03/01/2020
https://m.facebook.com/story.php?story_fbid=525890984683228&id=114352015837129
१ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी भिडे वाड्यात जोतिराव आणि सावित्रीमाईंनी मुलींची शाळा काढली. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली या शाळेत सावित्रीमाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही २-३ मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या.
सुरुवातीला शाळेत सहा मुली होत्या, पण १८४८ साल संपेपर्यंत ही संख्या ४०-४५ पर्यंत जाऊन पोहोचली. या यशस्वी शाळेचे स्वागत सनातनी उच्च वर्णीयांनी "धर्म बुडाला.... जग बुडणार.... कली आला...." असे सांगून केले. सनातन्यांनी विरोध केला. अंगावर शेण फेकले. काही उन्मत्तांनी तर अंगावर हात टाकण्याची भाषा केली. अनेक संघर्ष करत हा शिक्षणप्रसाराचा उपक्रम चालूच राहिला. घर सोडावे लागले. सगुणाऊ सोडून गेली. अनेक आघात होऊनही सावित्रीमाई डगमगल्या नाहीत.
पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतिपत्नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला आणि शाळांना सरकारी अनुदानही देऊ केले. त्यानंतरही. सावित्रीमाई फुल्यांनी, भारतातल्या त्या पहिल्या शिक्षिकेने आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले. त्यांनी ’गृहिणी’ नावाच्या मासिकात काही लेखही लिहिले आहेत.
स्त्री शिक्षणाचा पाया रचुन , अनंत अडचणींवर मात करत देशातील मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या, महिलांसाठी शिक्षण,साहित्य,क्रीडा, कला,पोलीस, कलेक्टर,डाॅक्टर,मंत्री,आमदार ,खासदार , प्रधानमंत्री, राष्ट्रपती,वैमानिक , नाविक दल,वकील अशा असंख्य क्षेत्रात जे काही प्राविण्य मिळविलं आहे ते सावित्रीमाई जोतीराव फुले यांनी केलेल्या संघर्षाची देण आहे,पहिल्या शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!!l