Quirky Market Solution

Quirky Market Solution Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Quirky Market Solution, Advertising/Marketing, 2, Krushnaikunj Apartment, Opp Bank of Maharashtra, Narhe, Pune.

10/10/2018

उठ मराठी माणसा जागा हो उद्योग धंद्यांचा धागा हो
#नामदेवराव #जाधव

24/09/2018

तुम्हाला जो Business करायची इच्छा आहे तो कंमेंट मध्ये टाका मी माहिती देतो

09/09/2018

सगळे सूतार हे उत्तरभारतीय/ राजस्थानी आहेत. आणी सगळे चांगले कारागीरच आहेत.
*उत्तम फर्निचर* बनवतात. दिवसभर मेहनत करतात.

सिंगल हजेरी ....
म्हणजे सकाळी नऊ ते पाच पाचशे आणि सकाळी नऊ ते रात्री अकरा *ड़बल हजेरी* .... म्हणजे दिवसभराची अधिकतम मजूरी एक हजार.

या सगळ्यांचा *म्होरक्या* जो आहे तो उत्तर भारतीय तरूण तिशीतला मुलगा. तो आपल्या गावातून उत्तम कारागीर शोधून आणतो. हे कारागीर तरुण असतात. *मोठ्या कारागीरांच्या हाताखाली* पंधरा सोळा तास राहतात, शिकतात आणि कौशल्य कमावतात.
*विनातक्रार दिवसभर* काम करतात. सकाळी यांचा नास्ता म्हणजे भिजवलेले कच्चे चणे, दुपारी वरण भात आणि रात्री अकरा नंतर यांच्या मधील एक शिकाऊ मुलगा *सगळ्यांचे जेवण* बनवतो.
ह्या उत्तर भारतीय तरूण म्होरक्याच्या हाताखाली निव्वळ गोरेगाव ते विरार या विभागात असे सत्तरेक कारागीर काम करतात..... मन लावून काम करतात. कुठेही *खळखळ* दिसत नाही फारशी आणि बघता बघता उत्तम असे फर्निचर घरात आकार घेत जाते.
तेव्हा प्रश्न पडतो... *मराठी सूतार गेले कुठे सगळे?*

समोरच्या गल्लीत दहा वर्षांपूर्वीपासून आत्ता आत्तापर्यंत एकच भाजीचे दुकान होते एवढ्या परिसरात.
उत्तर भारतीय नवरा बायको आणि त्यांचे तीन मुलगे ....सगळे भाजीच्या दुकानात *राबत* असत. दुकानात तोबा गर्दी दिवसभर. एका गाळ्यावर आज हळूहळू दोन गाळे, दोन फ्लॅट्स घेतले त्या कुटुंबाने.. मेहनत सकाळी पाच वाजल्यापासून रात्री अकरा पर्यंत सारे कुटुंब राबत असते.
तेव्हा मला प्रश्न पडतो...
*मराठी बेरोजगार तरुणांना हे धंदे का खुणावत नाहीत?*

कारण *मेहनतीची तयारी* नाही आणी हे रहस्य मला रिनोव्हेशनच्या वेळीच जाणवले.

वायरींग करण्यासाठी आलेला इलेक्ट्रिशियनवाला म्हणाला की मेहनत खूप आहे कन्सिल वायरिंग करण्यात. शिवाय *कौशल्य* ही आहेच पण हल्ली मराठी तरूण या कामात येतच नाहीत फारसे.

मला प्रश्न पडला
*मराठी तरूण गेले कुठे..?*

माझ्या घरापासून ते स्टेशनपर्यंतच्या परिसरात फक्त एक किराणा दुकान मराठी माणसाचे आहे. बाकी सगळी दुकाने उत्तर भारतीय, राजस्थानी, गुजराती लोकांची आहेत. आपल्या छोट्याशा दुकानात लागणारी चार पाच माणसे ते आपल्या गावाहून आपल्या समाजातली घेऊन येतात. आणि त्यांची संख्या इथे वाढत जाते. आणि त्यांची प्रगतीही होत राहते.

