Pimpri-Chinchwad Updates

Pimpri-Chinchwad Updates Pimpri Chinchwad Latest News, Alerts, Jobs, Property and all.

Met the incredible..!! , a  UCI Continental team from Thailand that participated in Asia Tour events like the 2026 Bajaj...
24/01/2026

Met the incredible..!! , a UCI Continental team from Thailand that participated in Asia Tour events like the 2026 Bajaj Pune Grand Tour in India with talented coach Patrice Robustelli, the team of amateur riders balances work and cycling, focusing on resilience and team spirit.

A quick back insta comments with Aood suddenly seen today at and we meet again❣️🫰🏻

ยินดีต้อนรับ
Welcome back
परत या 👏🏼🌠

02/10/2025
महासाधू श्री मोरया गोसावी....कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यात शाली नावाचे गाव आहे. त्यात वामनभट्ट शाळिग्राम आणि पत्‍नी पार्व...
09/09/2024

महासाधू श्री मोरया गोसावी....

कर्नाटकातल्या बिदर जिल्ह्यात शाली नावाचे गाव आहे. त्यात वामनभट्ट शाळिग्राम आणि पत्‍नी पार्वतीबाई नांदत होते. देशस्थ ऋग्वेदी, हरितस गोत्राचे वैदिक वामनभट्ट श्रुतिस्मृतिपुराणोक्‍त गृहस्थाश्रमाचे काटेकोर पालन करत होते. अर्धे अधिक आयुष्य लोटले तरी पुत्रसंतान नाही म्हणून उदास झालेले वामनभट्ट घर सोडून निघाले. पत्‍नी बरोबर मजल दर मजल प्रवास करत मोरगावला आले. कऱ्हेच्या पठारावर विराजमान झालेल्या मोरयाला पाहून त्यांचे चित्त विराले. मनोरथ पूर्ण होईल अशी त्यांना आशा वाटू लागली. पोटी पूत्र व्हावा म्हणून त्यांनी खडतर तपश्चर्या केली. शेवटी मोरया प्रसन्न झाला आणि त्यांच्या पोटी अजन्मा जन्माला आला. पुढे आठव्या वर्षी उपनयन झाले. वेदाध्ययन संपले. मोरयाच्या भेटीसाठी तळमळणाऱ्या मोरयाला योगिराज नयनभारती गोसावी भेटले. त्यांच्या उपदेशाने मोरयाने मुळामुठेच्या काठी थेऊरच्या जंगलात चिंतामणीची घोर तपश्चर्या केली. बेचाळीस दिवसांच्या कठोर अनुष्ठानाने चिंतामणी प्रसन्न झाला. मोरया गोसावी बनले. ’गो’ म्हणजे इंद्रिये, त्यांच्या स्वाधीन झाली. मन मोरयात रमले. शमदम संपन्न गोसावी अष्टसिद्धी प्राप्त करून मोरगावला आले. त्यांच्या सिद्धी गोरगरिबांच्या, दीन दुबळ्यांच्या संकट निवारणासाठी राबू लागल्या. ’बहुत जनासि आधारू’ झालेल्या त्यांच्या पायाशी येऊन लोक कृतकृत्य हो‍ऊ लागले. मोरया गोसावींचा सगळीकडे मोठा बोलबाला झाला. पण यात जनाची उपाधि वाढली. ध्यानधारणेला वेळ मिळेना. एक दिवस अचानक मोरगाव सोडून मोरया गोसावी चिंचवड जवळच्या किवजाईच्या जंगलात आले. एकांतात ध्यानधारणा करू लागले. पण नियती काही वेगळीच होती. चिंचवडकरांनी त्यांना गावात आणले. आजचा वाडा आहे त्या ठिकाणी त्यांना झोपडी बांधून दिली. त्यात राहून मोरया गोसावी सेवा करू लागले.

प्रत्येक महिन्याच्या प्रतिपदेला ते चिंचवड सोडत व मजल दर मजल करत मोरगावला जात. चतुर्थीला मोरयाची पूजा करत. पंचमीला पारणे करून चिंचवडला परत येत. एकदा कऱ्हेला पूर चढला. पाण्याला जबर ओढ होती. एका कोळ्याच्या पोराचे रूप घेऊन मोरया आला. मोरया गोसाव्यांना त्याने कऱ्हेपार केले. एकदा उशीर झाला. देऊळ बंद करून गुरव घरी गेले. मोरया गोसावींची पूजा अंतरायची पाळी आली. मोरया गोसावी तरटीपाशी बसून मोरयाला आळवू लागले. तर मोरया त्यांच्या साठी बाहेर आला. एकदा असाच उशीर झाला तर कुलुपे गळून पडली. मोरया गोसाव्यांनी मोरयाची यथासांग पूजा केली.

