YashwantNiti Digital Marketing LLP

YashwantNiti Digital Marketing LLP Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from YashwantNiti Digital Marketing LLP, Advertising agency, Office No. 203, second floor, Mahalaxmi complex, satara Road, Natugaug, pune, Pune.

❝प्रयत्न करत राहा कारणअशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत.❞  #प्रेरणास्थान  #शिवछत्रपती
12/04/2020

❝प्रयत्न करत राहा कारण
अशक्य आणि कठीण हे काही समानार्थी शब्द नाहीत.❞
#प्रेरणास्थान #शिवछत्रपती

 #पळसदेवसाधारणतः १० व्या किंवा ११ व्या शतकातले आखीव रेखीव अन कोरीव बांधकाम,म्हणजे सुमारे ९०० वर्ष जुनं, ११५७ साली बांधले...
28/02/2020

#पळसदेव

साधारणतः १० व्या किंवा ११ व्या शतकातले आखीव रेखीव अन कोरीव बांधकाम,म्हणजे सुमारे ९०० वर्ष जुनं, ११५७ साली बांधलेलं. उजनी धरण बांधल्यावर धरण क्षेत्रात आलं. पावसाळ्यात थोडा कळस सोडून पाण्याखाली असतं. उन्हाळ्यात पाणी कमी झालं की ग्रामस्थ नदीचा गाळ काढतात. मंदिरातील मूर्ती काढून त्यांची पुनर्प्रतिष्ठापना गावात नवीन देवळात केली गेली आहे. सध्या धरणसाठ्यात असलेली ही यादवकालीन शंकर आणि विष्णूची दोन मंदिरं एकाच राजानं साधारण एकाच वेळी बांधली. जवळ अजून एक सुंदर रामायण चित्र कोरलेलं मंदिर होतं. तीनही देवळातील कोरीव काम सुरेख पण परिसर आता भग्न आहे.
१९७५ ला उजणीचं बांधकाम पूर्ण झालं अन पळसदेव च्या पळसनाथला जलसमाधी मिळाली,
१९७५ ते २०१६ म्हणजे साधारणतः ४१ वर्ष मंदिर कळस वगळता पूर्ण पाण्यात होतं,
२०१६ मध्ये पहिल्यादा मंदिर पाण्याबाहेर आलं अन या वर्षी तर भयानक दुष्काळामुळे मंदिर अन बाजूचा परिसर पूर्णतः उघडा झाला,
एवढी वर्ष पाण्याखाली राहूनही असंख्य विरगळी, भग्न नंदी, दशावतार शिल्पपट, उमा-महेश्वर शिल्प , सतीशीला अन भग्न होत चाललेले मंदिर त्याचं डौलात उभा आहे,
महाराष्ट्राचा इतिहास जितका शौरपूर्ण आहे तितकाच सुंदर आहे हे असा वारसा दाखवुन देतो.
वेगळीच अनुभूती.

नक्की बघावं अन डोळ्यात साठवून ठेवावं अस सुंदर मंदिर..!

फोटो साभार: विश्वास काशीद

Maratha Warriors

 #मननआपल्याला माणसं दुखवायला आवडत नाही. मजेशीर स्वभावामुळे नकळतपणे घडलेला अपवाद वगळता असं कधी घडलेलं मला आठवतच नाही. म्ह...
25/02/2020

#मनन

आपल्याला माणसं दुखवायला आवडत नाही. मजेशीर स्वभावामुळे नकळतपणे घडलेला अपवाद वगळता असं कधी घडलेलं मला आठवतच नाही. म्हणून मी आयुष्यातला एकूण त्रास फक्त तुला दिला. स्वतःचं चुकत असून पळवाटा शोधल्या. तुला खोटं ठरवण्यात जिंकल्याचा फील घेतला. असं सगळं असलं तरी मी मूळ तसा नव्हतो. तुझ्या वाट्याला आलेला मी हा माझ्यातला मलाच नको असलेला भाग होता. पण हे समजेपर्यंत तुझ्यात नि माझ्यात अंतर पडलं होतं. मी तुला दिलेल्या इतक्या भिकार प्रेमवर्षांच्या सानिध्यात तुला माझ्यात काहीतरी चांगलं दिसलं असणार. त्या एका चांगुलपणावर तू माझ्यासोबत वर्षे घालवलीस. अपेक्षांवर पाणी फिरवत चारशेवीसने सुटलेला मी तुझ्याही अपेक्षा पेलू शकलो नाही. तू नसलीस तरी माझ्याकडे ढिगाने माणसं आहेत. जी माझ्यासोबत असून नसल्यासारखी आहेत. कुठलाच मौसम कायमस्वरूपी नसतो. आपल्या आयुष्याची हिरवळच होईल. तू स्वतःची परवड करून घेऊ नकोस. कपाळाला भस्म वगैरे लावायचं सोडून दे.

तुझ्या निरपेक्ष प्रेमाची सर पुन्हा कुठल्याच नात्याला असणार नाही ह्याची खात्री आहे. म्हणून प्रेमावर बोलायचं बंद आहे. कितीशे दिवसांचा विरह आहे हेसुद्धा टिपून आहे. ही पानगळ म्हणजे मुकाट्याने सोसण्याचा शाप आहे. हसतो आहे किंवा तसा दिसतो आहे. महत्प्रयासाने सुटका करून लावून घेतलेले पाश आज उद्या दोघांनाही जखडणार आहेत. अवेळी पश्चाताप करून उपयोग नाही.

