19/02/2026
नेहमी पुढे चालत राहावं. संकट आलं की मागे वळून इतिहासातून प्रेरणा घ्यावी. आणि ती प्रेरणा घ्यायलाच हवी, कारण आपल्या इतिहासात एक असं नाव आहे ज्याने प्रश्नांची उत्तरं शब्दांत नाही, तर कृतीतून दिली आहेत.
जे बरोबर आहे ते बरोबरच आणि जे चूक आहे ते चूकच. चूक करणारा कोणीही असो. सख्खा असो वा परका, न्याय होणारच. हा विचार सांगणारा नव्हे, तर जगणारा राजा आपल्याला लाभला होता.
आज मात्र आपण ‘आमचा राजा, तुमचा राजा’ असं म्हणत भांडतो आहोत आणि नकळत त्यांचीच उंची कमी करण्याचा प्रयत्न करतो आहोत. प्रत्यक्षात ते कोणाचेही नव्हते, ते होते रयतेचे राजे. ज्यांनी प्रत्येकाला समान न्याय, समान सन्मान आणि समान संरक्षण दिलं.
त्यांना समजून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, तर त्यांचं मोठेपण आपोआप कळेल.
असो.
आजचा दिवस वादाचा नाही, अभिमानाचा आहे.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त त्यांना मानाचा मुजरा.
जय भवानी :triangular_flag_on_post: जय शिवाजी :triangular_flag_on_post: