BrandLiberty

BrandLiberty All types of business-related services like Digital marketing, graphics design, website development,

फेस्टिवल पोस्ट करून मिळेल ते ही फक्त अर्ध्या तासात आता चिंता करू नका फक्त डिझाईन ची ऑर्डर करा . १ डिझाईन  ३०० रुपये तसेच...
09/09/2021

फेस्टिवल पोस्ट करून मिळेल ते ही फक्त अर्ध्या तासात आता चिंता करू नका फक्त डिझाईन ची ऑर्डर करा . १ डिझाईन ३०० रुपये तसेच महिन्या चे दिनविशेष चे पॅकेज देखील उपलब्ध आहे .

Tumchya Sevet Printing che Navin Dalan Suru Karnyat Ale Asun Ata Sarva Printiong Ani Digital MarketingSuvidha Tumhala Ek...
06/09/2021

Tumchya Sevet Printing che Navin Dalan Suru Karnyat Ale Asun Ata Sarva Printiong Ani Digital MarketingSuvidha Tumhala Eka Chatakhali Miltil

“Education is the most powerful weapon which you can use to change the world.” – Nelson Mandela                         ...
05/09/2021

“Education is the most powerful weapon which you can use to change the world.” – Nelson Mandela

सोशल मीडिया मार्केटिंग ने वाढवा तुमचा व्यवसाय.Ashiya Digi ADmark7823891997www.ashiyadigiadmark.comaddress-  Near perugat...
01/09/2021

सोशल मीडिया मार्केटिंग ने वाढवा तुमचा व्यवसाय.

Ashiya Digi ADmark
7823891997
www.ashiyadigiadmark.com
address- Near perugate Police Chowki, Sadashiv Peth Pune.

मथुरेचा राजा कंस याचे गर्वहरण करुन वध करण्यासाठी कृष्णाने देवकीपोटी जन्म घेतला. मात्र जन्म झाल्यावर कंस मारुन टाकेल या भ...
31/08/2021

मथुरेचा राजा कंस याचे गर्वहरण करुन वध करण्यासाठी कृष्णाने देवकीपोटी जन्म घेतला. मात्र जन्म झाल्यावर कंस मारुन टाकेल या भीतीने वडील वसुदेव यांनी मुसळधार पावसात रातोरात त्याल गोकुळात पोहचवले. त्यामुळे कृष्णाचे बालपण गोकुळात गेले. आपल्या बाललीला आणि खोड्या यांनी श्रीकृष्णाने सर्वांना अक्षरश: वेड लावले. पुढे राक्षसांचा वध, कंसवध, कालिया नागाला शरण आणणे असे पराक्रम गाजवले. द्वारकेला राज्य स्थापन केले. गीतेच्या रुपात उपदेश करताना हिंदूना 'भगवतगीता' हा धर्मग्रंथ दिला.
दरम्यान, कोणताही सण साजरा करताना त्यामागील मूळ उद्देश लोप पावणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. कारण हे सण अनेक संदेश, शिकवण देत असतात. त्यामुळे सणांची परंपरा अर्थासह पुढच्या पीढीला समजण्यासाठी त्यात फेरफार होता कामा नये. तुम्हा सर्वांना दहीहंडीच्या शुभेच्छा!

"सवंगड्यासोबत करतो दंगाहातात घेऊनी बासरीकपाळावर आहे मोरपीसचोरून घेतो लोण्याचा गोळाफोडून दही हंडी करतो धमालअसा हा नटखट नं...
30/08/2021

"सवंगड्यासोबत करतो दंगा
हातात घेऊनी बासरी
कपाळावर आहे मोरपीस
चोरून घेतो लोण्याचा गोळा
फोडून दही हंडी करतो धमाल
असा हा नटखट नंद किशोर
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा"

चला फेसबुक वापरायला शिकुया ! ( भाग - ३ )आजचा भाग फेसबुक पेजसाठी महत्त्वाचा आहे. चला तर मग आज फेसबुक पेजवर पोस्ट करायला श...
27/08/2021

