08/07/2024
कुठल्याही कारणांमुळे जर तुम्हाला गडकिल्ले भटकता आले नसतील तर...
परिक्रमा करता आली नसेल तर....
झाडामाडांशी, वेलीफुलांशी बोलता आलं नसेल तर...
प्रत्येक ऋतूच्या प्रत्येक छटेला डोळे भरून पाहता आलं नसेल तर...
थोरल्या महाराजांना भेटता आलं नसेल तर...
किंवा एकुणातच 'जगता' आलं नसेल तर....
गोनिदा वाचा! हे सगळं केल्याचा किमान आभास तरी देणारं लिखाण त्यांनी करून ठेवलंय. कधीकधी वाटतं हा मानवरूपातला प्रत्यक्ष निसर्ग होता, ज्याने त्याच्या पुस्तकांच्या माध्यमातून आपल्याला त्याच्या अंगाखांद्यावर खेळवलं. असल्या ऋषितुल्य माणसाला त्याच्या वाढदिवशी मी कृतज्ञतेशिवाय आणखी काय देणार?
सदानंद गोपाल बेंद्रे