15/06/2026
हॅश टॅग बाप्पा सन्मान २०२५
मुंबईतील नामांकित आणि उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गणेश मंडळांचा गौरव सोहळा संपन्न...
मुंबईतील गणेशोत्सव जागतिक स्तरावर पोहचवण्यास मोलाचे सहकार्य करणाऱ्या अवलियांचा विशेष सन्मान...
रोहित गावडे अकाउंट्स ह्या क्षेत्रात नोकरी सांभाळत असून ह्या कलेची आवड जोपासत आहेत, रोहित ह्यांनी ह्या कामाला सुरुवात माननीय विजय खातू सर यांच्या कार्यशाळेत २००३ पासून केली त्यांचा सहवासात राहून त्यांनी आखणी चे काम शिकले आणि त्यांनी घडविलेल्या अप्रतिम मूर्त्यांची आखणी करण्याची संधी त्यांना मिळाली . तसेच अरुण दत्ते, बागवे बंधु ,किरण जाधव, प्रशांत मेस्त्री, निलेश गावडे, प्रणय वसते ह्या मूर्तिकारांकडे आखणीचे काम केले आहे. सद्या सिद्धेश दिघोळे ह्या मूर्तिकाराकडे ते कार्यरत आहे, त्यांनी आखणी केलेल्या मंडळाची नावे अखिल चंदनवाडी, चिंचपोकळी चा चिंतामणी ९९ वर्ष आणि १०० व वर्ष , काळाचौकी चा महागणपती , कांदिवली चा श्री , डोंबिवली चा इच्छापूर्ती, डोंगरीचा राजा, उमरखाडी, खेतवाडी ११वी , ७वी , ६वी, २री गल्ली, गिरणगाव चा राजा, परळ चा विघ्नहर्ता , प्रगती सेवा मंडळ, लोअर परळच्या लाडका , तुळशीवाडी , घाटकोपर चा राजा , अंधेरी चा विघ्नहर्ता , नटराज मार्केटचा राजा, कोल्हापूर चा चिंतामणी , म्हालारी ग्रुप सुरत, सासूनडोक चा राजा असे बरेच काही मंडळाच्या गणपती आणि देवींच्या आखण्या केल्या आहेत.
सन्मान मूर्ती श्री रोहित गावडे
( आखणीकर )
पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांचे अभिनंदन...
#हॅश_टॅग_बाप्पा_सन्मान_२०२५