07/04/2020
व्यवसाय
करत असताना त्याचा कधी वेग वाढवावा व कधी कमी करावा हे शिकले पाहिजे!
कोरोना संकटाकडे मराठी तरुणांनी लक्षपूर्वक बघितलं तर त्यात एक उत्तम संधी लपली आहे
तालुका पातळीवर इंजिनियरिंग, आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स, आयुर्वेदिक, होमियोपॅथी, ऍलोपॅथी सारख्या शिक्षण संस्था जोमाने वाढल्या आणि दरवर्षी हजारो उच्च पदवीधर निर्माण होऊ लागले
आज समजा असे इंजिनियर, इतर पदवीधर ज्यांच्याकडे स्वतःची शेती आहे, पण ते नोकरीसाठी शहरात आहेत, अशांनी जर परत गावाकडे जाऊन शेती करायचं जरी ठरवलं, तरी त्यांच्या शिक्षणाचा आणि वडीलधाऱ्यांच्या अनुभवाचा सुंदर मिलाफ होऊन शेतीच उत्पन्न वाढू शकतं
नोकरीपेक्षा खूप चांगलं आयुष्य जगता येईल. आज शहरात एका दिवसाला जितका पेट्रोलचा खर्च आहे तितका खर्च गावाकडे संपूर्ण महिन्याला लागतो.
शहरात कमीतकमी ५० लाखाचं कर्ज घरासाठी, दहा लाखाची गाडी, आणि प्रत्येक महिन्याचे खर्च धरले तर पुढच्या दहा वर्षात किती रक्कम होते याचा अंदाज काढा.
गावाकडे तर स्वतःच घर आहे, त्यात आपल्यासाठी वेगळी बेडरूम फक्त बांधावी लागेल कदाचित, आणि उरलेल कर्ज काढायची गरजच नाही. म्हणजे महिन्याचा खर्च कमी, शिवाय गावाकडे हवापाणी चांगलं, शुद्ध भाज्या, ताज दूध असं सगळंच चांगलं आहेच की.
म्हणजे ताणरहित आयुष्य, सुदृढ आयुष्य आहे, शिवाय दररोजचा ट्रॅफिकचा वेळ आणि कटकट वाचेल.
शहरातील जगण्याची जीवघेणी स्पर्धा आणि त्यातून निर्माण होणार डिप्रेशन, स्ट्रेस, त्यातून वाढत चाललेली व्यसनाधीनता, घरातल्या मुलांसाठी बायकोसाठी वेळ नसणे, अशा कितीतरी त्रासदायक गोष्टी ग्रामीण भागात नाहीत.
आज शेतीवर जगभरात संशोधन झालेलं आहे, परंतु आपल्या देशातील तरुणांनी शेतीकडे पाठ फिरवल्यामुळे आज आपल्या शेतीची अशी दुर्दशा झालेली आहे.
त्यामुळे शेती हा व्यवसाय न राहता उपकारात्मक सामाजिक कार्य की जे फक्त सरकारी अनुदानावर चालते आणि राजकीय व्होटबँक इतकंच शिल्लक राहिले आहे.
जेवढी शारीरिक आणि मानसिक मेहनत शहरात तरुण घेत असतो, त्याच्या निम्मीदेखील मेहनत शेतीवर केली तरीसुद्धा नोकरीपेक्षा दुप्पट उत्पन्न शेतीतून निघू शकते.
जितक्या समस्या आज शहरात राहतांना तरुण पिढी अनुभवते आहे त्याच्या मानाने शेतीमध्ये तितक्या समस्या नाहीत. आज आपल्या शेतीची जी दुर्दशा झालेली आहे त्याला तरुणांनी पाठ फिरवली हे देखील तितकेच महत्वाचे कारण आहे.
आज शेतीला इतक्या प्रकारचे जोडधंदे आहेत की त्याचा शहरातील तरुण विचार देखील करू शकत नाही.
शेतीबरोबर पशुपालन, दूध आणि दुधापासून बनणारे असंख्य खाद्य पदार्थ, शेतीसाठी लागणारे अवजारे, बी बियाणे, तंत्रज्ञान, शेतीतून तयार झालेल्या मालाचे लॉजिस्टिक इथपासून ते अगदी जगभरात निर्यातीची व्यवस्था आज संधी निर्माण झालेली आहे.
इंटरनेट आणि ईकॉमर्स च्या माध्यमातून जग जवळ आलेलं असतांना याचा प्रभावी आणि कल्पकतेने वापर करून जगभरात आपण शेतीचा व्यवसाय करू शकतो.
कोरोना मुळे शांतपणे स्वतःविषयी, आपल्याला आयुष्यात नक्की काय हवं आहे? कस आयुष्य जगावं? शहरातील ताणतणावाची धावपळ की गावाकडचं समृद्ध जीवन?