इकडे मला प्रश्न पडतो.. *मराठी तरूण काय करतो...?*

परिसरात इस्त्रीवाला मराठी नाही..दूधवाला, ब्रेडवाला मराठी नाही..पानवाला हजाम बाहेरचा.(हे भाईंदर /वसई /विरार/ पालघर सारख्या मराठी बहुल विभागातील परिस्थिती)

माझ्या ओळखीचा एक कोकणी तरुण आहे. तो मुंबईत सरकारी कार्यालयात शिपायाची नोकरी करतो. सुरुवातीला दहा पंधरा हजार पगार होता फक्त. आणि कोकणात त्याची हापूसची पस्तीस कलमं धूळ खात पडलीत म्हणे......चोरापोरापायी जातात.
पण याला गावी जायला, तिथं राहायला आवडत नाही...
मग अशा कोकणात उ. भारतीय लोक जाऊन तिथली कलमं *भाडेपट्ट्यावर* घेतात आणि त्यांची राखण करत आंब्याचा व्यवसाय वाढवतात.

अशा प्रकारच्या अनेक कारागिरांची, मेहनतकारांची गरज असते. आहे आणि पुढेही लागणार आहे.
*तेव्हा मराठी तरूण कुठे असतात? सगळ्याच जाती धर्माचे...??*

तर याचे मला भरपुर मंथन केल्यावर सापड़लेले उत्तर आहे की... *मराठी तरुण चळवळी, संघटना, आणि युनियन,क्रांती मोर्चा, ब्रिगेड बांधण्यात मशगूल असतात नको तेथे उसळतात*
*सार्वजनिक गणपती, मोहरम बसवण्यात मशगुल असतात. मिरवणुका काढण्यात मशगुल असतात.* *राजकारण्यांच्या हाताखाली कार्यकर्ते म्हणून नाचण्यात मशगूल असतात. शिवाजी राजे, टिळक, आंबेडकर, याबद्दलचे वाद घालण्यात मश्गूल असतात.*
*नाचायचे, मारामारी , फोड़ाफोड़ी, दारू, तंबाखू आणि "मी कुठला धंदा करु याचा विचार" यातच दिवस काढ़तो*

ठीक तर....हे सगळं करायलाही कुणी तरी हवंच आहे नाही का ?.

पण मग परप्रांतियांच्या नावाने खडे फोडू नये. हजारो किमी दूर अनोळखी प्रदेशात येऊन, ते रिस्क घेतात, मेहनत करतात, *पंधरा सोळा तास* राब राब राबतात ...

माझ्या मराठी बंधूनो
खर सांगा ... विचार करून सांगा *आपल्याला ....आपल्या तरूणांना आपल्याच गावात राहून ते करता येत नसेल तर हा दोष कुणाचा...??*
मराठी माणसाचे अस्तित्व नक्कीच आहे।पण कुठे
*गल्ली बोळात* टिंगल टवाळी करायला फक्त आपलेच असतात.
गल्ली मध्ये दादागिरी भाईगिरी, गाड्या जाळायला, पोलिसांची डोकेदुखी वाढवायला आपलेच असतात.
वाढदिवसाला *फ्लेक्स लावून भावी* आमदार, खासदार नाहीच तर नगरसेवक लिहून नाहक खर्च करणारे आपलेच असतात.
मोठं मोठ्या गाड्या घेऊन फुकट खर्च करायला आपलेच असतात.
सणावाराला *दादागिरी करून* वर्गणी जमा करायला आपलेच असतात.

शाळा, कॉलेज, मध्ये तोढफोड करायला आपलेच असतात।
कोण म्हणतं मराठी माणसाचा अस्तित्व नाही????????

*बघा अजूनही वेळ गेली नाही*
विचार करा आणि आपलं अस्तित्व निर्माण करा.

फक्त बार रेस्टऔरंट मध्ये *संध्याकाळी बसून* गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या नाहक चर्चा न करता प्रत्यक्ष कृती करून दाखवून द्या *नाहीतर एक दिवस आपल्याच एक एकरावर आपल्याला काम करायचे दिवस लांब नाही*
सर्व महाराष्ट्रीयन तरुणांना समर्पित. 🙏🌹🙏

12/07/2018

#प्रत्येक #मराठी #व्यवसायिकासाठी

व्यवसाय म्हणजे गुंतवणूक हा समज चुकीचा आहे . त्यासाठी लागते डेअरींग( आत्मविश्वास) हीच मोठी गुंतवणूक आहे .*

"जे काम तुम्ही इतरांसाठी *पगार* घेऊन करता तेच काम तुम्हाला *स्वतःसाठी करा* म्हटलं तर बोबडी वळते"

प्राॅब्लेम हा नाहीये की आपल्याला *व्यवसायाचं ज्ञान* नाहीये, प्राॅब्लेम हा आहे की आपल्यात *डेअरींग* नाहीये.

