13/10/2025
*शुभांगी चव्हाण - एक दीप्तीमान पणती*
अगदी दहावी होता होता शुभांगीचं लग्न झालं. तिच्यापेक्षा फक्त सहा महिन्याने मोठा असलेला तिचा नवरा कचरा वेचायचं काम करायचा आणि प्रचंड व्यसनी. लग्नानंतर त्यांना तीन अपत्य झाली, पंधरा वर्षांचा हा संसार शुभांगीसाठी थरारपटच होता खरंतर...पण ती सोसत राहिली. व्यसनाधीनतेपायी तिचा नवरा अखेर एक दिवशी हे जग सोडून गेला आणि सारी जबाबदारी शुभांगीवर आली. सासूबाईंनी प्रोत्साहन दिले पण शेवटी आर्थिक बाजू एकट्या शुभांगीवरच सांभाळण्याची जबाबदारी आली.
तिन्ही मुलांना घेऊन घरातून अखेर एके दिवशी ती बाहेर पडली आणि आपला एकटीचा संसार थाटला. अगदी पडेल ते काम करण्यापासून तिची सुरूवात झाली. विविध संस्थांशी संलग्न होत तिने आपल्यातील कौशल्य व क्षमता विकसित केल्या. शिक्षणही सुरू केले. अगदी रिक्षा आणि छोटा हत्ती टेम्पो सुद्धा चालवायला लागली. अनेक नोकऱ्या करूनही पुरेसं अर्थार्जन होईना म्हणून सतत काहीतरी खटपट ती करत असते. सध्या एका नामांकित संस्थेत ती नोकरी करते आहे आणि त्याच संस्थेत शिक्षणही सुरू आहे. शिवाय आपल्या तिन्ही अपत्यांनाही ती शिक्षण घेऊन नोकरीला लावण्यासाठी प्रयत्नशील आहे.
एखाद्या व्यक्तीच्या जीवनात कितीही काटे नियतीने पेरले तरीही ती व्यक्ती जिद्दीने त्याला सामोरी जाते अशीच ही शुभांगी! त्यामुळेच तिच्या जिद्दीची दखल अनेक संस्थांनी घेत तिला विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे.
*यंदा दिवाळी निमित्त शुभांगीने काही फार भन्नाट कल्पक अशा सुगंधी पणत्या आणि दिवे तयार केले आहेत. तुम्ही स्वतःसाठी किंवा भेट देण्यासाठी या तिच्या भारी पणत्या, मेणबत्या आणि दिवे जरूर खरेदी करा.
सोबत तिच्या वस्तुंचे फोटो, दर, जीपे क्रमांक आणि क्यूआर कोड देत आहे. बल्क ऑर्डरसाठी किमान चार दिवस आधी संपर्क करा*.
आणि हो, माझी पोस्ट वाचून तिला संपर्क करताय हे देखील तिला आवर्जून सांगा ... ☺️☺️
*यंदाची दिवाळी आपल्यासाठी प्रकाशमान होवो आणि आपल्याही जीवनात नवे तेज, नवा सुगंध पसरो या माझ्या लक्ष लक्ष शुभेच्छा !*
*धन्यवाद*
*- मोहिनी घारपुरे देशमुख*
*PRO Person PR*
( Goodwill post )
( वस्तुंचे दर - चहा, बिस्कीट, रसमलाई, गुलाब हे१८० रुपये आणि मोतीचूर लाडू,मोदक, काजू कतली, फुले फ्लोटिंग दिवे हे फक्त ८०रुपये
Gpay Number - 8432301417 आणि ऑर्डर देण्यासाठी संपर्क - 8698380748 )