकार परद्याआड गेला.
श्रीकांत अ जोशी (आणि क्रीएटीव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदार संघ
#अभिनेतेनारायणपळशीकर #नारायणपळशीकर

डॉ. जयंत नारळीकर(जन्म : १९ जुलै १९३८  मृत्यू : २० मे २०२५)आपल्या महाराष्ट्राने जगाला अनेक हिरे दिले आहेत ज्यांनी अनेक क्...
20/05/2026

डॉ. जयंत नारळीकर
(जन्म : १९ जुलै १९३८ मृत्यू : २० मे २०२५)
आपल्या महाराष्ट्राने जगाला अनेक हिरे दिले आहेत ज्यांनी अनेक क्षेत्रात नाव कमावलं आहे. त्यातलाच एक हिरा म्हणजे खगोल भौतिकशास्त्रज्ञ 'डॉ. जयंत नारळीकर'!
नारळीकर हे भारतातील तेच लोकप्रिय शास्त्रज्ञ आहेत , ज्यांनी ८० -९० च्या दशकात लहान मुलांना तसेच प्रौढांना विश्वाची खगोलिय रहस्ये सांगितली, ज्यांच्यासाठी आकाश, तारे, चंद्र हे सर्व केवळ कुतूहलाचा विषय होते. १९ जुलै १९३८ रोजी त्यांचा कोल्हापूर येथे जन्म झाला. नारळीकर हे विज्ञान आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रातील भारतातील आणि महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे नाव आहे. डॉ. नारळीकरांचे शालेय शिक्षण वाराणशी येथे झाले. तेथूनच सन १९५७ साली त्यांनी विज्ञानाची पदवी प्राप्त केली. या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते ब्रिटनमधील केंब्रीज विद्यापीठात दाखल झाले. तेथे त्यांना बी.ए. एम.ए. आणि पी.एचडी.च्या पदव्या मिळाल्या. गणिताच्या पदव्युत्तर पदवीच्या तृतीय वर्षात प्रथम श्रेणी मिळविणार्‍या विद्यार्थ्याला तिथे रँग्लर किताब दिला जाई. तसेच खगोलशास्त्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल दिले जाणारे 'टायसन' पदकही त्यांनी जिंकले. उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरीबद्दल १९६२ मध्ये ते स्मिथ पारितोषिक आणि १९६७ मध्ये अ‍ॅडम्स पारितोषिकाचे मानकरी ठरले. नारळीकर १९७२ पर्यंत केंब्रिजमध्ये होते. त्यांना किंग्ज कॉलेजची फेलोशीप मिळाली. तसेच तेथील सैद्धांतिक खगोलशास्त्र संस्थेचे संस्थापक-कर्मचारी म्हणूनही त्यांना तिथे राहता आले. या कार्यकाळात त्यांनी ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ आणि गणितज्ज्ञ फ्रेड होयल यांच्याशी संबंध दृढ केले आणि संशोधन सुरू ठेवले. नारळीकरांनी आपल्या संशोधन कार्यात गुरुत्वाकर्षणाचे सिद्धांत, मॅकचे तत्त्व आणि क्वांटम कॉस्मॉलॉजीवर भर दिला. ब्रिटिश संशोधक आणि विज्ञान कादंबरीकार फ्रेड हॉईल यांचे ते सहकारी झाले आणि अंतराळविज्ञान, विश्वविज्ञान आणि ज्योतिभौतिकी यांमधील त्या दोघांचे संशोधन सर्व जगात मान्य झाले. सर फ्रेड हॉईल आणि डॉ. नारळीकर यांनी खगोल शास्त्रात एकत्र संशोधन केलं. गुरुत्वाकर्षणावर त्या दोघांनी मिळून संशोधन करून जो सिद्धांत मांडला, तो `हॉईल-नारळीकर सिद्धांत’ या नावाने खगोलशास्त्रात प्रसिद्ध झाला. अर्ल्बर्ट आईन्स्टाईनच्या साक्षेपतेच्या सिद्धांताशी साम्य साधणारा असा हा सिद्धांत आहे. हा सिद्धांत असे सांगतो की, "वस्तूमधील कणाचे अंतर्गत वस्तुमान हे त्या वस्तूतील सर्व कणांच्या एकत्रित कार्याची परिणती असते." नारळीकरांचे संशोधन मुख्यत: विश्वरचनाशास्त्राशी निगडित आहे. या विश्वाची निर्मिती एका महास्फोटातून झाली असे मानले जाते आणि हा सिद्धांत बहुसंख्य शास्त्रज्ञ मान्य करतात. परंतु हॉयल आणि नारळीकर यांनी १९६४ मध्ये एक वेगळाच सिद्धांत मांडून या कल्पनेला हादरा दिला. त्यामुळे नारळीकर एकदम प्रकाशझोतात आले.

