16/11/2014
नमस्कार, मी डॉ. भोर,
पुणे जिल्ह्याचे जिल्हा आआरोग्य अधिकारी डॉ. नंदकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०११ पासून कायापालट उपक्रमांतर्गत आम्ही सारे डॉक्टर्स कार्यरत आहोत.
मॉडेल PHC म्हणून निवडण्यात आलेल्या ११ आरोग्य केंद्रांपैकी १ आरोग्य केंद्र सावरगावचे देखील आहे. या आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी वर्गात अद्ययावत ज्ञान व कौशल्य वाढवण्यास फायदेशीर होतील असे निरनिराळ्या विषयांवरील फ्लेक्स बोर्ड, मिटिंग हॉल, प्रसूतिगृह, शस्त्रक्रिया गृह, प्रयोगशाळा, संगणक कक्ष, वैद्यकीय अधिकारी कक्ष व आंतररुग्ण विभाग या ठिकाणी लावण्यात आले. त्याचप्रमाणे रुग्ण व रुग्णांचे नातेवाईक तसेच इतर नागरिकांना आरोग्य शिक्षण, सोई सुविधा आणि शासनाच्या विविध आरोग्यविषयक योजनानाची माहिती/ जागृतीदाखविणारे फ्लर्क्स बोर्ड, सूचकफलक, सूचनाफलक तसेच संदेश फलक हे हिरकणी कक्ष, डॉटस कॉर्नर, ORT कॉर्नर, डे केअर सेंटर, लसीकरण कक्ष, या ठिकाणी लावण्यात आले आहेत. शिवाय हिवताप, कुष्ठरोग क्षयरोग, कुटुंब कल्याण, एम.सी.टी.एस., लसीकरण औषध भांडार, वैद्यकीय अधिकारी कक्ष, आरोग्य सहाय्यक कक्ष, इ. विविध विभागाचे रजिस्टर, फाईल चार्ट, इ. साहित्य एकत्रितपाने श्रद्धा प्रिंटींग प्रेस यांच्याकडून उपलब्ध झाले. त्यासाठी नवीन माहिती व संकल्पना व त्यानुसार वेळोवेळी प्रसिद्धी साहित्य व स्टेशनरी मध्ये बदल करून अत्यंत उपयुक्त व अद्ययावत असे मटेरिअल श्रद्धा प्रिंटींग प्रेस ने तयार करून दिले. याबद्दल त्यांचे मनापासून आभार धन्यवाद ...!!!