17/06/2026
मराठी चेंबर ऑफ कॉमर्स कोल्हापूर ब्रांच यांच्या सहयोगाने RAMP अंतर्गत MSSIDC ( Supported by world Bank ) , WX Consultant, स्वयम् शक्ती, समर्थ उद्योजक अकॅडमी ईश्वरपूर तर्फे आज रेडियंट हॉटेल येथे GEM Portal ( Govt. E- Market ) आणि IPR ( Intellectual Property Rights ) या दोन दिवशीय फ्री कार्यशाळेची सुरुवात झाली. पुणे वरून आलेले GEM ट्रेनर चेतन माने यांनी खूप चांगल्या प्रकारे GEM विषयी माहिती दिली. मराठी चेंबर ऑफ कॉमर्स कोल्हापूर ब्रँच ने पुढाकार घेऊन रेडिएंट हॉटेल सारख्या ठिकाणी एसी हॉल आणि अल्पपोहाराची सोय करून या कार्यक्रमाची उंची वाढवण्याचा प्रयत्न केला. चेंबरचे कोल्हापूरचे सेक्रेटरी बाबा खोडवे यांनी एमसीसी विषयी माहिती दिली तसेच अध्यक्ष राजन चौगुले साहेब यांनी सर्वांना ट्रेनिंग विषयी आणि एमसीसी मध्ये सहभागी होण्यासाठी अपील केली. GEM पोर्टल वरती गेल्या नऊ वर्षांमध्ये दहा लाख कोटींचा व्यवहार झाला आहे तसेच 13 लाख उद्योजक या प्लॅटफॉर्म वरती आले आहे. खास करून महाराष्ट्र मध्ये याची उंची जास्त गाठणे आवश्यक आहे. त्यासाठी मराठी उद्योजकांनी ह्या पोर्टल बाबत जाणून घेऊन आपला उद्योग जेम पोर्टल वरती रजिस्टर करावा आणि जास्त बिझनेस करावा ही आपेक्षा. या कार्यशाळेसाठी आपले ईश्वरपूरचे संघटक आणि कमिटी मेंबर उत्तम पाटील यांचा सहभाग आणि मॅनेजमेंट उल्लेखनीय होती त्यांचे खूप धन्यवाद . MCC Kop कमिटी चे मुख्य संघटक धनंजय पाटील , जयसिंग हवालदार, वर्षा संकपाळ मॅडम, गजानन कुलकर्णी आणि इतर उपस्थित होते. उद्या 18 जून रोजी होणाऱ्या IPR ट्रेनिंग साठी जास्तीत जास्त उद्योजकांनी हजर राहून फायदा घ्यावा.
बाबा खोडवे, सचिव, MCC KOLHAPUR