टाटांना, धीरुभाईंना कुणी *व्यवसाय शिकवला* नव्हता, ना बिल गेट्स ला कुणी घरबसल्या गिऱ्हाईक आणुन दिलं होत. ऊद्योजक काय आकाशातुन पडलेले नाहीत.

*फक्त मानसिकतेचा खेळ आहे . त्याचे विश्लेषण नक्कीच प्रत्येकाल पटल्याशिवाय रहाणार नाही .*

तुम्ही *नोकरीच्या मागे पळता,* ऊद्योजक *व्यवसायाच्या* मागे पळतात.

तुम्ही *पगार* मिळवण्याचा विचार करता, हे लोक पगार *वाटण्याचा* विचार करतात

तुम्ही *जगण्यासाठी* धडपड करता, हे लोक *जगण्याचा आनंद* घेण्यासाठी प्रयत्न करतात.

तुम्ही *ऊद्याच काय* याचा विचार करता, हे लोक *आणखी काय करायचं* याचा विचार करतात.

तुमची *स्वप्ने घर आणि गाडी* यातच संपतात, किंवा *काश्मीर टुर* पर्यंत लांबतात, यांची *स्वप्ने ईथपासुन सुरु* होतात.

तुम्ही *नशीबाला दोष* देतात, हे लोक *नशीबाचंच नशीब* ऊजळवतात.

तुम्ही *कारणे शोधतात*, हे लोक *कारणांवर ऊत्तरे* शोधतात.

तुम्ही *तोट्याचा विचार* करता, हे लोक *नफ्याची आकडेवारी* मांडतात.

तुम्ही *डुबलो* तर काय याचा विचार करता, हे लोक *डुबलो म्हणुन काय होईल?* माझ *स्कील जीवंत* आहे असा विचार करतात.

तुम्ही *हरण्याचा* विचार करता, हे लोक *जिंकण्याचा* विचार करतात...

व्यवसाय म्हणजे काय *राॅकेट सायन्स* नाही... फक्त *मानसिकतेचा* खेळ आहे.

व्यवसाय हे खरंच राॅकेट सायन्स नाहीये राव. *सुरुवात करा,* सगळं काही *आपोआप* होतं.
एक लक्षात ठेवा,

*व्यवसायात कधीच नुकसान होत नसतं. होते ती फक्त गुंतवणुक. पैसे संपत संपत अगदी शुन्य होतील, पण शुन्याच्या खाली जाऊ शकत नाही. आणि शुन्याची ताकद खुप मोठी असते. गमवायला काहीच नसतं त्यावेळी कमावण्याची संधी जास्त असते.... सुरुवात करा. यशस्वीच व्हाल, विश्वास ठेवा.*

*जिद्द ठेवा .... उद्योजक व्हा...*
*जीवनात समृद्ध व्हा...*

19/06/2018

भन्नाट बिजनेस आयडिया!
--------------------------------------
अनुक्रमणिका
--------------------------------------
१. ई-कॉमर्स आणि एक्स्पोर्ट व्यवसाय

१. ई-कॉमर्स वेबसाईट - मॅनेजमेंट वाढवणारा व्यवसाय
२. ई-कॉमर्सची वाहती गंगा - लवकर हात धुऊन घ्या
३. मोबाईल अॅप्स - कायम पैसे मिळवून देणारा व्यवसाय
४. कंटेंट रायटिंग - लिखाणकामाचा व्यवसाय
५. लहान एक्स्पोर्ट व्यवसाय कसा सुरु करायचा?
६. गारमेंट एक्स्पोर्ट - २००% फायद्याचा बिजनेस
७. स्वतःचा टी-शर्ट ब्रँड बनवा

