Kavi-Dip

Kavi-Dip Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Kavi-Dip, Marketing Agency, Muktainagar, Jalgaon.

आपण सर्वांना सादर नमस्कार. हे माझे फेसबुक चे पेज माझ्या कविता प्रकाशित करण्यासाठी आहे. आपण सर्वांना विनंती आहे की माझ्या कविता लाईक करून आपले अभिप्राय अवश्य कळवावे.
धन्यवाद!

आज बऱ्याच दिवसानंतर कविता लिहिली.आपले अभिप्राय नक्की कळवावे.
03/08/2025

आज बऱ्याच दिवसानंतर कविता लिहिली.आपले अभिप्राय नक्की कळवावे.

20/05/2025

तुम बस अपनी मंजिल तय कर लो रास्ता अपने आप मिल जाता है l

कवी- दीप

18/05/2025
06/06/2021

🌷 *राम कृष्ण हरी* 🌷

आज *छत्रपती शिवराज्याभिषेक* दिनी मी *कवी दीप* माझा काव्य संग्रह *कागद सोबतीला आला* या मधील एक कविता सादर करीत आहे.

*कवितेचे शीर्षक* - *राजे पुन्हा जन्माला या*

तळपती तलवार घेऊन वीर मावळे लढले।
हाता मध्ये शस्त्र घेऊन तुफानांशि भिडले॥

एकात्मतेचे झेंडे रोवून गड-किल्ले चढले।
स्वराज्याचे सावट साऱ्या मावळात जडले॥

दऱ्याखोऱ्या यांची साथ होती शत्रूंवरती मात।
पुढे पुढे सरकत होते करत त्यांचा घात॥

हर हर महादेव गर्जत होते सह्याद्रीच्या कड्यांमध्ये।
दररोज दिवाळी दसरा होता मावळा च्या वाड्यांमध्ये॥

शिवरायांची शब्द होते मावळ्यांची स्पुर्ती।
छत्रपतींच्या रूदयात होती स्वराज्याची मूर्ती॥

स्वराज्याला स्थापण्याची सर्वांची होती साद।
जिजाऊंचे स्वप्न होते भवानीचा आशीर्वाद॥

बळ दिले तलवार दिली भवानीने हाती।
त्याच दमाने वाढली होती स्वराज्याची छाती॥

गड-किल्ले पाहत होते शिवछत्रपतींची वाट।
शिवरायांनी जिंकल्यावर वाढेल त्यांचा थाट॥

या भूमीला मिळवून दिला स्वराज्याचा दर्जा।
राजे पुन्हा जन्माला या! महाराष्ट्र गर्जा॥

🖋️ *कवी- दीपक संतोष पाटील (कवी दीप)*
*सुंदर पातोंडी तालुका मुक्ताईनगर*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

17/05/2021

🌸🍀🚩 *सांग ना!*🚩🍀🌸

*वृत्त- मंजूघोषा*

*सांग ना नाते कशाला जोडले तू ।*
*सुप्त माझ्या भावनांना छेडले तू ॥*

*भोवती गर्दीच होती माणसांची ।*
*एकटे गर्दीत का मज सोडले तू ॥*

*गुंतलो होतो बरा जगतात माझ्या।*
*सांग का बाहेर मजला काढले तू॥*

*मी अता माझा सखे ना राहिलो गे।*
*एवढे माझ्या मनाला भाळले तू ॥*

*प्राण माझा जात होता त्या क्षणाला।*
*केस जेव्हा मोकळे बघ सोडले तू॥*

*कवी- दीपक संतोष पाटील(कवीदीप)*
*सुंदर पातोंडी*
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Address

Muktainagar
Jalgaon
425306

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kavi-Dip posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kavi-Dip:

Share