Bhimshakti

Bhimshakti शिवराय, फुले,शाहु,आंबेडकर चळवळीच्या प्रसारासाठी सदैव कार्यरत.

दीड दिवसाच्या शाळेतून हद्दपार झालेला बेमिसाल जगविख्यात विद्यार्थी, जगातील एकोणतीस भाषेमध्ये ज्यांचे साहित्य भाषांतरीत  झ...
01/08/2021

दीड दिवसाच्या शाळेतून हद्दपार झालेला बेमिसाल जगविख्यात विद्यार्थी, जगातील एकोणतीस भाषेमध्ये ज्यांचे साहित्य भाषांतरीत झाले असे महान साहित्यिक, संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार, महान मानवतावादी लेखक, कलाकार, पत्रकार, कवी, गितकार,पोवाडेकार,चित्रपट पटकथा लेखक,जागतिक कामगार चळवळीचे नेते, *विश्वसाहित्यभुषण अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त सर्वं समाज बांधवांना खुप खुप शुभेच्छा...
व त्यांच्या पावन स्मृतींना विनम्र अभिवादन
💐💐🙏🙏🙏🙏💐💐
शुभेच्छुक :भिमशक्ती युवामंच पानशेत विभाग सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते.

आधुनिक भारताचे भाग्यविधाते, आरक्षणाचे जनक यशवंत जयसिंगराव घाटगे म्हणजेच छत्रपती शाहू महाराज. २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर ...
26/06/2021

आधुनिक भारताचे भाग्यविधाते, आरक्षणाचे जनक यशवंत जयसिंगराव घाटगे म्हणजेच छत्रपती शाहू महाराज. २६ जून १८७४ रोजी कोल्हापूर येथे त्यांचा जन्म झाला. शाहू महाराज नावाप्रमाणेच यशवंत राहिले. भारतमातेच्या पोटी अनेक थोरांनी, संतांनी, महंतांनी, राजांनी, महाराजांनी, समाज सुधारकांनी जन्म घेऊन भारतातील गोरगरीब दीन दुबळ्यांची मनोभावे सेवा केलेली आहे.
शाहू महाराजांचा जन्म जून २६, इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे अप्पासाहेब तर
आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल २, इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे मे ६, इ.स. १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.
शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इ.स. १९१९ साली सवर्ण व अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इ.स. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी [ संदर्भ हवा ] त्यांनी इ.स. १९१६ साली निपाणी येथे ‘डेक्कन रयत असोसिएशन’ ही संस्था स्थापली. वेदोक्त मंत्र म्हणण्याच्या अधिकारावरून झालेला वेदोक्त संघर्ष शाहू महाराजांच्याच काळात झाला. ‘शाहू छत्रपती स्पिनिंग अँड वीव्हिंग मिल’, शाहुपुरी व्यापारपेठ, शेतकर्‍यांची सहकारी संस्था, शेतकी तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी ‘किंग एडवर्ड अ‍ॅग्रिकल्चरल इन्स्टिट्यूट’ इत्यादी संस्था कोल्हापुरात स्थापण्यात त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी, शेतकर्‍यांना कर्जे उपलब्ध करून देणे अश्या उपक्रमांतूनही त्यांनी कृषिविकासाकडे लक्ष पुरवले. त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी, तसेच मूकनायक वृत्तपत्रासाठीही सहकार्य केले होते. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिले.
बहुजन व मागासवर्गीय समाजातील मुला-मुलींना परिपूर्ण शिक्षण मिळाल्याशिवाय त्यांचा बौद्धिक, सामाजिक व आर्थिक विकास शक्य नाही हे महाराजांनी हेरले व ५०० ते १००० लोकवस्तीच्या गावाला शाळांची निर्मिती केली व शिक्षण सक्तीचे केले, एवढे करून न थांबता त्यावरील शुल्क माफ केले. जे पालक आपल्या पाल्यांना रोज शाळेत पाठविणार नाही अशा पालकांना प्रतिमहिना एक रुपया दंड आकारण्याची कायदेशीर तरतुदही केली. तसेच त्यांनी वसतीगृहे उभे केलीत, गरिब विद्यार्थ्यांसाठी तर त्यांनी आपला राजवाडाच खुला केला. यामुळे बहुजन व दलित समाजातील विद्यार्थी-विद्यार्थीनींना शिक्षणाचे दरवाजे खुले झालेत.