त्यांना जागतिक कीर्ती प्राप्त झाली. १९७२ मध्ये मात्र ते 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च' संस्थेत सहभागी होण्यासाठी भारतात परतले. या संस्थेत त्यांनी सैद्धांतिक खगोलशास्त्र पथकाचे नेतृत्व केले. १९८८ मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सांगण्यावरून त्यांनी पुण्यात 'आयुका' या नव्या केंद्राच्या स्थापनेसाठी मदत केली. तिथे २००३ पर्यंत ते संचालक होते. १९९४ ते १९९७ या काळात ते आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेच्या कॉस्मोलॉजी कमिशनचे अध्यक्ष होते. 'कन्फॉर्मल ग्रॅव्हिटी थिअरी'साठी डॉ. जयंत नारळीकर जगभरात ओळखले जातात. चार दशकांहून अधिक काळ त्यांनी खगोलभौतिकी क्षेत्रात संशोधन केलं.
संशोधनासोबतच विज्ञानविषयक लेखन त्यांनी सुरू ठेवलं. अंतराळातील भस्मासूर, अंतराळातील स्फोट, वामन परत न आला, यक्षांची देणगी, चला जाऊ अवकाश सफरीला यांसारख्या विज्ञानकथा त्यांनी लिहिल्या. सामान्य माणसाला खगोलशास्त्र समजावण्यासाठी त्यांनी गेली अनेक वर्षे प्रयत्‍न केले आहेत. त्यासाठी सर्व प्रसारमाध्यमांचा ते उपयोग करतात. त्यांच्या 'यक्षांची देणगी' या पहिल्याच पुस्तकाला महाराष्ट्र सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. नारळीकरांची पुस्तके बंगाली, तेलगू, कन्नड, हिंदी, मल्याळम आणि गुजराथी अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतरित झाली आहेत. इतकेच नाही तर ग्रीक, इटालियन, रशियन, पोलिश, जपानी, फ्रेंच, स्पॅनिश आणि चिनी अशा परदेशी भाषांमध्येही त्यांच्या पुस्तकांचे अनुवाद झाले आहेत.

