27/02/2020
Our New Campaign.
मराठी म्हंटल कि डोळ्यासमोर येते आपल्या महाराष्ट्राची अस्मिता, आपली साहित्य संस्कृती आणि आपली मायबोली... पण या गोष्टी उरल्या आहेत फक्त बोलण्या पुरत्या, कारण वास्तवात जेव्हापासुन हा फोन आणि लॅपटॉप आला तेव्हा पासून स्वतःच्या हाताने लिहिण्याची सवय आणि ओघानेच आपल्या
स्वतःच्या भाषेलाच आपण इतिहास जमा करून बसलो आहोत आणि सुरु झाली आहे आपलीच आपल्याशी स्पर्धा ग्लोबल होण्याची...
यातूनच आम्हाला एक स्पर्धा घेण्याची कल्पना सुचली.
स्पर्धा हे तर एक कारण आहे, खरंतर हा एक प्रयत्न आहे आपलं मूळ पुन्हा शोधण्याचा. पाटीवर काढलेल्या पहिल्या रेषेची आठवण करून देण्याचा, बोर्डाच्या परीक्षेसाठी घेतलेल्या हिरो पेन ला माळ्यावरून पुन्हा खाली काढून साफ करण्याचा आणि तो साफ करता करता त्यातून लिहिलेल्या अनेक शब्दात दडलेल्या आठवणी पुन्हा जाग्या करण्याचा...
आज मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून पु. ना. गाडगीळ 1832 आयोजित करीत आहोत
'सुंदर अक्षर हाच खरा दागिना'- स्पर्धा
यात फार काही मोठे तीर मारायचे नाहीयेत. फक्त तुमच्या स्वतःच्या अक्षरात काही वाक्य लिहायची आहेत. असु देत कसही अक्षर... मुंगी चालल्यासारखं किंवा मोत्यांच्या दाण्यासारखं... लाजायची गरज नाही किंवा मिरवायची देखील गरज नाही. प्रयत्न करणं सर्वात महत्वाचं आहे अक्षर कसंही असो.
चला तुमचं काम अजून सोपं करूयात, काही वाक्य देत आहोत तीच लिहिलीत तरी चालेल किंवा मराठी बद्दल स्वतः लिहिलत तर सोन्याहून पिवळ.
तर ती वाक्य अशी -
१) सुंदर अक्षर हाच खरा दागिना !
२) लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी !
३) मराठी पाऊल पडते पुढे !
४) (येथे स्वतःचे एकच वाक्य लिहिलेत तरी चालेल )
आणि हो हे नुसतं स्वतः लिहून थांबायचं नाही, तर तुमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम वॉल वर आपल्या मित्र परिवारातील कमीत कमी ३ मित्रांना नॉमिनेट करा आणि पु.ना.गाडगीळ १८३२ च्या पेज ला टॅग करायला विसरू नका नाहीतर स्पर्धेतून बाद. आणि हो... तुमची पोस्ट पब्लिक करायला विसरू नका.
हे सगळे कष्ट घेतलेतच आणि नशीबवान ठरलात तर ३ भाग्यवान विजेते जिंकतील चांदीच पेन. मग आता त्यासाठी तरी का होईना एक छोटासा प्रयत्न करा आणि स्वःताच्या हाताने मराठी लिहिण्याची मजा अनुभवा.
नियम व अटीं शिवाय मजा ती काय...
घ्या तर मग -
१. दिलेला मजकूर हा कोणत्याही पेनाने कागदावर लिहायचा आहे. कॅलिग्राफी स्वरूपात किंवा स्केचपेन, तेलकट खडू, पेन्सिल ने लिहलेला मजकूर चालणार नाही.
२. तुमच्या अक्षराचा फोटो हा स्पष्ट असावा.
3. तुमच्या अक्षराचा फोटो जेव्हा तुम्ही तुमच्या फेसबुक अथवा इंस्टाग्राम वॉल वरून शेअर कराल तेव्हा पु. ना. गाडगीळ १८३२ च्या पेज ला टॅग करायचे आहे आणि तुमच्या मित्रपरिवारातील किमान ३ मित्र-मैत्रिणींना नॉमिनेट करणे बंधनकारक आहे... बंधनकारक म्हणजे COMPULSORY, तरच तुम्हाला
स्पर्धेसाठी ग्राह्य धरण्यात येईल.
४. तुमच्या अक्षराचा फोटो जेव्हा तुम्ही तुमच्या फेसबुक वॉल वरून शेअर कराल त्यावेळी तुमच्या फेसबुक अकाऊंटच्या (EDIT PRIVACY) मध्ये जाऊन तुमच्या पोस्ट चे स्टेटस हे ( PUBLIC ) आहे ना याची खात्री करा. तेव्हाच तुमची पोस्ट हि आमच्यापर्यंत पोहचू शकेल.
५. विजेते निवडताना हस्ताक्षर आणि शुद्धलेखन या दोन गोष्टींची दखल घेण्यात येईल...आपले अक्षर वाईट आहे...कुठे भाग घ्या... असं ज्यांना वाटत असेल तर तुमच्या प्रामाणिक प्रयत्नांची देखील दखल घेतली जाणार आहे . त्यामुळे ‘प्रयत्नांती चांदीचे पेन’ हि म्हण लक्षात घेऊन भाग घ्या.
६. ८ मार्च, २०२० (रविवार) रात्री ९ वाजेपर्यंत तुम्ही या स्पर्धेत भाग घेऊ शकता आणि इतरांना भाग घेण्यासाठी प्रोत्साहन देखील देऊ शकता. स्पर्धा सुरु झाल्यानंतर ८ मार्च,२०२० पर्यंत दोन रविवार देखील तुम्हाला मिळणार आहेत ज्या दिवशी मोकळ्या वेळेचा वापर तुम्ही या स्पर्धेत भाग घेण्यासाठी करू शकता त्यामुळे कृपया ९ मार्च, २०२० ला जागे होऊ नका.
७. 'सुंदर अक्षर हाच खरा दागिना' या स्पर्धेचा निकाल १२ मार्च, २०२० (गुरुवार) ला पु. ना. गाडगीळ १८३२ च्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजवरून जाहीर करण्यात येईल. त्यामुळे १२ मार्च, २०२० ला पु.ना.गाडगीळ १८३२ च्या फेसबुक अथवा इंस्टाग्राम पेज ला भेट द्यायला विसरू नका.
८. ह्या स्पर्धेत भाग घेताना तुम्हाला पु.ना.गाडगीळ १८३२ च्या फेसबुक अथवा इंस्टाग्राम पेज ला लाईक करणे बंधनकारक आहे. ( हा नियम सगळ्यात शेवटी टाकण्याचे कारण हे कि...तुम्ही या नियम व अटी या वाचल्या आहेत कि नाही हे आम्हाला कसं कळणार ? )
९. सुंदर अक्षर हाच खरा दागिना या स्पर्धेचे सर्व अधिकार हे पु.ना.गाडगीळ १८३२ यांच्याकडे राहतील.
*नियम व अटी लागू.