Royal Maharashtra Majha - रॉयल महाराष्ट्र माझा

  • Home
  • India
  • Bhir
  • Royal Maharashtra Majha - रॉयल महाराष्ट्र माझा

Royal Maharashtra Majha - रॉयल महाराष्ट्र माझा महाराष्ट्रातील चालु घडामोडी, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, पर्यटन, मनोरंजन आणि बरंच काही.. NEWS | PROMOTION | MARKETING | COLLABORATION

"हिच का ती सुरक्षा???...माझी गाडी अवघ्या 6-7 मिनिटात पूर्ण जळाली "....बायकॉट GWagon म्हणत सेलिब्रिटी डिझायनर दीपक माने य...
09/08/2026

"हिच का ती सुरक्षा???...माझी गाडी अवघ्या 6-7 मिनिटात पूर्ण जळाली "....
बायकॉट GWagon म्हणत सेलिब्रिटी डिझायनर दीपक माने यांनी या कोट्यावधिंची किंमत असलेल्या गाडी विरोधात आवाज उठवला आहे. तब्बल 3 कोटींहून अधिक किंमत असलेली महागडी गाडी घेऊनही जर आपण सुरक्षित नाही तर अशा गाडयांना मी बायकॉट करतो असं दीपक माने यांनी म्हटलं आहे. दीपक माने पुण्यातील आकुर्डी भागात रॉयल तष्ट नावाने स्वतःचा कपड्यांचा ब्रँड चालवतात. अनेक मराठी सेलिब्रीटिंसाठी देखील त्यांनी कामं केली आहेत. अनेक महागड्या गाड्यांचे कलेक्शन दीपक माने यांच्याकडे आहे. G wagon ही 3 कोटींची महागडी गाडी देखील त्यांनी हौसेने खरेदी केली. मात्र भूमकर चौकातून आपल्या शोरूममध्ये येत असताना गाडीच्या बोनेटमधून अचानक धूर येऊ लागला आणि पुढच्या क्षणाला गाडी लॉक झाली. त्याचवेळी गाडीच्या आतून आग झपाट्याने वाढली आणि अवघ्या 5-7 मिनिटात आतील बाजू जळून खाक झाली. 10 व्या मिनिटाला फायरब्रिगेडने आग आटोक्यात आणली पण तोपर्यंत गाडीचे पूर्ण नुकसान झाले होते. एवढ्या महागड्या गाड्या असूनही त्याला कुठलीच सेफ्टी नसल्याचे लक्षात आल्यानंतर दीपक माने यांनी या गाडीविरोधात आवाज उठवला आहे. 'याचजागी माझी फॅमिली जर इथे असती तर?... मी अशा कितीतरी गाड्या घेऊ शकतो पण जर एवढी महागडी गाडी घेऊनही तुम्हाला जर सेफ्टी मिळत नसेल तर मी अशा गाडीला बायकॉट करतो... मला इन्शुरन्स कंपनीशीही बोलायचं नाही आणि मर्सीडीजसोबतही बोलायचं नाही ' असा पवित्रा त्यांनी घेतला आहे.

पोलीस हे केवळ कायद्याचे रक्षक नसून समाजाच्या सुरक्षिततेचेही खरे पहारेकरी आहेत, याची प्रचिती नेकनूर पोलिसांनी पुन्हा एकदा...
28/07/2026

पोलीस हे केवळ कायद्याचे रक्षक नसून समाजाच्या सुरक्षिततेचेही खरे पहारेकरी आहेत, याची प्रचिती नेकनूर पोलिसांनी पुन्हा एकदा आपल्या संवेदनशील आणि लोकहिताच्या कृतीतून दिली आहे. पिंपळवंडी येथील बिंदूसरा नदीवरील पुलावरील लोखंडी संरक्षक ग्रील अज्ञात व्यक्तीने तोडून नेल्याची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. त्यानंतर नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत स्वतःच्या खर्चातून नवीन संरक्षक ग्रील बसवून संभाव्य अपघाताचा धोका टाळला.

पाहणीदरम्यान पुलाखाली सुमारे २० फूट खोल नदीपात्र असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पुलावरील संरक्षक ग्रील नसल्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी, तसेच पावसाळ्यात वाहनचालक, दुचाकीस्वार आणि पादचारी यांचा तोल जाऊन गंभीर अपघात होण्याची शक्यता होती. निष्पाप नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ शकतो, याची जाणीव होताच कोणत्याही प्रशासकीय प्रक्रियेची वाट न पाहता नेकनूर पोलिसांनी तातडीने पुढाकार घेतला.

नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत पोलिसांनी स्वतःच्या खर्चातून नवीन लोखंडी संरक्षक ग्रील बसवून पुलाची सुरक्षितता सुनिश्चित केली. या कृतीमुळे संभाव्य मोठा अपघात टळल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली असून, नेकनूर पोलिसांच्या या लोकाभिमुख उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
ही कामगिरी प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विठ्ठल राठोड, पोलीस हवालदार उद्धव तांबे आणि पोलीस अंमलदार विशाल क्षीरसागर यांनी यशस्वीपणे पार पाडली. यावेळी नेकनूर पोलिसांनी नागरिकांना सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण करण्याचे आवाहनही केले आहे.
पुलावरील ग्रील, रस्त्यांवरील सुरक्षा साहित्य, शासकीय फलक अथवा इतर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे हा गंभीर गुन्हा असून अशा प्रकारांमुळे इतरांच्या जीवितालाही धोका निर्माण होतो. अशा घटना अथवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ नेकनूर पोलीस स्टेशन किंवा डायल ११२ वर माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
"सार्वजनिक संपत्तीचे रक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपण सर्वांनी जागरूक राहून सुरक्षित समाज घडविण्यास सहकार्य करावे," असे आवाहन प्रभारी अधिकारी मंगेश साळवे यांनी केले आहे.
Mangesh Salve - Inspector

Breaking news केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा..विद्यार्थी आंदोलनाचे मोठे यश..
25/07/2026

Breaking news
केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा..
विद्यार्थी आंदोलनाचे मोठे यश..

चित्रपट सृष्टी मधील बहुतांश चित्रपट हे गरीब नाहीतर मध्यम वर्गीय लोकांच्या आयुष्यावर आधारित असतात पण मध्यम वर्गीय लोकांचा...
23/07/2026

चित्रपट सृष्टी मधील बहुतांश चित्रपट हे गरीब नाहीतर मध्यम वर्गीय लोकांच्या आयुष्यावर आधारित असतात पण मध्यम वर्गीय लोकांचा सामाजिक प्रश्न आला की हे भूरटे लोक अजिबात बोलत नाहीत.

अभिनेता मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीची भूमिका साकारतो तो मोठा होतो पण ते खऱ्या जीवनात मध्यमवर्गाचे प्रतिनिधित्व कधीच करत नाहीत. हिंदी किंवा मराठी चित्रपट सृष्टी मधील एक दोन कलाकार अपवाद वगळता अनेक लोक आज तोंडात भाजपचे गाजर घेऊन गप्प आहेत.

अमिताभ बच्चन ला पेट्रोल ५६ रू लिटर झाले की काँग्रेसच्या काळात वाईट वाटत होत पण आजचे सरकार यांच्या गाडीत ऊसाचा रस टाकतात तरी हे गप्प आहे .

देशभक्तीच्या चॉकलेट वर अक्षय कुमार इतका पैसा या देशात या कॅनेडियन इतका कोणी कमवला नसेल पण विद्यार्थी आंदोलन वर हा काही बोलणार नाही .कारण याला पंतप्रधान मुलखात देतो ना ?

आमिर खान ज्याने लगान चित्रपट केला पण शेतकरी आंदोलन वर काही बोलला नाही.दंगल मधून पैसा छापला पण कुस्तीपटूच्या आंदोलन मधे बोललाच नाही.
३ इडियट मधून विद्यार्थ्यांची भूमिका करून ज्यांच्या जीवावर पैसा कमावला त्या सोनम वांगचुक आणि विद्यार्थी आंदोलन वर बोलत नाही.

काँग्रेसच्या काळात याला “सत्यमेव जयते” कार्यक्रम करायचा किडा झाला होता तोच किडा भाजपच्या काळात याचा बहुतेक “गजनी” झालाय का काय माहीत.

त्यात हा सुनील शेट्टी पण मागे असंच काही तर बरळला होता शाहरुख पण मौन अवस्थेत आहेत तरी सलमान खान याने थोडा फार काल सपोर्ट केला आहे .

Not every hero plays one in real life.😌

21/07/2026

16/07/2026

बीडमध्ये संस्थाचालकाची गुंडगिरी?
शासकीय कार्यालयात महिला कर्मचाऱ्याला शिवीगाळ व तिच्या पतीला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने संताप व्यक्त होत आहे.
दुसरीकडे, बीड जिल्ह्यातील काही संस्थांमध्ये शिक्षकांचे गेल्या चार महिन्यांपासून वेतन थांबविल्याच्या तक्रारीही समोर येत आहेत.
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

10/07/2026

एका जखमी १८ टाके पडलेल्या महिलेला बीड जिल्हा रुग्णालयातील तिसऱ्या मजल्या नेण्यासाठी नातेवाईकांनी अशा प्रकारे झोळी करून नेले.