चला फेसबुक वापरायला शिकुया ! ( भाग - ३ )
आजचा भाग फेसबुक पेजसाठी महत्त्वाचा आहे. चला तर मग आज फेसबुक पेजवर पोस्ट करायला शिकूया !
✓ फेसबुक पेजवर पोस्ट कशी करावी ? ✍️
• भाग २ प्रमाणेच क्रमाने जाऊ !
• प्रथम फेसबुक ओपन करा.
• तुमच्या उजव्या हाताकडे तीन आडव्या रेषा दिसतील त्यावर क्लिक करा.
• आता तुमच्यसमोर वेगवेगळे ऑप्शनस् येतील जसे की 'friends' ' group' ' videos' 'pages' इत्यादी. तुम्हाला 'pages' हे सिलेक्ट करायचं आहे.
• ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा पेज दिसेल त्यावर क्लिक करून ते ओपन करा.
• पेज ओपन झाल्यावर प्रोफाईल फोटोच्या खाली 'post' चे आयकॉन असेल त्यावर क्लिक करा. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला 'camera' 'photo/video' 'background color' 'live video' इत्यादी. असे ऑप्शन्स येतील त्यातील 'photo/video' यावर क्लिक केलात तर तुमच्या गॅलरीतील फोटोज् दिसतील मग तुम्हाला हवा असलेला फोटो; जो पोस्ट करायचा आहे तो सिलेक्ट करा आणि काही मजकूर लिहायचं असल्यास 'say something about this photo' येथे क्लिक करून लिहावा. ( टीप : फक्त मजकूर लिहायचा असल्यास photo सिलेक्ट करू नये. तसेच मजकूर लिहिताना टॅग वापरणे आवश्यक आहे ते आपण पुढच्या भागात पाहू. )
• सिलेक्ट केल्यानंतर उजव्या कोपऱ्यातील 'share' वर क्लिक करा.
• आता 'news feed' व 'boost post' येईल. तुम्हाला नॉर्मल पोस्ट करायची असेल तर 'news feed' आणि तुमची पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही 'boost post' चा वापर करू शकता.

पाहा, एवढच करायचंय ! सोप्प आहे की नाही ! मग चला आपला व्यवसायासाठी पोस्ट करायला सुरू करुया !

चला फेसबुक वापरायला शिकुया ! ( भाग - २ )नमस्कार मित्रांनो ! आजच्या भागात आपण फेसबुक प्रोफाइल फोटो सेट करण्याबाबत बोलणार ...
25/08/2021

चला फेसबुक वापरायला शिकुया ! ( भाग - २ )
नमस्कार मित्रांनो ! आजच्या भागात आपण फेसबुक प्रोफाइल फोटो सेट करण्याबाबत बोलणार आहोत. चला तर मग !
✓ फेसबुकवर प्रोफाइल फोटो कसा सेट करायचा?🖼️
ह्या भागात आपण प्रोफाइल फोटो कसा सेट करायचा हे बघणार आहोत.
• प्रथम फेसबुक ओपन करा.
• तुमच्या उजव्या हाताकडे तीन आडव्या रेषा दिसतील त्यावर क्लिक करा.
• आता तुमच्यसमोर वेगवेगळे ऑप्शनस् येतील जसे की 'friends' ' group' ' videos' 'pages' इत्यादी. तुम्हाला 'pages' हे सिलेक्ट करायचं आहे.
• ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा पेज दिसेल त्यावर क्लिक करून ते ओपन करा.
• आता स्क्रीनवर तुमचं नाव दिसेल, नावाच्या बाजूला अधिकचे चिन्ह '+' दिसेल त्यावर क्लिक करा. तुम्हाला काही ऑप्शन्स येतील, त्यातील 'choose new profile picture' सिलेक्ट करा.
• तुमच्यासमोर तुमच्या गॅलरीतील फोटोज् दिसतील, तुम्हाला हवा असणारा फोटो सिलेक्ट करा आणि उजव्या कोपऱ्यातील 'Done' ऑप्शन्स वर क्लिक करा व दिलेल्या चौकोनात नीट बसवून सेव करा.
• तसेच कव्हर फोटोसाठी ' add cover photo' वर क्लिक करा, 'edit cover area' वर क्लिक करा.
• रिकामा चौकोन ज्यात अधिकचे चिन्ह आहे त्यावर क्लिक करून 'camera roll' वरून फोटो सिलेक्ट करा आणि उजव्या कोपऱ्यातील 'Done' नंतर 'save' वर क्लिक करा.

अश्याप्रकरे तुम्ही तुमचा फेसबुकवर प्रोफाइल फोटो आणि कवर फोटो सेट करू शकता. भेटूया पुढच्या भागात !

चला फेसबुक वापरायला शिकूया (भाग - १)           सोशल मिडिया वरील फेसबूक हे एक असे प्लॅटफॉर्म आहे ज्याने आपण आपल्या कुटुंब...
19/08/2021

चला फेसबुक वापरायला शिकूया (भाग - १)
सोशल मिडिया वरील फेसबूक हे एक असे प्लॅटफॉर्म आहे ज्याने आपण आपल्या कुटुंब, नातेवाईक, मित्रपरिवार यांच्याशी कनेक्ट होऊ शकतो. तसेच बिझिनेस असल्यास आपण आपल्या ग्राहकांपर्यंत सहज पोहोचू शकतो. पण अजूनही काही लोकांना फेसबूक वापरायला येत नाही, म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी 'चला फेसबुक वापरायला शिकूया' हा प्रोजेक्ट घेऊन आलो आहोत. जेणेकरून तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला चालना सहज मिळेल.

