25/10/2021
स्मार्ट गुंतवणूक; मल्टी असेट श्रेणीत 'या' योजनेने दिला दमदार परतावा
मुंबई : म्युच्युअल फंडाच्या मल्टी असेट श्रेणीने गेल्या एक, दोन आणि पाच वर्षांत गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला आहे. यात सर्वाधिक परतावा आयसीआयसीआय प्रुडेन्शियलच्या मल्टी असेट फंडाने दिला आहे. या फंडाने एक, दोन आणि ५ वर्षांत अनुक्रमे ६४.८%, २५.६८% आणि १४.९५% परतावा दिला आहे.
'SBI'ची बंपर ऑफर; बाजारभावापेक्षा कमी किंमतीत फ्लॅट खरेदीची संधी, कशी ते जाणून घ्या
भारतीय शेअर बाजार सध्या ६१ हजार अंकांच्या आसपास व्यवहार करीत आहे. गेल्या ४ दिवसांत यात अस्थिरता पाहावयास मिळाली आहे. असेट अलोकेशन (मालमत्ता वाटप)बाबत गुंतवणूकदारांनी सावधता बाळगावी असा सल्ला गेल्या काही महिन्यांपासून बाजारातील तज्ज्ञ देत आहेत. अशा परिस्थितीत, मल्टी असेट फंड गुंतवणूकदारांसाठी एक चांगला पर्याय घेऊन येतात.