Prakash Abitkar
Sandeep Kshirsagar
Vijaysinh Pandit - विजयसिंह पंडित
Namita Akshay Mundada
Suresh Dhas

'दृश्यम' चित्रपटातील इन्स्पेक्टर गायतोंडेच्या भूमिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठणारे अभिनेते कमलेश सावंत यांनी नुकतीच एका पॉ...
09/07/2026

'दृश्यम' चित्रपटातील इन्स्पेक्टर गायतोंडेच्या भूमिकेने लोकप्रियतेचे शिखर गाठणारे अभिनेते कमलेश सावंत यांनी नुकतीच एका पॉडकास्टमध्ये 'दृश्यम' चित्रपटाच्या शूटिंगवेळचा एक अतिशय थक्क करणारा आणि तितकाच डोळ्यात अंजन घालणारा प्रसंग शेअर केला. जेव्हा गोव्यामध्ये या चित्रपटाचे शेड्युल सुरू होते, तेव्हा हिंदी प्रोडक्शनच्या काही जबाबदार लोकांकडून त्यांना अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जात होती. दिग्दर्शक निशिकांत कामत यांनी एका मराठी कलाकाराला एवढी महत्त्वाची आणि मोठी भूमिका का दिली, हे तिथल्या हिंदी सिनेसृष्टीतील तथाकथित मोठ्या प्रोडक्शनच्या लोकांना मुळीच पटत नव्हते. या पूर्वग्रहामुळे गोव्याच्या सेटवर कमलेश सावंत यांना साधं बसायला खुर्चीसुद्धा दिली जात नव्हती.

या भेदभावाचा आणि अपमानाचा कमलेश यांनी कोणताही बाऊ केला नाही. शांतपणे बाजूला उभे राहून त्यांनी तिथल्या लोकांच्या डोळ्यांतील अढी आणि संताप अनुभवला. आपल्या गुरूंनी शिकवल्याप्रमाणे समोरच्याचा 'चेहरा वाचण्याची कला' अवगत असल्याने त्यांना तिथला सगळा प्रकार स्पष्ट कळत होता, तरीही त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. गोव्यानंतर जेव्हा चित्रपटाचे पुढील शेड्युल हैदराबादच्या रामोजी फिल्म सिटीमध्ये सुरू झाले, तेव्हा कमलेश सावंत यांचा सुपरस्टार अजय देवगण यांच्यासोबतचा पहिला मोठा सीन लावला गेला. हा अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता आणि संपूर्ण सेटचे डोळे कमलेश यांच्यावर खिळले होते.

कमलेश सावंत कॅमेऱ्यासमोर उभे राहिले आणि त्यांनी अजय देवगण यांच्यासोबतचा तो संपूर्ण सीन अत्यंत ताकदीने 'वन टेक ओके' करून दाखवला. त्यांच्या या जबरदस्त अभिनयाने सेटवरील वातावरण एका क्षणात बदलले. ज्या प्रोडक्शन मॅनेजरने त्यांना गोव्यात खुर्ची देण्याचेही नाकारले होते, तो सीन संपताच स्वतः कमलेश यांच्याकडे आला. त्या हिंदी प्रोडक्शनच्या माणसाने कमलेश यांची जाहीर माफी मागितली आणि कबूल केले की, "सर, आम्ही तुमचे आधीचे काम पाहिले नव्हते आणि निशिकांत सर मराठी असल्याने त्यांनी एका मराठी कलाकाराला उगाचच झुकते माप दिले असा आमचा गैरसमज झाला होता, पण तुमची खरी जागा आज आम्हाला कळली. गायतोंडेच्या रोलसाठी एकदम परफेक्ट कास्ट केलं आहे." एका मराठी अभिनेत्याने आपल्या टॅलेंटच्या जोरावर समोरच्याचा इगो कसा शांत केला, याची ही प्रचिती होती.

आज परळी ते मुंबई या बस मध्ये प्रवास करताना, बस वैद्यकिनी टोल च्या पुढे जेवणासाठी थांबली असता बस चालक जेवायचे सोडून बस ला...
08/07/2026

आज परळी ते मुंबई या बस मध्ये प्रवास करताना, बस वैद्यकिनी टोल च्या पुढे जेवणासाठी थांबली असता बस चालक जेवायचे सोडून बस ला पुढे फोकस लावायचे काम करत होते..
त्यांना विचारलं मी जेवायचं नाही का तर ते म्हणले जेवायच्या अगोदर आपल्याला बसला उजेडाची सोय करावी लागेल..??
मी म्हणालो तुमचे महामंडळ फोकस लावून देत नाही का..??
तर ते म्हणाले त्यांनी आम्हाला कमीतकमी बस ला पुढे जे फॉग लॅम्प असतेत ते तरी बसन द्यावेत.. कारण आता पावसाळा आहे आणि उजेड खूप कमी आहे बसचा..

माझी शासनाला एवढीच विंनती आहे की बस मध्ये कमी जास्त 40 ते 50 प्रवासी असतेत, तर रात्री च्या प्रवासा साठी बस ला चांगल्या प्रकारची उजेडाची सोय करावी..
Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar Pratap Sarnaik

07/07/2026

प्रशासन : नदीकाठी जाऊ नका...

दीडशहाणा : मला काही होत नाही...

पोलीस : बरं... मग इकडे या, शहाणपणाचा रिचार्ज करून देतो! 😂
ऐकत नसेल तर असं ओल्या फोकाने ठोकव लागत..😂

Address

Bhir

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Royal Maharashtra Majha - रॉयल महाराष्ट्र माझा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share