HOMA FARMS

HOMA FARMS Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from HOMA FARMS, Rahimatpur.

Homa Farms Is A Farmer Producer Company Which Gives Best Agriculture Services Including Genuine Seed,Fertilizer Supply And Technical Guidance To Farmers And Marketing Of Farm Product.

12/03/2023

अमेरिकेचे कृषी खाते म्हणतंय की, चालू मार्केटिंग वर्षांत भारताला 90 लाख टन पामतेल, 31 लाख टन सोयातेल, 21 लाख टन सूर्यफूल तेल आयात करावी लागेल. एकूण 141 लाख टन खाद्यतेल आयातीची गरज भासेल. एकूण वार्षिक गरज 231 लाख टन असून, त्यात 141 लाख टन वजा जात जे भरेल ते आहे आपले देशांतर्गत खाद्यतेलाचे उत्पादन.
SEA च्या रिपोर्टनुसार गेल्या वर्षी 1 लाख 57 हजार कोटी रुपयांचे खाद्यतेल भारताने आयात केले होते.
विधिमंडळापासून ते गावाच्या पारावर आपण एव्हढे खाद्यतेल का आयात करतोय, आणि ते कसे थांबवू शकतो याबाबत विचारमंथन झाले पाहिजे.

- दीपक चव्हाण, ता. 12 मार्च 2023.

26/09/2022

उसावरील खोडकीड व नियंत्रण-
तापमानवाढ आणि आर्द्रतेत घट झाल्यास उसावरील खोडकिडीचा प्रादुर्भाव वाढत जातो. जे शेतकरी हलक्‍या जमिनीत उसाची लागण करतात, त्याचप्रमाणे 15 फेब्रुवारीनंतर खोडवा ठेवतात, अशा भागात या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात दिसतो. नुकसानीचा प्रकार पाहता खोडकिडीची मादी पानांच्या खालच्या बाजूस अंड्याचे पुंजके घालते. ही अंडी लांब, गोलाकार, सपाट व एका रेषेत असून रंगाने पांढरी असतात.

अंड्यातून बाहेर आलेली अळी 17 ते 38 तास पानांवर फिरते व नंतर ती उसाच्या सुरळीत अगर जमिनीलगत खोडात शिरते आणि आतील गाभ्यावर उपजीविका करते, त्यामुळे पोंगे वाळतात व कोंब मरतो. शिवाय फुटवा आल्यावर त्याच्यावरही प्रादुर्भाव होऊन फुटवेही मरतात. या सुरळीचा वास उग्र येतो. खोडकिडीमुळे 22 ते 33 टक्के उसाचे वजन घटते. ही कीड 26 ते 65 टक्के मूळ उसाचे नुकसान करते. शिवाय अशा उसात एक ते दीड टक्का साखरउताराही कमी मिळतो.

सुरवातीच्या फुटव्यांचे आठ ते नऊ, दुसऱ्या 27 ते 28, तर तिसऱ्या फुटव्यांचे 75 टक्के नुकसान करते. जर प्रादुर्भाव जास्तच झाल्यास जवळ जवळ 80 ते 90 टक्के कोंब मरून जातात. पर्यायाने उत्पादनात कमालीची घट येते.

नियंत्रणाचे उपाय
1) लागवड केलेल्या उसाची बाळबांधणी 45 ते 50 दिवसांनी करावी, म्हणजे खोडकिडीची छिद्रे बंद होतील व पतंग बाहेर पडण्याचा मार्ग बंद होईल.

2) उन्हाळ्यात पाण्याच्या पाळीमधील अंतर कमी करावे.

3) खोडकिडीची अंडी व कीडग्रस्त पोंगे अळ्यांसह गोळा करून नष्ट करावीत.

4) उसात मका किंवा ज्वारीसारखी पिके घेऊ नयेत.

5) खोडकिडीचा प्रादुर्भाव जास्त दिसून आल्यास दीड मि.लि.