८ सप्टेंबर १९१७ रोजी सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा जाहिरनामा काढला. २१ मे १९१९ रोजी आर्थिक दृष्टय़ा दुर्बल विद्यार्थ्यांना फी माफीचा निर्णय घेतला. १ जानेवारी १९१९ रोजी आज्ञा देवून प्राथमिक शाळा व महाविद्यालयातील अस्पृश्य मुलांना स्पृश्य मुलांसारखीच समानतेची वागणूक द्यावी म्हणून शिक्षण खात्याला आदेश दिला. ३० सप्टेंबर १९१९ रोजी अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा बंद केल्यात. ६ जुलै १९०२ मागास जातींना नोकरीत ५० टक्के जागा राखीव ठेवण्याची घोषणा केली. २३ पेब्रुवारी १९१८ ला कुलकर्णी वतने बंद, तलाठी सुरू. आंतरजातीय विवाह कायदा १५ एप्रिल १९२० नाशिक येथे उदोजी मराठा विद्यार्थी वसतीगृहाचा कोनशिला समारंभ केला. १९ नोव्हेंबर १९२१ मध्ये रायगड येथे शिवस्मारकाचा पायाभरणी समारंभ प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते झाला. तसेच सिंधूदुर्ग जिल्ह्य़ातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा जिर्णोद्धार ही केला. १६ फेब्रुवारी १९२२ दिल्लीत भरलेल्या अखिल भारतीय अस्पृश्य परिषदेचे ते अध्यक्ष होते.

राजश्री शाहू महाराज
१. मूळ नाव यशवंत अप्पासाहेब घाटगे.

२. जन्म आणि ठिकाण २६ जून १८७४ कागल.

३. मृत्यू आणि ठिकाण ६ मे १९२२ मुंबई.

४. वडिलांचे नाव अप्पासाहेब.

५. आईचे नाव राधाबाई.

६. राज्यकारभार २८ वर्ष (१८९४ – १९२२ ).

७. दत्तक दिनांक १७ मार्च १८८४.

८ दत्तक घेतल्या नंतरचे नाव छत्रपती शाहू महाराज

९ राज्यभिषेक दिनांक २ एप्रिल १८९४.

आमचे बंधु.शिवराय, फुले, शाहु, आंबेडकर चळवळिचे कर्तुत्ववान ,अभ्यासु नेते.भिमशक्ती युवांमंच पानशेत विभागाचेअध्यक्ष. आयु. भ...
01/06/2021

आमचे बंधु.
शिवराय, फुले, शाहु, आंबेडकर चळवळिचे कर्तुत्ववान ,अभ्यासु नेते.
भिमशक्ती युवांमंच पानशेत विभागाचे
अध्यक्ष. आयु. भिकाजी गायकवाड.

आंबेडकरी चळवळीसाठी अविरत योगदान देणारे
भिमशक्ती युवामंचे पानशेत विभागाचे,
सेक्रेटरी,
आयु.दिपक मोरे

फुले, शाहु ,आंबेडकरी चळवळीत तन मन धनाने काम करणारे
आमचे आधारस्तंभ.
आयु.रविंद्रजी कांबळे.

वेल्हे तालुक्यात सामाजिक क्षेत्रात सतत कार्यशील असणारे
आंबेडकरी विचारवंत.
भिमशक्ती युवामंचचे
सल्लागार
आयु.लहु गायकवाड
यां सर्व परिवर्तनवादी, पुरोगामी,बहुजनवादी चळवळीतील योद्धांना जन्मदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा.
आपणास निरोगी दिर्घायुष्य लाभो.
हिच तथागत चरणी प्रार्थना.
🎂🎂🎂

शुभेच्छुक :
भिमशक्ती युवामंच.
पानशेत विभाग.
त्रिरत्न सम्यक संघ.
कुरण बु!!.

नवकोटींची आई माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.
27/05/2021

नवकोटींची आई माता रमाई यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन.