२. शेतीपूरक व अन्न प्रक्रिया उद्योग

८. फार्म हाऊस प्लांटिंग - फायद्याचा मोठा व्यवसाय
९. कृषी-ग्रामीण पर्यटन व्यवसाय
१०. शेतकऱ्यांसाठी मका प्रक्रिया उद्योग
११. पडीक जमिनीचं सोनं करणारा करंजा उद्योग
१२. व्हीटग्रास - शेतीला फायदेशीर पर्याय
१३. सीताफळ प्रक्रिया उद्योग
१४. उसाचा टेट्रापॅक रस
१५. कडूनिंबापासून साबण निर्मिती प्रकल्प
१६. गोमुत्र - संकलन व प्रोसेसिंग
१७. गाढवाच्या दुधाचा फायदेशीर व्यवसाय

३. खाद्यपदार्थ निर्मिती व हॉटेल उद्योग

१८. प्रीमियम टी स्टॉल
१९. नमकीन फरसाण उद्योग
२०. ३ लाखांत बेकरीचा व्यवसाय
२१. जेली चॉकलेट मॅन्युफॅक्चरिंग
२२. सुरु करा नॉनव्हेज हॉटेल
२३. सिंगल मेन्यू रेस्टॉरंट

४. आधुनिक व्यवसाय

२४. मायक्रो फायनान्स कंपनी सुरु करा
२५. प्लेसमेंट व कन्सल्टिंग उद्योग
२६. लीगल प्रोसेस आउटसोर्सिंग - लॉ पदवीधरांसाठी
२७. सोशिओ मेडिको कौन्सेलिंग
२८. लग्नं जुळवण्याचा व्यवसाय
२९. सॅनिटरी नॅपकीन बनवण्याचा व्यवसाय
३०. लक्झरी वृद्धाश्रम - भविष्यातील मोठा व्यवसाय

Copy and Pasted by Others(Unnamed)

Registration of Companies now Easier...Incorporation Charges will be apply
18/06/2018

Registration of Companies now Easier...
Incorporation Charges will be apply

http://propyet.blogspot.in/2018/03/blog-post_19.html?m=1
19/03/2018

http://propyet.blogspot.in/2018/03/blog-post_19.html?m=1

१ चहा काॅफी करुन विकणे. पाचपट नफा. २ कुल्फी विकणे. घरीच केली तर तिप्पट नफा. ३ मासे विकणे. दिडपट नफा. ४ आंबे होलसेल आणून ...

07/02/2018

आपल्या मराठी माणसाचा एक नवीन व्यवसाय पाठवतो.

🔸कमित कमी भांडवलात, कुठलीही स्पर्धा नसणारा एक नवीन व्यवसाय.🔸

🔵रियांश इंटरप्राइसेस 🔵

संपूर्ण महाराष्ट्रात अप्लिकेटर नेमाने सुरू आहे ...

🔹महिना 50000 पेक्षा अधिक नफा कमवा.🔹

रियांश इंटरप्राइसेस नी एक वर्षाच्या संशोधनानंतर 🌞तापमान कमी करण्याचे हे यशस्वी तंत्रज्ञान शोधून काढले.🌞

आम्ही सर्व प्रकारच्या छतावर 🌝कूल कोअटींग (Cool Coating) करून छताखाली तापमान 6'c ते 8'c ने 100% कमी करतो. तसेच छतावरील तापमान 10'c ते 12'c नी कमी करतो. ज्यामुळे घरात गर्मीचा त्रास अजिबात जाणवत नाही.🌝

सदर कोअटींग हे....
टेरेस, फ्लॅट, बंगला,सर्व पत्र्याचे शेड, पेट्रोल टॅंक, पाण्याची टाकी, कंपनी शेड, ऑफिस व इतर सर्व प्रकारच्या छतासाठी उपयोग होतो.

🔸उन्हाळ्यात ह्या कामाची खूप मोठ्या प्रमाणावर मागणी सुरू होते .

🔸तापमान कमी होण्याची 100% हमी
🔸50% ऍडव्हान्स
🔸50% तापमानातील फरक स्वतः अनुभवल्यानंतर (जो कॉअटींग झाल्यावर 1 तासात जाणवतो)

🔸तापमानात फरक न जाणवल्यास घेतलेली रक्कम परत देउ.

🔸Riyansh Enterprises
Cool Coating, सोबतच Painting & Waterproofing चे कामे 5 वर्षे हमी(Guarantee) देऊन करते.