कापराच्या वडीसारखं उडालेलं प्रेम अजूनही आठवणींनी माझ्या मनाच्या आकाशात इंद्रधनुष्य बनवतं.
हेच काय ते एकमेव सुख आहे!

🍂

- Dalavi❣️

रम्य सायंकाळ, या सारखे दुसरे सौदर्य ते काय !  #दुर्गराज_राजगड   #राजे_शिवछत्रपती
23/02/2020

रम्य सायंकाळ, या सारखे दुसरे सौदर्य ते काय !
#दुर्गराज_राजगड #राजे_शिवछत्रपती

पैसे नाही म्हणाल तर जेवणाचे ताट मोडा, हातावर भाकरी खा बायकोला लुगडं कमी भावाचे घ्या पण मुलांना शाळेत घाला आणि शिकवा. शिक...
23/02/2020

पैसे नाही म्हणाल तर जेवणाचे ताट मोडा, हातावर भाकरी खा बायकोला लुगडं कमी भावाचे घ्या पण मुलांना शाळेत घाला आणि शिकवा. शिक्षण आणि स्वच्छतेबद्दल उच्च विचार असणारा लोकशिक्षणांचे चालते विद्यापीठ कर्मयोगी गाडगेबाबा जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...🙏💐
#गाडगेबाबा

जेजुरी गडावर असलेल्या तळघरातील शिवलिंग जे वर्षातून फक्त एकदाच महाशिवरात्रीला भक्तांच्या दर्शनासाठी उडण्यात येते.!🙏 #महाश...
21/02/2020

जेजुरी गडावर असलेल्या तळघरातील शिवलिंग जे वर्षातून फक्त एकदाच महाशिवरात्रीला भक्तांच्या दर्शनासाठी उडण्यात येते.!🙏
#महाशिवरात्रि

चहा वर्तमानात दमल्यावर...कॉफी भूतकाळात रमल्यावर...! 🎻. ✍.
20/02/2020

चहा वर्तमानात दमल्यावर...
कॉफी भूतकाळात रमल्यावर...!

🎻.
✍.

घराचीच नाही, तर मनाचीही दारं उघडी ठेवा.रयतेचं वाली राजं येतायत...👑🚩🚩🚩 #शिवजयंती
18/02/2020

घराचीच नाही, तर मनाचीही दारं उघडी ठेवा.

रयतेचं वाली राजं येतायत...👑🚩🚩🚩

#शिवजयंती

श्रीनिवासने १४२.५ मीटर अंतर केवळ १३.६२ सेकंदात पार केले. याचा अर्थ त्याने १०० मीटर अंतर फक्त ९.५५ सेकंदात पार केले, असा ...
15/02/2020

श्रीनिवासने १४२.५ मीटर अंतर केवळ १३.६२ सेकंदात पार केले. याचा अर्थ त्याने १०० मीटर अंतर फक्त ९.५५ सेकंदात पार केले, असा दावा या पोस्ट मध्ये करण्यात आला होता. जगातील सर्वात वेगवान धावपटू असलेल्या बोल्टने १०० मीटर अंतर ९.५८ सेकंदात पार केले होते. त्यामुळे श्रीनिवास बोल्टपेक्षा वेगाने धावतो, असे म्हटले गेले होते.

अथांग रायगडावर मगरीसारखा दबा धरून असलेले प्रवेशद्वार जे प्रत्यक्षात त्याच्या जबड्यात गेल्याशिवाय दृष्टीस पडत नाही. गनिमा...
15/02/2020

अथांग रायगडावर मगरीसारखा दबा धरून असलेले प्रवेशद्वार जे प्रत्यक्षात त्याच्या जबड्यात गेल्याशिवाय दृष्टीस पडत नाही. गनिमास त्याच्या मगरमिठीतून निसटणे केवळ अशक्यच. शिवरायांच्या रायगडावर आगमनावेळी नाणेदरवाजा कसा दिसत असेल ह्याचे कल्पनाचित्र.
#राजे_शिवछत्रपती

यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगल कारण यशाचीं व्याख्या लोक ठरवतात, आणि समाधानाचीं व्याख्या आपण स्वतःसिद...
15/02/2020

यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगल कारण यशाचीं व्याख्या लोक ठरवतात, आणि समाधानाचीं व्याख्या आपण स्वतःसिद्ध करतो...!

🎻.
✍.

प्रत्येकाच्या आयुष्याचे दोन पैलू असतात...एक जो त्याला हसत हसत जगासमोर मांडायचा असतो आणि दुसरा फक्त स्वतःसाठी राखून ठेवाय...
12/02/2020

प्रत्येकाच्या आयुष्याचे दोन पैलू असतात...
एक जो त्याला हसत हसत जगासमोर मांडायचा असतो आणि दुसरा फक्त स्वतःसाठी राखून ठेवायचा असतो.

🎻.
✍.

Address

Office No. 203, Second Floor, Mahalaxmi Complex, Satara Road, Natugaug, Pune
Pune
411037

Telephone

+919172406005

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when YashwantNiti Digital Marketing LLP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share