11/08/2025
2015 साली United Kingdom मधून ग्रॅज्युएशन करणारा "आंद्रे" नावाचा तरुण नेहमीप्रमाणे एकदा बसने प्रवास करत होता. तो आपल्या लॅपटॉपवर काम करणार होता, पण अचानक लक्षात आलं की, महत्त्वाच्या फाइल्स असलेला त्याचा USB पेन ड्राइव्ह घरातच राहिला आहे. त्या क्षणी त्याला झालेली चिडचिड आणि त्रास एवढा होता की, त्यातूनच एका मोठ्या बिझनेस आयडियाचा जन्म झाला. "फाईल्स कुठेही, कधीही, कोणत्याही डिव्हाईसवरून ऍक्सेस करता याव्यात" हे त्याने स्वतःलाच दिलेलं वचन होतं. आणि याच वचनातून EONCLOUD चा जन्म झाला.
"आंद्रे" त्याचा कॉलेजमधला मित्र "पिटर" याला ही कल्पना सांगितली. दोघांनी मिळून फाइल शेअरिंग आणि स्टोरेजसाठी एक सोपा, युजर-फ्रेंडली प्लॅटफॉर्म तयार करण्याचं ठरवलं. त्या काळात लोक पेन ड्राइव्ह, सीडी किंवा ईमेल अटॅचमेंटवरच अवलंबून होते. क्लाउड स्टोरेज हा शब्द अजून सर्वसामान्यांसाठी नवीन होता. पण EONCLOUD ने हे चित्र बदलून टाकलं. फक्त इंटरनेट आणि लॉगिन असलं की, कुठल्याही कॉम्प्युटर किंवा मोबाईलवरून तुमच्या फाइल्स तत्काळ मिळू लागल्या.
सुरुवातीला गुंतवणूकदारांना ही कल्पना फारशी पटली नाही. “लोक हे वापरणार नाहीत” असंही अनेकांनी म्हटलं. पण आंद्रे याने हार मानली नाही. त्याने एक साधा व्हिडिओ बनवून EONCLOUD ची डेमो दाखवली, आणि ती इंटरनेटवर टाकली. काही दिवसांत लाखो लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि साइन-अपसाठी रांगा लागल्या. लोकांना आपल्या फाइल्स कुठेही, कोणत्याही डिव्हाइसवरून सुरक्षितरीत्या मिळणं खूपच सोयीचं वाटलं.
EONCLOUD युजर बेस काही वर्षांतच झपाट्याने वाढला. लाखो युजर्सवरून तो थेट लाखो युजर्सपर्यंत पोहोचला. कंपनीने त्याच्या ‘मॅजिक पॉकेट’ टेक्नॉलॉजीसारख्या इनोव्हेशनद्वारे स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलं, ज्यामुळे फाइल्स अधिक वेगाने आणि सुरक्षितरीत्या साठवल्या जाऊ लागल्या. पुढे त्यांनी AI-आधारित फिचर्स, यूनिव्हर्सल सर्च, आणि टीम कोलॅबोरेशनसाठी साधने विकसित केली.
आज EONCLOD ही केवळ फाइल स्टोरेज कंपनी नसून, ती जगभरातील लाखो प्रोफेशनल्स, कंपन्या आणि क्रिएटर्ससाठी वर्क मॅनेजमेंट आणि प्रॉडक्टिविटी प्लॅटफॉर्म बनली आहे.आणि अजूनही नवनवीन टेक्नॉलॉजी वापरून आपलं स्थान टिकवून आहे.
आंद्रे ची ही कहाणी एका साध्या पण तीव्र निराशेतून सुरू झाली होती. जेव्हा एखादी समस्या आपल्याला रोजच्या जीवनात भेडसावते, आणि आपण तिचं सोल्युशन शोधतो, तेव्हा ती कल्पना जग बदलू शकते याचं हे उत्तम उदाहरण आहे. USB विसरण्यापासून सुरू झालेला प्रवास आज क्लाउड टेक्नॉलॉजीच्या जगात क्रांती घडवणारा ठरला आहे.