एन्डोसल्फान प्रति लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. (हेक्‍टरी फवारणीसाठी 700 मि.लि. एन्डोसल्फान प्रति 500 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.) साधारणपणे प्रादुर्भाव पाहून 15 दिवसांच्या अंतराने आवश्‍यकतेनुसार दोन ते तीन फवारण्या कराव्यात. फवारणीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

- डॉ. आर. सी. पाटील, यांच्या अनुभवातून

अशीच ऊस शेतीतील नवं नवीन माहिती घेण्या साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्याशी जोडले जा
व्हाट्स उप लिंक
https://wa.me/qr/2BPY5YXLRA3BC1
फेसबुक लिंक-


9096432946

26/09/2022

86032
110 दिवस पूर्ण
शेतकरी-राहुल वाबळे
पावसामुळे मध्यम भरणी करायला उशीर झाला
मध्यम भरणी करून
त्या नंतर 30 दिवसानी मोठी भर होईल (ट्रॅक्टर घरचा आहे)
आमच्याशी जोडले जाण्या साठी खालील लिंक वर क्लिक करा
https://wa.me/qr/2BPY5YXLRA3BC1

9096432946

26/09/2022

किरण पाटील
तेलकुडगाव अहमदनगर
86032
सरीतील अंतर 5 फूट
2डोळा कांडी-अंतर 1 फूट
एकूण क्षेत्र-15एकर
104 दिवस पूर्ण
उसाला काळोखी पानांची लांबी रुंदी एकदम जबरदस्त आली आहे
अशीच ऊस शेतीतील नवं नवीन माहिती घेन्या साठी
खालील लिंक वर क्लिक करून आमच्याशी जोडले जा..!
https://wa.me/qr/2BPY5YXLRA3BC1

9096432946

23/09/2022

जेठा काढावा का..?
जेठा काढणे गरजेचेच आहे का..?

शेतकरी मित्रानो नमस्कार आज आपण पाहणार आहोत जेठा काढावा किंवा न काढावा हा प्रश्न आज अनेक जणांच्या मनात पडतो
काही जणांना असे वाटते फुटवा आहे तर जेठा का काढावा जेठा काढला तर फुटवा भरपूर येईल..?
काही जणांच असे ही मत आहे जर जेठा काढला तर एकरी 5000 रोपे असतील तर एक ऊस दोन किलो भरला असता तरी 10 टन नुकसान होतंय असं ही मत आहे

पण आज हे सगळे गैरसमज आपण या लेखात पाहणार आहोत..!

जेठा हा काढायलाच हवा
जेठा का काढावा
1) जर आपणाला अपेक्षित फुटवा मिळाला नसेल तर जेठा काढल्याने आपण अपेक्षित फुटवा गाठू शकतो
2)जेठा हा बाकी अन्य फुटवयांपेक्षा जास्त शिरजोरी करत असतो पण आपण ज्या वेळी जेठा काढून टाकतो त्या वेळी बाकी फुटव्याला जोर लागून फुटवा सशक्त होतो
3) आपणाला अपेक्षित संख्या मिळाली असेल तरी जेठा काढावा फक्त त्या नंतर आपणाला उसाला हलकीशी भर देता यायला हवी या मुळे आपणाला नको असणारा फुटवा निघणार नाही
या सर्व कारणांमुळे जेठा काढणे हे फायद्याचे असलेलं आपणाला दिसून आले आहे
आपणाला काय वाटत शेतकरी मित्रानो जेठा काढावा की नको ..?
आमच्याशी जोडले जाण्या साठी खालील लिंक वर क्लिक करा..!
https://wa.me/qr/2BPY5YXLRA3BC1

9096432946

22/09/2022
22/09/2022

लय फुटवा म्हणजे लय ऊस...!
लय ऊस म्हणजे लय वजन...!

