Omkesh Munde

Omkesh Munde Social media marketing strategist

Facebook,Instagram,WhatsApp,YouTube, Google ads/marketing expert

आमच्या परळी मध्ये पण भुकंपाचा सौम्य धक्का....!तुमच्याकडे काय परिस्थिती? कमेंट मध्ये सांगा
11/04/2026

आमच्या परळी मध्ये पण भुकंपाचा सौम्य धक्का....!
तुमच्याकडे काय परिस्थिती? कमेंट मध्ये सांगा

          entrepreneur NameList BusinessBooster whatsappstatus whatsappbusiness
08/04/2026

entrepreneur NameList BusinessBooster whatsappstatus whatsappbusiness

"फक्त कष्ट करून कोणीच करोडपती होत नाही, नाहीतर आज मजूर सगळ्यात श्रीमंत असता!"​हे वाक्य कदाचित अनेकांना खटकतं, पण व्यवसाय...
27/03/2026

"फक्त कष्ट करून कोणीच करोडपती होत नाही, नाहीतर आज मजूर सगळ्यात श्रीमंत असता!"

​हे वाक्य कदाचित अनेकांना खटकतं, पण व्यवसायाच्या जगातलं हे सगळ्यात मोठं आणि कडवं सत्य आहे. कष्टाला जेव्हा 'सिस्टम'ची (System) जोड मिळते, तेव्हाच त्याचं रूपांतर संपत्तीत होतं.
​याकडे बघण्याचे दोन मुख्य दृष्टिकोन आहेत:

​1) सुरुवात शून्यातून असेल, तर कष्ट अनिवार्य आहेत!
​जर तुमच्याकडे आज मोठं भांडवल नाही, पैसा नाही किंवा कोणताही वारसा नाही, तर तुम्हाला सुरुवातीला शारीरिक आणि मानसिक कष्ट करावेच लागतील. स्वतः शटर उघडण्यापासून ते डिलिव्हरी करण्यापर्यंत सगळं स्वतः करावं लागेल. तो काळ तुमच्या संघर्षाचा असतो आणि तिथे कष्टाला पर्याय नाही.

​2) पैसा असूनही कष्ट करत असाल, तर तुम्ही चुकताय!
​अनेक व्यवसायिक असे आहेत ज्यांच्याकडे आता खेळतं भांडवल आहे, पैसा आहे, पण तरीही ते स्वतःला कामातून मोकळं करत नाहीत.
​जर पैसा असूनही तुम्हीच दुकानावर बसताय...
​जर पैसा असूनही प्रत्येक छोटा निर्णय तुम्हीच घेताय...
तर लक्षात ठेवा, तुम्ही व्यवसाय वाढवत नाहीये, तर तुम्ही आयुष्यभर कष्ट करण्यासाठी स्वतःला 'अडकवून' घेतलं आहे. सिस्टम न लावल्यामुळे तुम्हाला मरेपर्यंत काम करावं लागेल आणि तुमची प्रगती एका जागी थांबेल.

​3) यशस्वी उद्योजकाचं 'गुपित' काय?
​जगातील यशस्वी लोक आयुष्यभर कोल्ह्यासारखे राबत नाहीत. ते सुरुवातीचे काही दिवस किंवा वर्ष प्रचंड कष्ट करतात, पण त्या कष्टाचा उपयोग कशासाठी करतात?
​ते माणसं जोडतात.
​ते टेक्नॉलॉजी वापरतात.
​ते कामाची एक यंत्रणा (System) उभी करतात.

​एकदा का सिस्टम उभी राहिली की, ते स्वतः कामात नसले तरी त्यांचा व्यवसाय त्यांना पैसे कमावून देत राहतो. ते आयुष्यभर 'कामासाठी' जगत नाहीत, तर त्यांनी बनवलेली सिस्टम त्यांच्यासाठी काम करते.

​कष्ट हे 'इंजिन' आहे, पण सिस्टम हे 'स्टिअरिंग' आहे. फक्त इंजिन असून चालत नाही, त्याला दिशा देणारं स्टिअरिंग हवं.

​ठरवा... तुम्हाला आयुष्यभर फक्त कष्ट करत राहायचं आहे, की थोडा काळ कष्ट करून आयुष्यभर कमावून देणारी सिस्टम उभी करायची आहे?
​निवड तुमची आहे!