हळूहळू चिंचवडचा पसारा वाढला. अन्नदानाला ते फार महत्व देत. अन्नसत्र, सदावर्त, यात्रा, उत्सव, पूजा-अर्चा यामुळे चिंचवड सदाच गजबजू लागले. मंगलमूर्ती मोरयाचा घोष करत, मोरयाचा धर्म वाढवत सन १५६१ मार्गशीर्ष वद्य षष्ठी या दिवशी चिंचवडला पवनेच्या काठी त्यांनी समाधी घेतली. पवनेचा काठ पवित्र झाला. दर्शनासाठी भक्‍तांची पावले चिंचवड कडे वळू लागली.श्रीमोरया गोसावी यांची संजीवन समाधी :

त्या काळी मोरया गोसावींचे माहात्म्य खूप वाढले होते. अनेक प्रकारचे लोक दर्शनाला येत. जनसंपर्कामुळे तपश्चर्येत व्यत्यय येत होता. त्यांनी मयूरेश्वराचा धावा केला. त्या क्षणीच मयूरेश्वराने प्रगटून विचारले, "बोल तुझी काय इच्छा आहे?" मोरया गोसावी म्हणाले, मयूरेश्वरा, मला आता गुप्तवास करण्याची, समाधी घेण्याची इच्छा आहे. त्यामुळे मला अखंड अद्वैत अवस्था भोगता येईल." मयूरेश्वर म्हणाले "अरे तू आणि मी दोन नाहीत. आपण एकच आहोत. मी अखंड तुझ्या हृदयात निवास करीन. जा, तुझ्या इच्छेप्रमाणे सर्व गोष्टी घडतील." असा आशीर्वाद देऊन मयूरेश्वर अंतर्धान पावले.

गेली काही वर्षे मोरया गोसावी देहीच विदेही अवस्था भोगत होते. ते अखंड आत्मानंदात रमलेले असत. समाधानाने व तृप्तीने त्यांनी जिवंत समाधी घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपला विचार आपल्या मुलाला चिंतामणीला सांगितला. त्यांना अतिशय दुःख झाले. वडिलांच्या आज्ञेप्रमाणे पवना नदीच्या काठावर एक पवित्र भूमी पाहून त्या ठिकाणी समाधीसाठी गुंफा तयार केली.

मार्गशीर्ष वद्य षष्ठी शके १४८३, साल १५६१ हा उत्तम दिवस पाहून श्री मोरया गोसावी घरून निघाले. देवळी आले. त्यांच्या बरोबर चिंतामणी महाराज, दोन सुना, नातवंडं असा परिवार होता. गावातले अनेक लोक आधीच घाटावर येऊन बसले होते. सगळीकडे मोरया नामाचा गजर चालू होता. मोरया गोसावींनी स्नान केले. पूजा केली. धौतवस्त्र परिधान केले. मोरया गोसावी गुंफेत उतरले. एक-दीड परस खोलीची गुंफा होती. दहा हात लांब, दहा हात रुंद चिरेबंदी पाषाणांनी बांधून काढलेली. मधोमध पाषाणाचा चौरंग, त्यावर आसन, पुढे आणखी एक चौरंग, त्यावर गणेशपुराण, दोन्ही बाजूला दोन समया तेवत होत्या. मोरया गोसावी आसनावर बसले. चिंतामणी महाराजांनी त्यांच्या गळ्यात फुलांचा हार घातला. सुनांनी औक्षण केले. सगळेजण पाया पडत होते. बघता बघता मोरयांची समाधी लागली. नजर दोन भुवयात स्थिरावली. शरीर ताठ झाले. प्राण ब्रह्मरंध्रात येऊन राहिले. चित्त चैतन्याकार करुन ते आत्मानंदात निमग्न झाले.

चिंतामणी बाहेर आले. एक प्रचंड शिळा उचलून त्यांनी गुंफेवर ठेवली. चितामणी महाराजांनी समाधीवर सिद्धिबुद्धिसहित मोरयाची मूर्ती बसविली. समाधीकडे जायचा रस्ता होता, त्यावर अर्जुनेश्वराची मोठी शाळुंका स्थापन केली. हे समाधिस्थान जागृत आहे. आजही अनेक भक्‍तांना साक्षात्कार होतो. प्रचीती येते.

मोरया

Address

284/4
Chinchwad
411033

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pimpri-Chinchwad Updates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share