10/08/2025
परिवर्तन ....... भाग 1
https://youtu.be/3GZbqxTqZek?si=RtmTqHC4ATthLTA2
कोंकणातील अश्मयुगीन कातळशिल्प ( Prehistory Geoglyphs of Konkan )
कातळशिल्पांच्या शोध संशोधन संरक्षण आणि संवर्धन या प्रवासातून आज कोंकणात पर्यटन, रोजगार, संशोधन अशा विविध विषयात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याची एक झलक परिवर्तन व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून मांडण्याचा हा प्रयत्न.
कोकणच्या आणि भारतीय उपखंडाच्या इतिहासातील एका अज्ञात कालखंडातील मानवी अस्तित्वाचा मागोवा घेणारा आणि जगाच्या पाठीवर आज कोकणाला एक स्वतंत्र ओळख देवू पाहणारी ही कातळशिल्प.
निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी, रे मिडिया, पुणे
https://www.facebook.com/share/p/1JhZXvpPVW/
परिवर्तन ....... भाग 1
https://youtu.be/3GZbqxTqZek?si=RtmTqHC4ATthLTA2
कोंकणातील अश्मयुगीन कातळशिल्प ( Prehistory Geoglyphs of Konkan )
कातळशिल्पांच्या शोध संशोधन संरक्षण आणि संवर्धन या प्रवासातून आज कोंकणात पर्यटन, रोजगार, संशोधन अशा विविध विषयात परिवर्तनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याची एक झलक परिवर्तन व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून मांडण्याचा हा प्रयत्न.
कोकणच्या आणि भारतीय उपखंडाच्या इतिहासातील एका अज्ञात कालखंडातील मानवी अस्तित्वाचा मागोवा घेणारा आणि जगाच्या पाठीवर आज कोकणाला एक स्वतंत्र ओळख देवू पाहणारी ही कातळशिल्प.
बारा पंधरा वर्षांपूर्वी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच ठिकाणे आणि त्याबाबत दोन चार मंडळीना असलेली माहिती सोडल्यास कोणाला देखील माहिती नव्हता.
2012 मध्ये रत्नागिरी मधील सुधीर (भाई) रिसबूड आणि धनंजय मराठे यांनी हा विषय हातात घेतला पुढे डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांची सोबत मिळाली. या त्रिकुटाने आजतागायत दक्षिण कोकणातून 200 पेक्षा अधिक ठिकाणांहून 2800 पेक्षा अधिक कातळशिल्प शोधून जगासमोर आणली आहेत.
त्यांनी हे कार्य फक्त शोधापुरते मर्यादित न ठेवता या कातळशिल्पांच्या सखोल संशोधनासोबतच संरक्षण आणि संवर्धनाचा ध्यास घेतला आहे. या मंडळींचा लहानशा गावातील एखाद्या व्यक्ती पासून अगदी जागतिक पातळीपर्यंत, स्थानिक शासन, प्रशासनापासून अगदी केंद्र पातळीपर्यंत सातत्याने पाठपुरावा चालू आहे.
विविध विषयातील अभ्यासक मंडळींसोबत घेत संशोधनाच्या कक्षा रुंदावण्याचे काम चालू आहे.
रत्नागिरीमध्ये DST च्या माध्यमातून कातळशिल्पावर पूर्णवेळ कार्यरत असलेले संशोधन आणि माहिती केंद्र सुरू केले आहे. या माध्यमातून समग्र डिजिटल दस्तऐवजीकरण, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंधांचे सादरीकरण, विविध प्रकारची सर्वेक्षणाची आणि संशोधनाची कामे चालू आहेत.
विविध विद्यापीठांनी पुरातत्त्व विषयक अभ्यासक्रमात कोंकणातील कातळशिल्पांचा समावेश केला आहे.
रे मिडिया, निऑन रिल क्रियेशन यांच्या सहाय्याने राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लहान मोठ्या फिल्म सादरीकरण,
पुरातत्त्व विभागासोबत तसेच जागा मालकांसोबत प्रत्यक्ष संवर्धनाचे कामात सहभाग इत्यादी कामे सातत्याने सुरू आहेत.
थोडक्यात सांगायचे झाल्यास कातळशिल्प या विषयावर सर्वच स्तरांवर या मंडळींचे काम सुरु आहे. परिमाण स्वरूप आज 9 ठिकाणांना राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा मिळाला आहे. तर 17 ठिकाणांवरील कातळशिल्प संरक्षणाचा प्रस्ताव राज्य शासनाने मंजूर केला आहे. विशेष बाब म्हणजे 9 ठिकाणांचा समावेश युनेस्को जागतिक वारसा स्थळ संभाव्य यादीत झाला आहे. यात या मंडळींच्या सोबत असलेले डॉ. तेजस गर्गे, संचालक पुरातत्व विभाग यांचे विशेष योगदान आहे.
एकीकडे जगाच्या पाठीवर हा विषय पोचविण्यात या मंडळींना यश येत आहे. तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर स्थानिकांचा सहभाग आणि सुविधा कशा निर्माण करता येतील या विचारांसह कातळशिल्पांसह परिसरातील बाबींना पर्यटनाची जोड देत परिसराचा विकास कसा होईल यावर त्यांचे मोठ्या प्रमाणात काम चालू आहे. या सर्व प्रयत्नातून आज कातळशिल्प पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी जगभरातून अनेक पर्यटक, अभ्यासक यांची पावले आज कोंकणाकडे वळत आहेत. अनेक पर्यटक व्यावसायिकांच्या यादीत कातळशिल्पांचा समावेश झाला आहे. परिमाण स्वरूप स्थानिक पातळीवर अगदी लहानसा रिक्षा व्यावसायिक असो की मोठे वाहतूक व्यावसायिक, होम स्टे असो की मोठे हॉटेल व्यावसायिक, जागा मालक असो की ग्रामपंचायत यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ मिळत आहे.
पडद्यामागील चालू असलेली ही कामे फारशी दिसत नाहीत पण
सुधीर रिसबूड, धनंजय मराठे या मंडळींनी तन मन धन अर्पून आपल्या अविरत कामाने आणि अनेक ज्ञात अज्ञात मंडळींच्या सहकाऱ्याने आणि सोबतीने अक्षरशः परिवर्तन घडवून आणत आहेत. त्यांच्या कार्यातून होत असलेल्या परिवर्तनाची एक लहानशी झलक व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून मांडण्याचा एक प्रयत्न..... परिवर्तन.
Saty turned,...............
निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी
रे मिडिया, पुणे