​© ओमकेश मुंडे
बिझनेस कन्सल्टंट,
#पत्ता: केदारेश्वर होटलच्या बाजूला, बसस्थानक समोर, परळी-वै.
#मो.9146101663

धंदा वाढवायचा आहे पण समजत नाहीये,नक्की सुरुवात कुठून करू? 🚩​तुमच्या व्यवसायातील मरगळ झटकून टाका आणि नफ्याचा नवा मार्ग धर...
09/03/2026

धंदा वाढवायचा आहे पण समजत नाहीये,नक्की सुरुवात कुठून करू? 🚩
​तुमच्या व्यवसायातील मरगळ झटकून टाका आणि नफ्याचा नवा मार्ग धरा! 🚀

​आम्ही घेऊन आलो आहोत, खास मराठी व्यावसायिकांच्या समस्यांवर उपाय देणारे ई-बुक:

📘 "व्यवसाय यशगाथा: समस्या सोडा, नफा वाढवा"
(महाराष्ट्रातील उद्योजकांसाठी एक संपूर्ण मार्गदर्शिका)

​या १००+ पानांच्या ई-बुकमध्ये तुम्हाला काय मिळेल?
✅ व्यवसायातील रोजच्या कटकटी आणि समस्या कशा सोडवाव्या?
✅ कमी खर्चात जास्तीत जास्त मार्केटिंग करण्याचे गुपित.
✅ तुमचा व्यवसाय तुमच्याशिवाय 'ऑटोमॅटिक' कसा चालवायचा?
✅ नफा वाढवण्यासाठी आणि ब्रँड बनवण्यासाठी प्रॅक्टिकल फॉर्म्युले.
✅ व्यवसायिकांच्या सवयी कशा असाव्यात? व्यवसायिकांची दिनचर्या कशी असावी.
✅ कॅश फ्लो मॅनेजमेंट कसे करावे?
✅ स्टाफला कशाप्रकारे हाताळावे?
✅ व्यवसाय वाढीसाठी मुद्देसूद फॉर्म्युले

E book price:99₹

​💥 खास ऑफर:
हे ई-बुक आजच घेणाऱ्या पहिल्या १०० व्यवसायिंकासाठी आमचा 'बिझनेस मास्टर क्लास' पूर्णपणे मोफत! 🎁

​तुमच्या व्यवसायाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी हे एक पुस्तक पुरेसे आहे.

​👇 लगेच खालील लिंकवर क्लिक करा आणि तुमचे ई-बुक डाऊनलोड करा! लिंक कमेंट मध्ये.

#मराठीउद्योजक #व्यवसाययशगाथा BusinessGrowth

तुमचा व्यवसाय चालू आहे…पण मनासारखी वाढ होत नाहीये?👉 चुका कुठे होतायत हे कळत नाहीये?👉 निर्णय बरोबर आहेत का याची खात्री ना...
19/02/2026

तुमचा व्यवसाय चालू आहे…
पण मनासारखी वाढ होत नाहीये?
👉 चुका कुठे होतायत हे कळत नाहीये?
👉 निर्णय बरोबर आहेत का याची खात्री नाही?
तुमच्यासाठी खास 200 प्रश्नांची व्यवसाय तपासणी यादी
✅ तुमच्या व्यवसायातील कमतरता ओळखा
✅ सुधारण्याचे स्पष्ट दिशानिर्देश मिळवा
🎁 पूर्णपणे मोफत (फक्त पहिल्या 99 व्यवसायिकांसाठी)
आत्ताच अ‍ॅप डाउनलोड करा.

Application link:

https://play.google.com/store/apps/details?id=com.bpafcs.cdpvnt

Telecacaller पदासाठी त्वरित महिला उमेदवार नेमणे आहेत.....!पात्रता:•उत्तम संवाद कौशल्य.जागा:04पगार:8000/-विश्वमोहिनी ट्रे...
15/01/2026

Telecacaller पदासाठी त्वरित महिला उमेदवार नेमणे आहेत.....!

पात्रता:
•उत्तम संवाद कौशल्य.

जागा:04
पगार:8000/-

विश्वमोहिनी ट्रेडर्स,
पत्ता: केदारेश्वर हॉटेल च्या बाजूला, बस स्थानक समोर, परळी-वै.
मो.9146101663

त्वरित नेमणे आहेत.....!इच्छुकांनी दिनांक 24/12/2025 रोजी आपला बायोडाटा घेऊन खालील पत्त्यावर हजर रहावे.
20/12/2025

त्वरित नेमणे आहेत.....!
इच्छुकांनी दिनांक 24/12/2025 रोजी आपला बायोडाटा घेऊन खालील पत्त्यावर हजर रहावे.

व्यवसाय आहे? पण ग्राहक कमी आहेत?WhatsApp वरून विक्री दररोज कशी आणायची. हे शिकवणारा वर्कशॉप!🟢 2 तासांचा LIVE वर्कशॉप🟢 सुर...
25/11/2025

व्यवसाय आहे? पण ग्राहक कमी आहेत?
WhatsApp वरून विक्री दररोज कशी आणायची. हे शिकवणारा वर्कशॉप!