त्यांनी संशोधनाशिवाय विज्ञान प्रसारक म्हणूनही टीव्ही आणि रेडिओवर कार्यक्रम घेतले आहेत. सर्वसाधारणपणे असे दिसते की शास्त्रज्ञ आपल्याच कोशात गुरफटलेले असतात आणि त्यामुळे ते जनसामान्यांपासून दूर असतात. परंतु नारळीकर याला सन्मान्य अपवाद होते. विज्ञान सामान्य लोकांपर्यंत नेण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले. मुंबई दूरदर्शनवरून “आकाशाशी जडले नाते” ही त्यांची मालिका प्रसारित करण्यात आली. पुढे दूरदर्शनवरून 'ब्रह्मांड' या नावाची हिंदी मालिका प्रसारित झाली. त्यात त्यांचा प्रमुख सहभाग होता. त्यांना अनेक पुरस्कारांनीही सन्मानित करण्यात आले आहे. शांती स्वरूप भटनागर पुरस्कार, एम. पी. बिर्ला पुरस्कार, फ्रेंच अ‍ॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीतर्फे दिला जाणारा प्रिक्स जॉनसेन पुरस्कार, युनेस्कोचा कलिंग पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. भारत सरकारनेही त्यांना १९६५ मध्ये 'पद्मभूषण', तर २००४ मध्ये 'पद्मविभूषण' पुरस्काराने गौरविले आहे. २०११ मध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांना 'महाराष्ट्र भूषण' या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित केले. २०१४ मध्ये ‘चार नगरांतले माझे विश्व’ या त्यांच्या आत्मचरित्राबद्दल त्यांना साहित्य अकादमीचाही पुरस्कार मिळाला आहे. अमेरिकेतील फाउंडेशनतर्फे दिला जाणारा साहित्यविषयक जीवनगौरव पुरस्कार ही त्यांना मिळाला आहे. ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपद भूषवण्याचा बहुमान ही त्यांना मिळाला होता. डॉ. जयंत नारळीकर यांच्या विज्ञान साहित्याने मराठी साहित्यातील दालन समृद्ध केले, या विषयी दुमत असण्याचे कारण नाही. त्यांनी केलेल्या या योगदानाचा विचार करताना, मराठी साहित्याची वाटचाल ध्यानात घ्यावी लागेल. मराठी साहित्याला प्रदीर्घ परंपरा आहे. नारळीकर यांचा सारख्या व्यक्तींनी त्यात शास्त्रीय माहितीची भर घालून या परंपरेला अधिक समृध्द केलं आहे. अवकाशाचं विश्व उलगडण्यासाठी आणि या विश्वाच्या अभ्यासाची रुची लहानांपासून मोठ्यांपर्यंत निर्माण करण्यासाठी आपलं अवघं आयुष्य समर्पित करणारे डॉ. जयंत नारळीकर यांचं अमूल्य योगदान देश कायम स्मरणात ठेवेल. आजची युवा पिढी त्यांच्या कार्यापासून कायम प्रेरणा घेत राहील.
श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ

“मायाळू ‘बा’चा अजरामर प्रवास : सुधा शिवपुरी!(जन्म : १४ जुलै १९३७ – मृत्यू : २० मे २०१५) तुम्हाला “क्योंकी सास भी कभी बहू...
20/05/2026

“मायाळू ‘बा’चा अजरामर प्रवास : सुधा शिवपुरी!
(जन्म : १४ जुलै १९३७ – मृत्यू : २० मे २०१५)
तुम्हाला “क्योंकी सास भी कभी बहू थी” या मालिकेतील ती गोड, प्रेमळ आणि कणखर ‘बा’ आठवत असतीलच… घरातील प्रत्येकाला मायेने जपणारी, योग्य वेळी मार्गदर्शन करणारी आणि संपूर्ण कुटुंबाला एकत्र बांधून ठेवणारी ती ‘बा’ म्हणजेच अभिनेत्री सुधा शिवपुरी. या एका भूमिकेने त्यांना केवळ प्रसिद्धीच दिली नाही, तर त्या अक्षरशः प्रत्येक घरातल्या सदस्यासारख्या बनल्या. आज त्यांचा स्मृतिदिन.
१४ जुलै १९३७ रोजी इंदूर येथे जन्मलेल्या सुधा शिवपुरी यांचा प्रवास अजिबात सोपा नव्हता. लहान वयातच वडिलांचे निधन झाले, तर आईही अनेकदा आजारी असायची. अशा परिस्थितीतही त्यांनी हार मानली नाही. अभिनयाची ओढ त्यांना दिल्लीला घेऊन गेली आणि १९६३ साली त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये प्रवेश घेतला. तिथेच त्यांच्या आयुष्याला एक वेगळं वळण मिळालं.