२६ मे, २०२१ रोजी..‌.🌻🌕🌹   *वैशाख पौर्णिमा*   🌹🌕🌻१.  ही पौर्णिमा मे महिन्यात येते.   बुद्ध धम्माच्या अनुयायांसाठी  ही सर्...
26/05/2021

२६ मे, २०२१ रोजी..‌.
🌻🌕🌹 *वैशाख पौर्णिमा* 🌹🌕🌻

१. ही पौर्णिमा मे महिन्यात येते.
बुद्ध धम्माच्या अनुयायांसाठी
ही सर्वात महत्त्वाची पौर्णिमा
‌‌आहे. या पौर्णिमेला *त्रिगुणी पौर्णिमा* असे म्हणतात. याच पौर्णिमेला सिद्धार्थ गौतमाचा महामाया व राजा शुद्धोदन यांचा पुत्र म्हणून लुंबिनी वनातील शाल वृक्षाखाली जन्म झाला.
२. महामाया ही मोठ्या लवाजम्यासह बाळंतपणासाठी आपल्या पित्याच्या घरी पालखीतून जात होती. सुंदर व मनोरम अशा लुंबिनी वनात जाताना महामायेच्या मनात तेथे
काही वेळ थांबण्याची इच्छा निर्माण झाली.
३. या वनात थांबली असताना व शाल वृक्षाची फांदी हातात धरली असताना तिने उभ्यानेच मुलाला जन्म दिला.🍁🍁🍁🍁🍁 *संकलन...🇪🇺डॉ.आंबेडकर आणि आम्ही...ग्रुप.*🍁🍁🍁🍁🍁
४. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या जन्माचे अत्यंत सुंदर असे वर्णन *भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म* या ग्रंथात केले आहे. बाबासाहेब लिहितात :-
५. "पात्रातील तेलाप्रमाणे महामायेने दहा महिने बोधिसत्त्वाला आपल्या गर्भात धारण केले. तिचा प्रसूतीकाळ जवळ येऊ लागताच प्रसूतीसाठी आपल्या माहेरी जाण्याची तिने इच्छा व्यक्त केली. आपल्या पतीला ती म्हणाली, "माझ्या पित्याच्या देवदहनगरीला मी जाऊ इच्छिते."
६. "तुझ्या इच्छेप्रमाणे होईल." राजाने उत्तर दिले. सोन्याच्या पालखीत बसवून शुद्धोदनाने मोठ्या लवाजम्यासहीत तिला तिच्या पित्याच्या घरी पाठविले.
७. देवदहला जात असतांना मार्गात फुलांनी बहरलेल्या तसेच पुष्पविरहीत अशा वृक्षांच्या आल्हाददायक गर्द वनराईतून महामायेला जावे लागणार होते. तेच लुंबिनी वन होय.
८. लुंबिनी वनातून पालखी नेली जात असताना ते वन स्वर्गीय अशा चित्रलता वनाप्रमाणे किंवा एखाद्या महाप्रतापी राज्याच्या स्वागतासाठी सुशोभित केलेल्या मंडपासारखे भासत होते.
९. बुंध्यापासून फांद्यांच्या शेंड्यांपर्यंत तेथील वृक्ष फुलाफळांनी ओथंबलेले होते. त्यावर नानारंगाचे असंख्य भ्रमर चित्रविचित्र आवाजात गुंजारव करीत होते आणि निरनिराळ्या प्रकारचे पक्षीगण मंजुळ स्वरालाप काढीत होते.
१०. तेथील मनोरम दृश्य पाहून महामायेच्या मनात तेथे थांबून काही काळ क्रिडाविहार करण्याची इच्छा उत्पन्न झाली. म्हणून तिने पालखी वाहणाऱ्या सेवकास आपली पालखी शालवृक्षाच्या कुंजात नेऊन उतरविण्यास व तेथे उभे राहण्यास सांगितले.
११. महामाया पालखीतून उतरली व तेथील एका सुंदर शालवृक्षाच्या फांद्या वाऱ्याच्या झुळूकीने वर खाली हेलावत असलेल्या पाहून महामायेला त्यापैकी एक फांदी हाताने धरावी असे वाटले.
१२. सुदैवाने एक फांदी सहजगत्या तिला धरता येईल एवढी खाली आली. इतक्यात ती आपल्या पायाच्या चवड्यावर उभी राहिली व तिने ती फांदी हाताने धरली. तेवढयात फांदी वर गेल्यामुळे झटक्याने महामाया वर उचलली गेली आणि अशाप्रकारे हालल्यामुळे तिला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्या. शालवृक्षाची फांदी हातात धरली असताना उभ्यानेच तिने मुलाला जन्म दिला.