🟢 2 तासांचा LIVE वर्कशॉप
🟢 सुरुवातीपासून अॅडव्हान्सपर्यंत
🟢 WhatsApp यूजर्सना कसे टार्गेट करायचे हे शिकवणारा वर्कशॉप.

✨ WhatsApp Lead Generation
✨ Business Tools
✨ Automation
✨ ऑर्डर, फॉलोअप, मेसेजिंग स्ट्रॅटेजी
🎯 तुमच्या फोनवरून रोज विक्री कशी वाढवायची. A to Z!
👉 ग्राहक कसे मिळवायचे
👉 WhatsApp Business सेटअप
👉 Automation, Replies, Broadcast
👉 WhatsApp वरून ऑर्डर कशी घ्यायची

दिनांक:30/11/2025
वार: रविवार
वेळ: दुपारी 12 ते 2

फी: फक्त ₹100/-

नोंदणीसाठी संपर्क:
ओमकेश मुंडे सर,
(Social media strategist)
9146101663

रजिस्ट्रेशन ग्रुप लिंक कमेंट मध्ये.

06/11/2025
🌸 “संधी पाहणं आणि ती पकडणं,हाच खरा व्यवसाय!” 🌸हा मुलगा चि.क्षितीज फक्त आठवीत शिकतो.दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि म...
18/10/2025

🌸 “संधी पाहणं आणि ती पकडणं,हाच खरा व्यवसाय!” 🌸

हा मुलगा चि.क्षितीज फक्त आठवीत शिकतो.
दिवाळीच्या सुट्ट्या सुरू झाल्या आणि मित्र खेळायला गेले, पण याने काय केलं माहीत आहे का?
रस्त्याच्या कडेला चटई टाकून, रंगीबेरंगी रांगोळी विकायला बसला!

हो, हीच ती "छोटी सुरुवात" ज्यातून मोठे व्यवसाय जन्म घेतात.
आई घरकाम करते,वडील टेलरिंगचं काम करतात‌.

पण या मुलाने त्यांच्या संघर्षात अजून रंग भरायचं ठरवलंय.

खरंतर,क्षितीज च्या आई-वडिलांच पण मनापासून कौतुक! त्यांनी चि.क्षितीजला हि संधी उपलब्ध करून दिली.

हा मुलगा काम करत नाही,
हा मुलगा व्यवसाय करतो!
आणि यात काही चुकीचं नाही.कारण तो स्वतःच्या पायावर उभा राहतोय,
स्वतःसाठी, कुटुंबासाठी, आणि कदाचित आपल्या भविष्यासाठीही काहीतरी करत आहे.

त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य सांगतं होतं.
“हो, मी लहान आहे, पण माझे स्वप्न मोठे आहेत!” 💪✨

👉 आज आपण मोठे असूनही "वेळ नाही", "संधी नाही" असं म्हणतो...
पण या छोट्या उद्योजकाने दाखवून दिलं की,
संधी शोधायची नसते,ती निर्माण करायची असते.

दिवाळी आली की रांगोळी सगळीकडे लागते,
आणि या मुलाने त्या सिझनला बिझनेसचं रूप दिलंय.
हा फक्त रांगोळी विकत नाही,
हा आत्मविश्वास, कष्ट आणि प्रेरणा विकतोय.

"ज्याच्याकडे काही नाही,तो काहीतरी करतो;
ज्याच्याकडे सगळं आहे, तो कारणं देतो."यावर विचार करा.

या मुलाला सलाम 🙌
आणि जर तुम्हाला हा पोस्ट आवडला असेल.
तर फक्त शेअर करू नका,
एखाद्या छोट्या विक्रेत्याकडून आज काहीतरी जरूर खरेदी करा.
तो विकतो तेवढंच नाही,
तो तुमच्या “प्रोत्साहनाने” आपला आत्मविश्वास विकत घेतो. 💖

परळी वै.शहरात आपण रांगोळी खरेदी साठी जात असाल तर,चि.क्षितीजला नक्की भेट द्या.आणि त्याच्याकडून खरेदी करा.खरचं खूप गुणी आणि खूप छानसे व्यवसायिक गुण असणारा,हा गोड मुलगा आहे.

चि.क्षितीज,खूप-खूप मोठा उद्योजक हो!
चि.क्षितीज तुला पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा! बाळा.

© ओमकेश मुंडे,
Social media strategist,
मो.9146101663

Address

Behind Rajesh Medical, In Front Of Bus Stand, Parali-v
Parli
431515

Opening Hours

Monday 1pm - 11pm
Tuesday 1pm - 11pm
Wednesday 1pm - 11pm
Thursday 1pm - 11pm
Friday 1pm - 11pm
Sunday 7am - 11pm

Telephone

+919146101663

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Omkesh Munde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Omkesh Munde:

Share