🔵वर्क मोडुल🔵

🔸तालुका पातळी -🔸
फायदे
*एक तालुका ,एकच अप्लिकेटर 100% हमी .
*मार्केटींग आणि जाहिराती साठी कायम सपोर्ट.
*अप्लिकेटर लीगल अग्रीमेंट चा सर्व खर्च.
*50 % नफ्याची हमी.
*100% ट्रेणींग सपोर्ट.
*गुंतवणूक केलेल्या संपूर्ण रकमे चे केमिकल.

🔹भांडवल- 60000

🔸जिल्हा पातळी -🔸
फायदे
*एक जिल्हा, एक अप्लिकेटर 100% हमी .
*मार्केटींग आणि जाहिराती साठी कायम सपोर्ट.
*अप्लिकेटर- लीगल अग्रीमेंट चा सर्व खर्च.
*50 % नफ्याची हमी.
*100% ट्रेणींग सपोर्ट.
*गुंतवणूक केलेल्या संपूर्ण रकमे चे केमिकल.

🔹गुंतवणूक-150000

🙏🏻कृपया फेसबुक चाट वर कुठल्याही कमेंट करू नका, प्रतिसाद दिला जाणार नाही🙏🏻

🙏🏻 फक्त सिरीयस लोकांनी लाईक करा आणि आमच्या नंबर वर कॉल किंवा व्हाट्सअप्प करा ,आपल नाव आणि पत्ता व्हाट्सअप्प करा 🙏🏻
[hidden information] /9049171370

🕐आमचा तसेच आपला वेळ वाचवा आणि गर्जुना माहिती देण्यामारीत आम्हाला मदत करा 🕔

संपूर्ण माहिती दिली आहे , पुढील प्रोसिजर साठी कॉल किंवा व्हाट्सअप्प करा

RIYANSH ENTERPRISES

Office no 4, sukhadshree apartment,opp kheliya shop ,shagun chouk ,narayan peth ,pune 411030.

06/02/2018

069 : Cotton Buds making (20/01/2018) ,,,,,,, हा प्रकार खूप प्रचलीत आहे ,,, कानातले जास्तीचे झालेले waste काढण्यासाठी वापरली जाणारी काडी . खरं तर खूपच छोटा म्हणता येईल असा व्यवसाय ... मार्केट जवळ जवळ प्रत्येक जनरल स्टोअर ,लहान नाव असो वा मेट्रो ,, प्रत्येक ठिकाणी चालू शकतो , म्हणजे मार्केटची चिंता नाही , Raw material महाराष्ट्रात मुबलक प्रमाणात उपलब्ध ... लागतच काय ??? 1 ) कापूस, 2 ) काडी ( ( प्लास्टीक ची किंवा लाकडी ) , आणि पॅकिंग मटेरीय ल जसे कि Zip Pouch किंवा plastic container ..... पद्धती काय असते तर ...... काडीच्या दोन्ही बाजूस .. कापूस गुंडाळलेला असतो , आणि 100 किंवा पेक्षा जास्त नगांची पैकींग असते .. साधारण 100 नग Buds ची रिटेल विक्री किंमत साधारण पणे रू 10 असते . आणि जशी जशी पैकींगची साईज वाढत जाते तसं तसं त्याची किंमत वाढत जाते . साधारणपणे .. या Buds ची निर्मिती Automatic मशीनवर केली जाते .......................परंतु ज्या देशात मुबलक मनुष्य बळ् उपलब्ध आहे अशा आपल्या देशात ,,,, अगदी Low cost वर पण manually पण याची सुरुवात करता येऊ शकेल ... फक्त इच्छा शक्ती हवी ..... या व्यवसायातील Raw मटेरियल ची किंमत आणि पक्का मालाच्या किंमतीत असणारा .. गॅप आपण सहजच पाहू शकता ... आणि कोणताही उद्योग म्हणजे काय तर ... आपण या गॅप चा वापर आपल्या नफा कमावण्या साठी करणे . या व्यवसाया संबंधी अधिकची माहिती internet वर उपलब्थ होऊ शकते .. तेंव्हा भरपूर वाचन करावे .. मार्केट सर्वे करावा आणि व्यवसायात उतरावे ,© निलेश काळे , धारूर . 9860555247 (whatsapp only ,share from Nilesh kale udyognity

Address

2, Krushnaikunj Apartment, Opp Bank Of Maharashtra, Narhe
Pune
411041

Telephone

+91 97620 10208

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Quirky Market Solution posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share