18/08/2026
निवडणुका नाहीत… तरीही एक नेता ‘ऐकण्यासाठी’ पुण्यात!
राजकारणात नेत्यांची उपस्थिती अनेकदा निवडणुकांच्या आसपासच जाणवते. मात्र पुण्यात आज काहीसं वेगळं चित्र पाहायला मिळालं.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीशिवाय, पुण्यातील तरुणी आणि विद्यार्थिनींच्या मनातील प्रश्न, त्यांची स्वप्नं, अडचणी, सुरक्षितता आणि शिक्षणातील आव्हाने जाणून घेण्यासाठी राहुल गांधी यांनी विशेष संवाद साधला.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक वारशाच्या पुण्यात झालेला हा संवाद केवळ भाषणापुरता मर्यादित न राहता ‘ऐकण्याच्या राजकारणा’चा एक वेगळा प्रयत्न ठरला.
सत्ता, मतांचं गणित आणि निवडणुकीच्या घोषणांपलीकडे जाऊन तरुण पिढीला बोलतं करण्याची आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्याची ही भूमिका किती महत्त्वाची आहे, याची चर्चा आता होणार आहे.
नेता फक्त बोलतो तेव्हा सभा होते…
नेता ऐकतो तेव्हा संवाद घडतो.
#राहुलगांधी #पुणे #विशेषसंवाद #तरुणी #विद्यार्थिनी #सावित्रीबाईफुले #महिलासक्षमीकरण #युवाशक्ती #संवाद #राजकारण #पुणेपर्व #ऐकण्याचेराजकारण #निवडणुकीपलीकडचेराजकारण