एनएसडीमध्ये त्यांची ओळख झाली ती ओम शिवपुरी यांच्याशी. अभिनय शिकताना एकमेकांच्या सहवासात ते अधिक जवळ आले आणि अखेर १९६८ साली त्यांनी लग्न केलं. या दोघांनी मिळून दिल्लीच्या रंगभूमीवर आपला ठसा उमटवायला सुरुवात केली. त्यांनी ‘दिशांतर’ नावाची स्वतःची नाट्यसंस्था स्थापन केली आणि “आधे अधुरे” आणि “तुघलक” यांसारखी अनेक दर्जेदार नाटके सादर केली. रंगभूमीवरील हा काळ त्यांच्या अभिनयाचा मजबूत पाया ठरला.

१९७४ साली सुधा शिवपुरी आपल्या पतीसोबत मुंबईत स्थायिक झाल्या. ओम शिवपुरी यांना बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणात काम मिळू लागलं आणि त्या प्रवासात सुधाही पुढे आल्या. १९७७ साली आलेल्या “स्वामी” या चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर “इन्साफ का तराजू”, “हमारी बहू अलका”, “हम दोनो”, “सावन को आने दो” आणि “पिंजर” यांसारख्या चित्रपटांत त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली.

१९८५ साली त्यांनी काही काळासाठी चित्रपटसृष्टीतून ब्रेक घेतला, पण अभिनयाची ओढ त्यांना पुन्हा छोट्या पडद्याकडे घेऊन आली. “आ बैले मुझे मार” आणि “रजनी” यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी आईच्या भूमिका साकारल्या. या भूमिकांमधूनही त्यांच्या अभिनयातील सहजता आणि भावनिक ताकद स्पष्टपणे दिसून आली.

मात्र त्यांच्या कारकिर्दीला खरं शिखर गाठायला मिळालं ते २००० साली, जेव्हा त्यांनी एकता कपूर यांच्या “क्यूंकी सास भी कभी बहू थी” या मालिकेत ‘बा’ची भूमिका साकारली. या एका भूमिकेने त्यांना घराघरात पोहोचवलं. ‘बा’ म्हणजे प्रेम, शहाणपण आणि कुटुंबाची आधारवड अशी प्रतिमा त्यांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनात रुजली. त्या केवळ एक पात्र राहिल्या नाहीत, तर त्या प्रत्येकाच्या घरातील ‘बा’ बनल्या. यानंतर त्यांनी “शिशे का घर”, “दमन”, “वक्त का दरिया” आणि “किस देश में है मेरा दिल” यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं. प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपली वेगळी छाप सोडली आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात कायमची जागा निर्माण केली.
२० मे २०१५ रोजी सुधा शिवपुरी यांनी या जगाचा निरोप घेतला… पण त्यांनी साकारलेली ‘बा’ आजही जिवंत आहे टीव्हीच्या पडद्यावर, आठवणींत आणि प्रत्येकाच्या मनात.
आज त्यांच्या स्मृतिदिनी एकच गोष्ट जाणवते काही कलाकार हे केवळ भूमिका साकारत नाहीत, तर ते त्या भूमिकांना जगतात… आणि सुधा शिवपुरी यांची ‘बा’ ही त्याचं जिवंत उदाहरण आहे.
त्या आठवणींना, त्या मायाळू ‘बा’ला मनःपूर्वक अभिवादन!
श्रीकांत अ. जोशी (आणि क्रिएटिव्ह टीम)
माजी आमदार
मराठवाडा पदवीधर मतदारसंघ
#सुधाशिवपुरी #बा #क्योंकीसासभीकभीबहूथी #हिंदीमालिका #टीव्हीआयकॉन #मराठीहिंदीकलाकार #भारतीयटीव्ही #अजरामरभूमिका #स्मरणीयअभिनेत्री #टीव्हीइतिहास

20/05/2026

जागतिक जैवविविधता दिन विशेष मालिका !

Address

A-7, Vedant Grahkul, New Shreyanagar, Near Deogiri Bank

431005

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shrikant Joshi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shrikant Joshi:

  • Want your business to be the top-listed Advertising & Marketing Company?

Share