05/08/2021
*सध्याच्या बिझनेससाठी डिजीटल मार्केटिंग का महत्त्वाचे आहे!* 📲💰
विपणन म्हणजेच मार्केटिंग व्यवसायातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. उत्पादन किंवा सेवांचे विपणन केल्याशिवाय कोणताही बिझनेस पुढे जाणार नाही. म्हणूनच आजकालच्या यशस्वी कंपन्या आणि बिझनेसचे मार्केटिंग विंग फारच कुशल असते. आता तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे मार्केटिंगमध्येही नवे आयाम आले आहेत. डिजीटल मार्केटिंग हा मार्केटिंगमधील महत्त्वपूर्ण आणि सर्वात चालणारा व्यवसाय आहे. तसेच सध्या डिजीटल मार्केटिंगची सर्वत्र चांगलीच बूम पहायला मिळते.
घरगुती बिझनेस, मोठ्या कंपन्या ते नवनवे स्टार्टअपमध्ये डिजीटल मार्केटिंगची स्वतंत्र टीम पहायला मिळते. काहींना स्वतःची टीम ठेवायची नसेल ते बाहेरील एजन्सीला डिजीटल मार्केटिंगचे काम देतात. काहीही करून आपला ब्रॅण्ड, कंपनी, प्रोडक्ट, सेवा ऑनलाईन असायला हवी हा त्यामीग अट्टहास. तर आज आपण पाहू यात डिजीटल मार्केटिंग आपल्या बिझनेससाठी का महत्त्वाचे आहे…
*डिजीटल मार्केटिंग म्हणजे काय* Digital Marketing means, “The marketing of products or services using digital channels to reach consumers. The key objective is to promote brands through various forms of digital media.”
साध्या आणि सोप्या भाषेत म्हणायचं तर आपण पुरविलेल्या सेवा वा उत्पादनं ग्राहकांपर्यंत त्वरीत व सहजतेने पोहचविण्यासाठी त्यांचे डिजीटल चॅनेल्सवर प्रमोशन किंवा पोस्ट करणे होय.
डिजिटल मार्केटिंग मराठीतुन शिकन्यासाठी आपले ईबुक खरेदी करा
अधिक माहिती साठी पेज फॉलो करा 😊🙏