25/04/2026
दिव्यांग महिलांच्या प्रश्नांवर गेली ३१ वर्षे अविरतपणे कार्य करणार्या ‘स्वयंदीप’ संस्थेच्या अध्यक्षा मीनाक्षीताई निकम यांनी दिव्यांग महिलांचे पहिले 'क्लस्टर' चाळीसगाव (जि.जळगाव) येथे उभारले आहे. स्वतः दिव्यांग असणाऱ्या मिनाक्षीताई दिव्यांग व विधवा महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक वर्षांपासून 'दान नको काम हवे', या संकल्पेनून काम करीत आहेत.
मिनाक्षीताईंच्या या प्रकल्पात शंभरपेक्षा अधिक दिव्यांग व विधवा महिला अत्याधुनिक व संगणकीकृत शिवणयंत्रांच्या साह्याने गणवेश, ड्रेस, जीन्स, टी शर्ट तयार करीत आहेत. तसेच निवासी प्रकल्पात २५ दिव्यांग महिला कार्यरत आहेत. प्रकल्पाला मुंबई व अहमदाबाद येथील कंपन्यांकडून कामाच्या ऑर्डर मिळत आहेत.
या प्रकल्पाला नुकतीच भेट दिली. शेकडो महिलांच्या जीवनात बदल घडविणारा हा प्रकल्प राष्ट्रीय पातळीवर कसा पोहचेल ? या विषयावर कंटेंट ओशन इन्फोटेक प्रा.लि. कंपनीतर्फे सर्व संचालक डॉ.युवराज परदेशी, श्री.तुषार भांबरे व श्री.रजत भोळे यांनी मिनाक्षीताई यांच्यासह संपूर्ण टीमसोबत संवाद साधला. यावेळी कंटेंट ओशनचे मार्गदर्शक श्री.रत्नाकरदादा पाटील व श्री.अनिल भोकरे सर उपस्थित होते.