नेमकं असं असतं का शेतकरी मित्रानो जास्त फुटवा म्हणजे जास्त उत्पन्न ही समीकरणे आज कित्येक शेतकऱ्यांच्या डोक्यात असतात पण आपण कधी खोलात जाऊन विचार केला आहे का की नेमके एका बेटाला किती फुटवा असावा...!
आता हा फुटवा आपण कसा व किती असावा हे कश्या प्रकारे ठरवू शकतो त्याला कोणत्या प्रकारे आपण नियोजित ठेवू शकतो..!

नेमकं सर्व शेतकऱ्यांना आता वाटत आहे की आपण एका बेटात इतकेच ऊस शिल्लक ठेवायचे
आता ठरवलंय आपण असाच संख्यानियोजन करायचे पण ही सर्व शेतकरी गणित ठरवतो पण त्याच वेळी त्याला एका बेटात किती फुटवा असावा का असावा हेच समजत नाही आनि तिथेच उत्पादनात शेतकरी मागे पडतो
आता आपण ठरवूयात एका बेटात उसाची संख्या नियंत्रित कशी करायची ते
या साठी शेतकरी मित्रांनो प्रामुख्याने आपण सरी किती फुटांची पाडत आहे या गोष्टी विचारात घ्यायला हव्यात
व एक रोप किंवा डोळा किती फुटांवर आपण लावत आहोत
उदा-आपण जर सरी 3 फूट सोडत असू व एक रोप दोन फुटांवर लावत असू तर आपणाला एका बेटात सशक्त उसाची संख्या 6 लागेल तर ही संख्या नेमकी आली कशी हे आपण मनाने ठरवू शकत नाही मित्रानो
त्या साठी आपण सोडत असलेली सरी व आपण दोन डोळा किंवा दोन रोपांतील अंतर यांचा गुणाकार करायचा जे उत्तर येईल तितक्या उसाची सशक्त संख्या एका बेटात असायला हवी
उदा-जर आपण 5 फूट सरी व 1 फुटांवर रोप लावत असू तर 5 गुणिले 1 बरोबर 5 हे उत्तर येईल म्हणजे आपणाला एका बेटात 5 सशक्त ऊस ठेवावे लागतील
पण हे सशक्त ऊस आपणाला मोठ्या भरणी नंतर हवे असतात
पण त्या आधी आपणाला ज्या ठिकाणी 5 ऊस हवे असतील तिथे कमीत कमी 7 ऊस जगवावे लागतील म्हणजे त्या मधील काही मशागत, कीड, इत्यादी कारणांमुळे 2 ऊस जरी मेले तरी आपणाला 5 हवे असणारे सशक्त ऊस मिळतील
टीप-लेख मोठा होत होता त्या मुळे कमी शब्दात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
आमच्याशी जोडले जाण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
https://wa.me/qr/2BPY5YXLRA3BC1

9096432946

शेतकऱ्यांनी सरकारवर अवलंबून न राहता एकत्र येऊन स्वतःच्या पॉलिसी स्वतः ठरवायला पाहिजेत
19/05/2022

शेतकऱ्यांनी सरकारवर अवलंबून न राहता एकत्र येऊन स्वतःच्या पॉलिसी स्वतः ठरवायला पाहिजेत

 #काळा आणि  #पांढरा  #घेवडा
12/05/2022

#काळा आणि #पांढरा #घेवडा

संकरित घेवडा  #वरुण
12/05/2022

संकरित घेवडा #वरुण

भौगोलिक मानांकन असलेला कोरेगाव चा  #वाघा  #घेवडाउत्तर भारतात याला राजमा म्हणून ओळखतात
12/05/2022

भौगोलिक मानांकन असलेला कोरेगाव चा #वाघा #घेवडा
उत्तर भारतात याला राजमा म्हणून ओळखतात

Address

Rahimatpur
415116

Telephone

+919960322614

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when HOMA FARMS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to HOMA FARMS:

Share