04/10/2024
भगतसिंग यांचे बाथरूम साफ करणाऱ्या भंगीचे नाव बोघा होते. भगतसिंग त्याला बेबे (आई) म्हणत. भगतसिंग यांना कोणी विचारले की, हा भंगी बोघाला तू आई कसं म्हणतोस? तेव्हा भगतसिंग म्हणायचे, एकतर माझ्या आईने माझे मल मूत्र उचलले त्यानंतर हा भला माणूस बोघे. मला माझ्या आईत बोघे दिसतो, हा बोघा माझ्या आई समान आहे
असे म्हणत भगतसिंग बोघाला मिठी मारत.
भगतसिंग जी अनेकदा बोघाला म्हणायचे, "बोघा, मला तुझ्या हातची भाकरी खायची आहे." पण बोघा आपली जात आठवून कचरत असे आणि म्हणायचे, "भगतसिंग, तू उच्च जातीचा सरदार आहेस, आणि मी खालच्या जातीचा भंगी आहे,भगत, तू ते हट्ट सोड,हट्ट करू नकोस."
सरदार भगतसिंगही त्यांच्या जिद्दीवर ठाम होते, फाशीच्या काही दिवस आधी त्यांनी बोघे यांना जिद्दीने सांगितले, "बोघा, आम्ही काही दिवसांचे पाहुणे आहोत, आतातरी आमची इच्छा पूर्ण करा!"
बोघे यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. रडत रडत त्याने शूर शहीद-ए-आझम यांच्यासाठी स्वतःच्या हातांनी भाकऱ्या बनवल्या आणि स्वतःच्या हाताने खाऊ घातले भगतसिंगांनी भाकरीचा तुकडा तोंडात टाकताच बोघे रडू लागला. "हे देशभक्ता,हे माझ्या सिंहा,धन्य तुझी माता जिने तुला जन्म दिला." ..