१३. त्या मुलाचा जन्म ख्रिस्तपूर्व ५६३ व्या वर्षी *वैशाखी पौर्णिमेला* झाला.
१४. शुद्धोदन व महामाया यांचा विवाह होऊन पुष्कळ वर्षे झाली होती. परंतु त्यांच्या पोटी संतान नव्हते. आणि म्हणून पुत्र प्राप्ती झाली तेव्हा शुद्धोदनाने व त्याच्या परिवाराने आणि सर्व शाक्यांनी पुत्रजन्माचा तो उत्सव मोठ्या हर्षोलासाने थाटामाटात साजरा केला.
१५. पुत्रजन्माच्या यावेळी कपिलवस्तूचे राजपद भूषविण्याची पाळी शुद्धोदनाची होती. अर्थातच त्यामुळे त्या बालकाला युवराज म्हणून संबोधण्यात येऊ लागले."
१६. याच वैशाखी पौर्णिमेला सिद्धार्थ गौतम हा वयाच्या पस्तीसाव्या वर्षी गया येथे निरंजना नदीच्या काठी असलेल्या उरुवेला वनामध्ये पिंपळवृक्षाखाली बसला असताना बुद्ध झाला.
१७. सिद्धार्थ गौतमास वैशाख पौर्णिमेच्या रात्री तिसऱ्या प्रहरी दुःखमुक्तीचे ज्ञान प्राप्त झाले. त्याच्या मनातील अंध:कार पूर्णपणे दूर झाला व तो सम्यक सम्बुद्ध झाला.
१८. याच दिवशी सिद्धार्थ गौतमाला चार आर्यसत्यांची अनुभूती झाली. *भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म* या ग्रंथात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सिद्धार्थ गौतमाच्या बुद्ध बनण्याच्या प्रक्रियेचे सविस्तर विवेचन केलेले आहे. या ग्रंथात प्रकरण तीन मध्ये यावर प्रकाश टाकला आहे.
१९. याच पौर्णिमेच्या दिवशी ख्रिस्तपूर्व ४८३ मध्ये वयाच्या ८० व्या वर्षी सिद्धार्थ गौतम बुद्धाचे मल्ल गणराज्याची राजधानी कुशीनारा येथील शाल वाटीकेत महापरिनिर्वाण झाले.
२०. या पौर्णिमेच्या रात्री तिसऱ्या प्रहरी मनाच्या जागृक अवस्थेत समाधीचा अभ्यास करताना गौतम बुद्धाचा मृत्यू झाला.
२१. गौतम बुद्धांच्या जीवनात जन्म, बुद्धत्व प्राप्ती व महापरिनिर्वाण या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घडल्या आहेत. निसर्गात दुर्मिळ अशाच या घटना आहेत.
२२. या तिन्ही घटना वैशाख पौर्णिमेला घडल्यामुळे या पौर्णिमेस *त्रिगुणी पौर्णिमा* असे म्हणतात.
२३. हा अत्यंत महत्त्वाचा सण आहे व तो आनंदाने व उत्साहाने साजरा केला पाहिजे. प्रत्येकाने आपले घर स्वच्छ केले पाहिजे, सजविले पाहिजे, गोडधोड करून इतरांना वाटले पाहिजे, मित्रांना व नातेवाईकांना आपल्या घरी आमंत्रित केले पाहिजे. मुलांसाठी नवीन कपडे केले पाहिजेत.
२४. अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या त्रिगुणी पौर्णिमेच्या दिवशी अष्टशीलाचे पालन केले पाहिजे.
२५. संपूर्ण बुद्ध विहारे व धम्म प्रशिक्षण संस्था यांनी धम्म कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत. विहारे सजविली पाहिजेत. धम्मप्रवचने आयोजित केली पाहिजेत. विहारे सजविली पाहिजेत. धम्मप्रवचने आयोजित केली पाहिजेत व मने उत्साहाने व आनंदाने ओतप्रोत भरलेली असली पाहिजेत.

शुभेच्छुक: भिमशक्ती युवामंच पानशेत विभाग.

 #✨ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती👉 ✍"जगातला एकमेव व्यक्ती ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता आपल्या लेखणीच्या बळावर सा...
14/04/2021

#✨ डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती👉

✍"जगातला एकमेव व्यक्ती ज्याने रक्ताचा एक थेंब सुद्धा न सांडवता आपल्या लेखणीच्या बळावर सामाजिक, राजनीतिक, धार्मिक,अशा अनेक प्रकारच्या क्रांत्या घडवून आणल्या अशा महान युगप्रवर्तक, क्रांतिकारक,महान अर्थशास्त्रज्ञ,जगात भारताची मान आदराने उंचावणारे विश्वरत्न राष्ट्रनिर्माते,प्रज्ञासूर्य,बोधिसत्व, महामानव, जगातील आदर्श राज्यघटनाकार,भारतरत्न,डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांच्या १३०व्या जयंती उत्सवानिमित्त सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व मानाचा जयभीम..!!💐💐🙏🙏❤️❤️🙏🙏💐💐
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷शुभेच्छुक:भिमशक्ती युवामंच पानशेत विभाग पुणे.

११ एप्रिल..*फक्त नावाने नव्हे तर महान अशा स्वकर्तुत्वाने महात्मा ठरलेल्या महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती.*विद्येविना...
11/04/2021

११ एप्रिल..
*फक्त नावाने नव्हे तर महान अशा स्वकर्तुत्वाने महात्मा ठरलेल्या महात्मा ज्योतीराव फुले यांची जयंती.*
विद्येविना मति गेली
मति विना गती गेली
गति विना वित्त गेले
वित्ताविना शूद्र खचले
इतका अनर्थ, एका अविद्येने
केला
असे सांगून ज्ञानाचे महत्व सांगणारा क्रांतीचा बाप म्हणजे क्रांतीबा फुले क्रांतीबा फुल्यांच्या जयंती निमित्त
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

" #हा_संघर्ष_केवळ_पाण्यासाठी_नसून  #मानवी_मुलभूत_हक्कांसाठी_आहे....."ज्या ठिकाणी कुत्रे मांजरे देखील पाणी पिऊ शकतात अशा ...
20/03/2021

" #हा_संघर्ष_केवळ_पाण्यासाठी_नसून
#मानवी_मुलभूत_हक्कांसाठी_आहे....."
ज्या ठिकाणी कुत्रे मांजरे देखील पाणी पिऊ शकतात अशा ठिकाणी मात्र माणसासारख्या माणसाला पाणी पिण्यास मज्जाव केला जात होता. आणि म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चवदार तळे येथे सत्याग्रह केला. चवदार तळ्याच्या काठी उभे असलेले मूर्तिमंत धैर्य आणि निष्ठा यांचे रूप असलेले ख्यातनाम विद्वान "डॉ . बाबासाहेब आंबेडकर" अस्पृश्यांना उगवत्या सूर्यासारखे भासले. मुक्तीच्या मार्गावरील जनसमूहांचे ते नेतृत्व करणार होते. स्वातंत्र्य मागून मिळत नसते, तर ते लढून मिळवावे लागते, असा संदेश त्यांनी या ठिकाणी दिला. आपल्या हाताच्या ओंजळीत त्यांनी हे जीवनामृत (पाणी) घेतले, त्यांचेच अनुकरण तेथे उपस्थित असलेल्या लाखो अनुयायांनी केले. सत्याग्रहाचे खरे उद्दिष्ट असे होते की, पाणी हि निसर्गाची देणगी आहे आणि ते सर्वांना मिळालेच पाहिजे. अशा प्रकारे त्यांची शिकवण आणि विचार प्रत्येकाने मूर्त स्वरुपात आणणे आवश्यक आहे. पाणी पिण्याच्या क्रियेतून त्यांना सर्वांना हे दाखवून द्यायचे होते, की अत्याचारांची परिसीमा होते, तेव्हा लहानातला लहान जीवही बंड करू उठतो आणि अत्याचाराच्या बेड्या तोडून टाकतो. हक्कासाठी आपला झगडा पुढे चालू ठेवणे आवश्यकच आहे आणि
याकरिता आपले आपसातले मतभेद , अंतस्थ कलह विसरून जाऊन एकजुटीने संघटीतपणे आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करणे हेच आपले आजचे कार्य होय.
२० मार्च महाड चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा...

