Padhye MEDIA Services

Padhye MEDIA Services Publicity Service for Print & Social Media
Advertisement
&
Event Management

श्रीराम पुजारी जन्मशताब्दी सांगता समारोहानिमित्त संगीत महोत्सवपुणे : सोलापूर येथील सांस्कृतिक राजदूत म्हणून ओळख असणारे व...
21/08/2026

श्रीराम पुजारी जन्मशताब्दी सांगता समारोहानिमित्त संगीत महोत्सव

पुणे : सोलापूर येथील सांस्कृतिक राजदूत म्हणून ओळख असणारे विद्यार्थीप्रिय शिक्षक व समाजधुरीण प्रा. श्रीराम पुजारी यांच्या जन्मशताब्दी सांगता समारोहाचे आयोजन श्रीराम पुजारी प्रतिष्ठानतर्फे पुण्यात करण्यात आले आहे. या निमित्ताने दोन दिवसीय भव्य संगीत महोत्सव होणार असून नामवंत शास्त्रीय गायक व वादक आपली कला सादर करणार आहेत.
संगीत महोत्सव शनिवार, दि. २२ ऑगस्ट आणि रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी कोथरूड येथील पुण्याई सभागृहात होणार आहे. शनिवार, दि. २२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पंडित राम मराठे यांची नात प्राजक्ता मराठे यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. त्यानंतर कश्यप बंधू म्हणून ओळखले जाणारे बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित दिवाकर कश्यप आणि पंडित प्रभाकर कश्यप यांचे युगल शास्त्रीय गायन होणार आहे.
रविवार, दि. २३ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ९ वाजता ‘पप्पा सांगा कुणाचे.....’ ही ज्येष्ठ मराठी चित्रपट अभिनेते अरुण सरनाईक यांच्या जीवनावर आधारित विशेष चित्रफित दाखविण्यात येणार असून त्यानंतर सुप्रसिद्ध शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांचे गायन होणार आहे. दि. २३ रोजी सायंकाळी ५ वाजता पद्मविभूषण पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे शिष्य पंडित रूपक कुलकर्णी यांचे बासरी वादन होणार असून महोत्सवाची सांगता ग्वाल्हेर घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडित ओंकार दादरकर यांच्या शास्त्रीय गायनाने होणार आहे.
कलाकारांना यती भागवत, आशय कुलकर्णी, स्वप्निल भिसे, कालीनाथ मिश्रा (तबला), सिद्धेश बीचोलकर, मिलिंद कुलकर्णी, अभिनय रवंदे, अमेय बिच्चू (संवादिनी) साथसंगत करणार आहेत.
कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१

ऋत्विक फाऊंडेशनतर्फे ‘त्रिवेणी’ मैफलपुणे : ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌तर्फे शनिवारी त्रिवेणी ही वाद्यसंगीताची...
21/08/2026

ऋत्विक फाऊंडेशनतर्फे ‘त्रिवेणी’ मैफल

पुणे : ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌तर्फे शनिवारी त्रिवेणी ही वाद्यसंगीताची अनोखी मैफल आयोजित करण्यात आली आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील सुरांचा गोडवा आणि तालाचा नाद या मैफलीत रसिकांना अनुभवता येणार आहे. यात भारतीय शास्त्रीय संगीतातील तीन अद्वितीय कलाकार एकाच मंचावर आपली कला प्रस्तुत करणार आहेत. स्वप्नील भिसे यांचे एकल तबला वादन, संदीप आपटे यांचे सतार वादन आणि पंडित शैलेश भागवत यांचे शहनाई वादन होणार आहे. कलाकारांना डॉ. उपेंद्र सहस्त्रबुद्धे, प्रियंका भिसे, (संवादिनी), महेशराज साळुंके, सोहम गोराणे (तबला) साथसंगत करणार आहेत. कार्यक्रम शनिवार, दि. २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४:३० वाजता ऋत्विक फाऊंडेशन फॉर परफॉर्मिंग आर्टस्‌, वेदभवन जवळ, कोथरूड येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे.

प्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. ९९२२९०७८०१

22/07/2026
14/03/2026

बासरी परंपरा
@भूगांव पुणे
जयंतीर्थ कुलकर्णी

Address

Pune
411051

Telephone

+919922907801

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Padhye MEDIA Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share