ITN Marathi

ITN Marathi ITN Marathi is a part of Indian Tv News (ITN National) , its a Marathi Language News Page.

31/01/2026

स्वारगेट परिसरात बेकायदेशीर हुक्का पार्लरवर पोलिसांची धाड; अग्निशमन दलाच्या मदतीने कारवाई
स्वारगेट पोलिसांनी शुक्रवारी एका नाट्यमय कारवाईत हॉटेलच्या आडून सुरू असलेला बेकायदेशीर हुक्का पार्लर उध्वस्त केला. छाप्यावेळी कर्मचारी आतून शटर बंद करून बसल्यामुळे पोलिसांना अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागली.
पुणे शहर पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ३० जानेवारी २०२६ रोजी स्वारगेट येथील मोदी प्लाझा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या ‘एल-दिनेरो’ हॉटेलमध्ये बेकायदेशीर हुक्का सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास भरमल आणि पोलीस उपनिरीक्षक सुजाता जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, पोलिस पोहोचताच हॉटेलचे शटर आतून बंद करण्यात आले. वारंवार घोषणा व दरवाजा ठोठावूनही आतून प्रतिसाद मिळाला नाही.
त्यानंतर परवती येथील जनता अग्निशमन केंद्राच्या पथकाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या मदतीने शटरचे कुलूप तोडून पोलिसांनी आत प्रवेश केला. आत ग्राहकांना आरोग्यास घातक अशा तंबाखूयुक्त हुक्क्याचे फ्लेवर व्यावसायिक फायद्यासाठी दिले जात असल्याचे आढळून आले.
जप्ती व गुन्हा दाखल
या कारवाईत पोलिसांनी हुक्का पॉट्स, चिलम, बंदी असलेले तंबाखू फ्लेवर व इतर साहित्य असा एकूण ₹२२,५६० किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी हॉटेल मालक व कर्मचाऱ्यांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत:
प्रतीक विकास मेहता (मालक, रा. धंकवडी)
सनी सुंदर परिहार (व्यवस्थापक, वय ३३, रा. गुलटेकडी)
दीपक सतभूषण जैन (वेटर)
मोसिन दिलमोहम्मद शेख (वेटर)
अनमोल सरवन श्रेष्ठ (वेटर)
पर्वत सूरज परिहार (वेटर)
ढोल बहादूर परिहार (वेटर)
चौकशीत व्यवस्थापक सनी परिहार याने, हॉटेल मालक प्रतीक मेहता यांच्या सूचनेनुसार ग्राहकांना हुक्का दिला जात असल्याची कबुली दिली आहे.

22/01/2026

पुण्यातील रामटेकडी परिसरात बिल्डरशी संबंधित दबावामुळे एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हडपसर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
“रामटेकडीतील धक्कादायक घटना”

ही घटना रामटेकडीतील एका गॅलरीमध्ये घडली. मृत तरुण काही दिवसांपासून आर्थिक व्यवहार आणि प्रोजेक्टशी संबंधित तणावात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. बिल्डरकडून दबाव आल्याची चर्चा मात्र पोलिसांनी याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
घटनेची माहिती मिळताच हडपसर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

स्थानिक रहिवाशी किंवा पत्रकार बाइट
“बिल्डरशी व्यवहाराच्या संदर्भात काही वाद असल्याचं ऐकायला मिळतंय. पण तपासानंतरच नेमकं काय हे स्पष्ट होईल.
बिल्डरचा दबाव, आर्थिक ताण आणि व्यवहारातील वाद या प्रकरणाशी संबंधित आहेत का? याची तपास यंत्रणा दोन्ही बाजूंनी चौकशी करत आहे. संबंधित बिल्डरकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळालेली नाही.
गेल्या काही दिवसांत पुण्यात रिअल इस्टेट व्यवहारांशी संबंधित तणाव आणि वादांची प्रकरणं वाढत असल्याचं लक्षात येत आहे.
आत्महत्या हा कोणत्याही समस्येचा मार्ग नसून तणाव जाणवत असल्यास मदत घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
हडपसर पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून अधिक माहिती येण्याची प्रतीक्षा आहे.

20/01/2026

पुण्यात आंतरराष्ट्रीय रेस यशस्वी; पोलिस प्रशासन ऑन-ग्राउंड

18/01/2026
22/12/2025

आज कलेक्टर कार्यालयासमोर मुस्लिम बांधवांनी तीव्र आंदोलन करत आपला आक्रोश व्यक्त केला. ‘जोडे मारो’ आंदोलनाच्या माध्यमातून निषेध नोंदवण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेदरम्यान मुस्लिम महिलांच्या हिजाबला ओढण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकारामुळे मुस्लिम समाजामध्ये मोठ्या प्रमाणात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळत आहे.
आंदोलकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. संबंधित घटनेवर तातडीने कारवाई करण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात आली आहे.
“महिलांच्या सन्मानाशी खेळ करणाऱ्या घटनांचा आम्ही तीव्र निषेध करतो. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे
या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
दरम्यान, प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून योग्य ती कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. पुढील घडामोडींसाठी आमच्यासोबत राहा.

Address

Aurangabad
Aurangabad
431001

Alerts

Be the first to know and let us send you an email when ITN Marathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share