" #हा_संघर्ष_केवळ_पाण्यासाठी_नसून  #मानवी_मुलभूत_हक्कांसाठी_आहे....."ज्या ठिकाणी कुत्रे मांजरे देखील पाणी पिऊ शकतात अशा ...
20/03/2021

" #हा_संघर्ष_केवळ_पाण्यासाठी_नसून
#मानवी_मुलभूत_हक्कांसाठी_आहे....."
ज्या ठिकाणी कुत्रे मांजरे देखील पाणी पिऊ शकतात अशा ठिकाणी मात्र माणसासारख्या माणसाला पाणी पिण्यास मज्जाव केला जात होता. आणि म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाड येथील चवदार तळे येथे सत्याग्रह केला. चवदार तळ्याच्या काठी उभे असलेले मूर्तिमंत धैर्य आणि निष्ठा यांचे रूप असलेले ख्यातनाम विद्वान "डॉ . बाबासाहेब आंबेडकर" अस्पृश्यांना उगवत्या सूर्यासारखे भासले. मुक्तीच्या मार्गावरील जनसमूहांचे ते नेतृत्व करणार होते. स्वातंत्र्य मागून मिळत नसते, तर ते लढून मिळवावे लागते, असा संदेश त्यांनी या ठिकाणी दिला. आपल्या हाताच्या ओंजळीत त्यांनी हे जीवनामृत (पाणी) घेतले, त्यांचेच अनुकरण तेथे उपस्थित असलेल्या लाखो अनुयायांनी केले. सत्याग्रहाचे खरे उद्दिष्ट असे होते की, पाणी हि निसर्गाची देणगी आहे आणि ते सर्वांना मिळालेच पाहिजे. अशा प्रकारे त्यांची शिकवण आणि विचार प्रत्येकाने मूर्त स्वरुपात आणणे आवश्यक आहे. पाणी पिण्याच्या क्रियेतून त्यांना सर्वांना हे दाखवून द्यायचे होते, की अत्याचारांची परिसीमा होते, तेव्हा लहानातला लहान जीवही बंड करू उठतो आणि अत्याचाराच्या बेड्या तोडून टाकतो. हक्कासाठी आपला झगडा पुढे चालू ठेवणे आवश्यकच आहे आणि
याकरिता आपले आपसातले मतभेद , अंतस्थ कलह विसरून जाऊन एकजुटीने संघटीतपणे आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करणे हेच आपले आजचे कार्य होय.
२० मार्च महाड चवदार तळे सत्याग्रह दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा ...!!!

समतेच्या पुरस्कर्त्या, आदर्श शिक्षिका,स्त्रियांच्या मुक्तीदात्या आणि विद्येच्या खऱ्या देवतेस मनःपूर्वक विनम्र अभिवादन......
10/03/2021

समतेच्या पुरस्कर्त्या, आदर्श शिक्षिका,स्त्रियांच्या मुक्तीदात्या आणि विद्येच्या खऱ्या देवतेस मनःपूर्वक विनम्र अभिवादन..........!!!!!!
🌺🌼🌺🌼🌺🌼🌺🌼🌺
🙏🙏🙏 🙏🙏🙏🙏

*जयंतीनिमित्त..**गाडगेबाबा यांच्या पवित्र स्मृतीस* *विनम्र अभिवादन !!*💐💐गाडगे महाराज (जन्म: २३ फेब्रुवारी १८७६; मृत्यू: ...
23/02/2021

*जयंतीनिमित्त..*
*गाडगेबाबा यांच्या पवित्र स्मृतीस*
*विनम्र अभिवादन !!*💐💐

गाडगे महाराज (जन्म: २३ फेब्रुवारी १८७६; मृत्यू: २० डिसेंबर १९५६) हे गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्रराज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. त्यांनी स्वेच्छेने गरीब रहाणी स्वीकारली होती. ते सामाजिक न्यायदेण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय आणि सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती. विसाव्या शतकातील समाजसुधार आंदोलनांमध्ये ज्या महापुरुषांचा सहभाग आहे, त्यापैकी एक महत्त्वाचे नाव गाडगे बाबा यांचे आहे.