• फेसबुक अकाउंट कसे ओपन करावे ?🤔
आज आपण फेसबुक अकाउंट कसं ओपन करायचं हे शिकूया !
सर्वात आधी फेसबूक हा ॲप डाऊनलोड करा. डाऊनलोड केल्यानंतर जेव्हा तुम्ही फेसबूक ओपन कराल तेव्हा शेवटी 'create new facebook account' असा ऑप्शन येईल तो सिलेक्ट करा. त्यानंतर फेसबूक जॉईन करण्यासाठी 'next' ह्या ऑप्शनवर क्लिक करा. तुमच्या समोर काही 'allow and deny' साठी परमिशन मागितली जाईल, तुम्हाला सर्व परमिशन मधे 'allow' करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला 'First name' म्हणजे तुमचं नाव आणि 'Last name' म्हणजे तुमचं आडनाव लिहून 'next' वर क्लिक करायचं आहे. 'Next' केल्यानंतर तुम्हाला 'What's your birthday' म्हणजेच तुमचा वाढदिवस विचारला जाईल; ते महिना/तारीख/वर्ष या प्रकारे असेल. वाढदिवस लिहून झाल्यावर 'next' वर क्लिक करा. नंतर तुम्हाला 'gender' विचारले जाईल; त्यात male= पुरुष, female= महिला यापैकी सिलेक्ट करा. त्यानंतर तुम्हाला तुमचा 'mobile number' विचारला जाईल तो लिहा. ( नोट : तुम्ही स्क्रीनच्या शेवटी दिलेल्या ईमेल ॲड्रेस व्दारे सुद्धा sign up करू शकता )'next' केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अकाउंट सुरक्षेसाठी 'password' विचारला जाईल; हा पासवर्ड खूप महत्वाचा असून दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीने तुमचं अकाउंट ओपन करू नये म्हणून असतो, तसेच तुम्ही हा पासवर्ड लक्षात ठेवणे गरजेचे आहे. (नोट : पासवर्ड कोणालाही सांगू नये, कुठेही लिहून ठेवू नये; तसेच पासवर्ड लिहिताना कोणतेही 6 नंबर किंवा 6 इंग्रजी अक्षरे वापरावी. ) Next करून तुम्हाला फेसबूक 'Email' विचारेल, जर तुमचा email असेल तर तुम्ही सिलेक्ट करू शकता जर नसेल तर skip'' करू शकता. यानंतर स्क्रीनवर ' finish sigh up' येईल म्हणजे तुमचं फेसबूक अकाउंट तयार झाले आहे, 'Sigh up' वर क्लिक करा म्हणजे तुमचा अकाउंट ओपन होईल. अकाउंट ओपन व्हायच्या आधी 'not now' and 'save password ' असं ऑप्शन येईल, जर 'not now' वर क्लिक केलात तर तुम्हाला पुन्हा पासवर्ड लिहावा लागेल आणि 'save password ' वर क्लिक केलात तर जेव्हा तुम्ही फेसबूक ॲपवर क्लिक कराल, तेव्हा सरळ तुमचं अकाउंट ओपन होईल व पासवर्ड लिहिण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला 'save password ' वर क्लिक करून तुमच्या समोर तुमचा नंबर आणि पासवर्ड येईल 'ok' या वर क्लिक करा म्हणजे तुमचा पासवर्ड सेव होईल. त्यानंतर 'profile photo' ठेवण्यासाठी ऑप्शन येईल तो आपण पुढील भागात शिकणार सध्या तुम्ही डाव्या कोपऱ्यातील skip वर क्लिक करा. अश्याप्रकरे तुमचा नवीन फेसबूक अकाउंट ओपन होईल.
( नोट : OTP कोणालाही पाठवू नये व अकाउंट ओपन करताना OTP आपोआप लिहिला जाईल. )

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे, मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे, शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश देता सदा ...
15/08/2021

गंगा- यमुना आहे नर्मदा इथे, मंदिरांसोबतच मस्जिद आणि चर्च आहे इथे, शांतता आणि प्रेमाची शिकवण देतो आमचा भारत देश देता सदा सर्वदा… स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

Address

Shop No:14/kapil Snaklap, Near Perugate Police Chowki, Sadashiv Peth, Pune
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when BrandLiberty posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to BrandLiberty:

Share