21/10/2025
!! हे परमेश्वरा !!
कोणताही अर्ज केला नव्हता की, कुणाचीही शिफारस नव्हती,
असे कोणतेही असामान्य कर्त्तृत्वही नाही, तरीही
डोक्याच्या केसांपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत 24 तास देवा तू रक्त फिरवतोस...
जिभेवर नियमित अभिषेक करत आहेस...
अखंडपणे तू माझे हे हृदय चालवतोस...
चालणारे कोणते यंत्र तू फिट करून दिले आहेस रे देवा!
पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसापर्यंत विना अडथळा संदेशवहन करणारी प्रणाली...
कोणत्या अदृष्य शक्तीने चालते आहे — काही समजत नाही!
हाडांमासामध्ये तयार होणारे रक्त कोणते जगावेगळे आर्किटेक्चर आहे —
याचा मला मागमूसही नाही.
हजार हजार मेगापिक्सलवाले दोन दोन कॅमेरे अहोरात्र सगळी दृश्ये टिपत आहेत,
दहा हजार टेस्ट करणारी जीभ,
अगणित संवेदनांची जाणीव देणारी त्वचा,
आणि फ्रिक्वेंसीचा जादू करणारी स्वरप्रणाली व कानांची यंत्रणा!
पंचाहत्तर टक्के पाण्याने भरलेला शरीररुपी टँकर हजारो छिद्रे असतानाही लिक होत नाही!
स्टॅण्डशिवाय उभा राहणारा शरीररुपी चमत्कार,
झिजणारे टायर, पण न झिजणारे तळवे!
अद्भुत रचना आहे ही देवा...
संभाळणे, स्मृती, शक्ती, शांती — हे सर्व तु देतोस!
तुच आत बसून शरीर चालवतोस.
अद्भुत, अविश्वसनीय, अनाकलनीय!
अशा शरीररुपी मशीनमध्ये कायम तुच आहेस,
याची जाणीव करून देणारा आत्मा देवा —
तू असा काही फिट बसविला आहेस की आणखी काय मागावं?
तुझ्या या जीवाशिवाच्या खेळाचा निखळ, निस्वार्थी आनंदाचा वाटेकरी राहीन!
अशी सद्बुद्धी सर्वांना दे!!
तुच हे सर्व सांभाळतो आहेस याची जाणीव आम्हा सदैव राहू दे!!!
रोज क्षणोक्षणी कृतज्ञतेने तुझा ऋणी असल्याचे स्मरण, चिंतन व्हावे, हीच परमेश्वरा तुझ्या चरणी प्रार्थना! 🙏
💐💐🪔🪔💐💐
कालपासून सुरू झालेल्या दीपावलीच्या वसुबारस ते भाऊबीज पर्यंतच्या प्रकाशोत्सवाच्या आनंदमयी, उत्साही, मंगलमय पर्वानिमित्त,
आपणास व आपल्या परिवारास मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
ही दिवाळी आनंद, भरभराट, सुख-समृद्धी, प्रगती आणि आरोग्याने परिपूर्ण जावो —
हीच मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 🌹🌹🌹🌹🌹
— नवल शिंदे
🌸 Om Shreem, Aura n Vastu
🎨 Aakar Art Creation