संत गाडगे महाराजांच पूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर होते.गाडगे महाराज वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले प्रसिद्ध समाजसुधारक जन्मदिन : फेब्रुवारी २३, १८७६

गाडगे महाराज (फेब्रुवारी २३, १८७६- २० डिंसेंबर १९५६ ) हे गोरगरीब, दीनदलित यांच्यामधील अज्ञान, अंधश्रद्धा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे समाजसुधारक होते. तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा. "देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसर्‍या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसर्‍या हातात मडके असा त्यांचा वेश असे. समाजातील अज्ञान, अंधश्रद्धा, भोळ्या समजुती, अनिष्ट रूढी-परंपरा दूर करण्यासाठी त्यांनी आपले पूर्ण आयुष्य वेचले. यासाठी त्यांनी कीर्तनाच्या मार्गाचा अवलंब केला. आपल्या कीर्तनात ते श्रोत्यांनाच विविध प्रश्न विचारून त्यांना त्यांच्या अज्ञानाची, दुर्गुण व दोषांची जाणीव करून देत असत. त्यांचे उपदेशही साधे, सोपे असत. चोरी करू नका, सावकाराकडून कर्ज काढू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असे ते आपल्या कीर्तनातून सांगत. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला. ते संत तुकाराम महाराजांना आपले गुरू मानीत. ‘मी कोणाचा गुरू नाही, मला कोणी शिष्य नाही’ असे ते कायम म्हणत. आपले विचार साध्या भोळ्या लोकांना समजण्यासाठी ते ग्रामीण भाषेचा(प्रामुख्याने वऱ्हाडी बोलीचा) उपयोग करत असत. गाडगेबाबांनी संत तुकारामांच्या नेमक्या अभंगांचा मुबलक वापरही वेळोवेळी केला. ‘देवभोळ्या माणसापासून ते नास्तिकापर्यंत,कोणत्याही वयोगटातील लोकांना गाडगेबाबा आपल्या कीर्तनात सहजपणे गुंतवून ठेवत, आपले तत्त्वज्ञान पटवून देत. त्यांच्या कीर्तनाचे शब्दचित्र उभे करणे माझ्या ताकदीबाहेरचे काम आहे .’ असे उद्‌गार बाबांचे चरित्रकार प्रबोधनकार ठाकरे यांनी काढले होते.

🚩🚩🚩🚩💐💐🚩🚩🚩🚩शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला... सनई-चौघडे वाजू लागले... 🚩सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले... भगवा अभिमानाने फडक...
19/02/2021

🚩🚩🚩🚩💐💐🚩🚩🚩🚩
शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला...
सनई-चौघडे वाजू लागले... 🚩
सारे आनंदी-आनंदी वातावरण पसरले...
भगवा अभिमानाने फडकू लागला...
सह्याद्री आकाशाच्या उंचीने दिल्लीकडे ताठ नजरेने पाहू लागली... 🚩
अवघा दक्खन मंगलमय झाला..
अन एक आरोळी सह्याद्रीच्या कडेकोपर्यात घुमली "अरे माझा राजा जन्मला...
माझा शिवबा जन्मला ... 🚩
दीन-दलितांचा कैवारी जन्माला...
दृष्टांचा संहारी जन्मला... 🚩
अरे माझा राजा जन्मला...
🚩💐" शिवजयंतीच्या सर्वांना मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा..💐🚩🚩.🚩
🙏जय शिवराय🙏जय भिम🙏
🚩🚩🚩🌹🌿🌹🚩🚩🚩
#🚩छत्रपति शिवाजी महाराज जयंती

Address

Pune
412107

Telephone

+918605678877

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhimshakti posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhimshakti:

Share