14/02/2021
#वास्तूविचारापूर्वी_अष्टदिशांचा_विचार_करा..!
चैतन्यऊर्जा वास्तू सोल्यूशनच्या नव्या संकल्पात सर्वांचं स्वागत.
वास्तूविचार करण्यापूर्वी आपल्याला अष्टदिशांचा विचार कसा करायचा त्यावर आपण आजच्या पहिल्या लेखमालेत आणि एकूण दोन भागात सविस्तर पाहणार आहोत.
घर बांधताना सर्वात आधी आपण भूमी पाहातो प्लॉट पाहतो. वास्तूतज्ज्ञ त्यावेळी प्रत्येकाला मार्गदर्शनासाठी मिळतीलच हे नक्की नसतं. पण वास्तूतज्ज्ञाचा सल्ला आपण घेणं केव्हाही श्रेष्ठ आणि श्रेयस्कर होय.
प्लॉट घेताना तो कोणत्या बाजूला उंच आहे कोणत्या बाजूला सखल आहे. जागेत किवा जागेच्या चहूबाजूंपैकी कोणत्या बाजूला चढ उतार आहेत त्यावरून जागेचे शुभाशुभत्व ठरत असते. त्यानुसार सर्व दिशा उपदिशांच्या उंचसखलपणामुळे प्राप्त होणार्या शुभाशुभ फलांची आज आपण माहिती घेणार आहोत. वास्तू बांधकाम कोणत्या दिशेचे किती करावे याचाही विचार झाला पाहिजे...!
चला सविस्तर पाहू दोन भागात..
भाग -१
१) पूर्वदिशा उंच असल्यास जागेच्या मालकाचे पुरूषबल कमी होते. स्त्रियांचे बल वाढून घरात पुरूषांचे अपमान होण्याचे प्रसंग घडतात.
२) आग्नेय दिशा उंच असल्यास शुभसौख्य लाभते.
३) दक्षिण दिशा उंच असल्यास आरोग्यवृध्दी होते आणि सौख्य लाभते.
४) नैऋत्य दिशा उंच असल्यास सर्व कार्यात यश, किर्ती वंशवृद्धी होते.
५) पश्चिम दिशा उंच असल्याने पुरूषांचे बल वाढून पुरूषांचा समाजात मान सन्मान वाढून गौरव प्राप्त होतो.
६) वायव्यदिशा उंच असल्यास आरोग्यवृध्दीसह धनधान्य लाभ.
७) उत्तर दिशा उंच असल्यास किवा उत्तरेचे बांधकाम दक्षिणेपेक्षा उंच असल्यास धननाश व रोग होतो.
८) इशान्यदिशा उंच असल्यास घरात नेहमी कलह, मानसिक सूख नसणे, आणि वंशवृध्दीत अडचणी.
९) मध्यभाग उंच केल्याने धनधान्याची वृध्दी.
१०) पूर्वेकडे उतार असेल तर संतती बुध्दीमान होईल. अग्नेय दिशेकडे उतार असल्यास अग्नीभय.अपघात संभवतात.
११) दक्षिणेकडे उतार असल्यास हत्या, आत्महत्त्या, विविध प्रकारचे दुर्घटना घडतात.
१२) नैऋत्येला उतार असल्यास भुतप्रेत बाधा, हत्त्या असाध्य रोग होतात.
१३) पश्चिमेला उतार असल्यास घरातील स्त्री संतती धाडसी होते.
१४) वायव्य दिशेचा उतार रोग व चिंता दाखवतो.
१५) उत्तरेचा उतार ऐश्वर्यवृध्दी आणि धनलाभ.
१६) ईशान्य दिशेचा उतार वंशवृध्दी, ऐश्वर्यवृध्दी, विद्या, विज्ञानवृध्दी सुख लाभ.
१७) जागेच्या मध्यभागी खड्डा अथवा उतार धननाश, दु:ख रोग दारिद्र्ययोग.
१८) उत्तर, ईशान्य, पूर्व या देशांपेक्षा आग्नेय, दक्षिण, नैऋत्य पश्चिम वायव्य दिशांना उतार असू नये.
१९) आग्नेय, दक्षिण, नैऋत्य, पश्चिम, वायव्य या दिशांपेक्षा उत्तर इशान्यपूर्व या दिशांना उतार असल्यास अनेक प्रकारांनी धनलाभ, ऐश्वर्य व वैभव प्राप्त होते.
२०) इशान्यदिशेपेक्षा पूर्वेकडे उतार असल्यास बुध्दीनाश.
२१) ईशान्येपेक्षा आग्नेयेकडे उतार जास्त असल्यास अग्नीदाहकता येते. खर्च फार होतात. जागामालकाचे निर्णय सतत बदलतात.
२२) ईशान्येपेक्षा दक्षिणेकडे जास्त उतार असल्यास मालकाला नैराश्य येते. हत्त्या आत्महत्या घडतात.
२३)ईशान्येपेक्षा नैऋत्येस जास्त उतार असेल तर भूतबाधा अनेक प्रकारचे उपद्रव संभवतात.
२४) जागा किवा वास्तूच्या ईशान्येपेक्षा पश्चिमेकडे ुतार असल्यास स्त्रीया स्वच्छंदी अथवा स्त्रीसंतती नियमबाह्य वागण्याची वृत्ती वाढते.
२५) ईशान्येपेक्षा वायव्येकडे अधिक उतार असल्यास रोगोत्पत्ती होऊन आरोग्य बिघडते.
माहिती स्रोत - वास्तू वैभव
(पोशेट्टी अनलदास)
याबाबत पुढील माहिती लवकरच पाहू..
क्रमश:
-- ज्योती खिरे.
वास्तूतज्ज्ञ.
(Architectural Interior Designer)
चैतन्यऊर्जा वास्तू सोल्यूशन, शिवाजीनगर, नांदेड.
संपर्क - 7774050474