24/05/2018
*अचानक कंपनी बंद पडणं ,
जॉब जाणं
व्यवसाय अडचणीत येणं
उत्पन्न एकदम कमी होण
हे कोणाच्याही
आणि केंव्हाही वाट्याला येऊ शकतं
त्रास होणं , झोप उडन , काळजी वाटणं स्वाभाविक आहे
पण हिंमत हारू नका !*
मात्र काही निर्णय ताबडतोब घ्यावे लागतील
चार रूम मध्ये राहात असाल दोन रूम मध्ये रहा
दोन मध्ये रहात असाल एक मध्ये जा
फोर व्हीलर वापरत असाल
टू व्हीलर घ्या
चारिठाव स्वयंपाक होत असेल
फक्त पोळी-भाजी वर या
काही loan घेतलेले असेल तर ते Clear करण्याचा प्रयत्न करा !
नातेवाईकाला शिव्या देऊ नका
फालतू डायलॉगबाजी अगोदर बंद करा
वेळच येऊ नये , कुणीच कुणाचं नसतं
त्याच त्या घिस्यापिट्या कॅसेट्स वाजउ नका !
शंभर पैकी दोन चार जण नक्की मदत करत असतात
त्यांचं नाव घ्या
96 जणांना नावं ठेवण्या पेक्षा 4 जणांना चांगलं म्हणा !
थोडक्यात काय ,
आपला आर्थिक स्रोत कमी झाला आहे
हे समजून घ्या
आणि गरजा कमी करा !
अजून एक महत्वाची गोष्ट
अशा प्रसंगी .......
बायकोने नवऱ्याला साथ देणे
खूप गरजेचे आहे
त्याला टोमणे मारू नका ,
त्याच्या दुर्गुणांवर बोट ठेवण्याची ही वेळ नाही
हे जरा समजून घ्या
शाब्दिक बाणांनी सुद्धा माणूस घायाळ होऊन कोलमडून पडू शकतो
हे नीट समजून घ्या
राम वनवासाला निघाल्यावर ,
सिता आपण होऊन रामा सोबत वनवासाला निघाली
याचा अर्थ .......
राजवैभव असो किंवा वनवास असो
आहे त्या परिस्थितीत मी तुमची साथ देईल
तुम्हाला सोडून जाणार नाही
अवास्तव मागण्या करणार नाही
असा त्याचा अर्थ असावा !
वाढलेले खर्च कमी कसे करता येतील
ती पावलं अगोदर उचला
पोरं जर खूप जास्त फिस असणाऱ्या मोठाल्या शाळेत असतील
तर त्यांच्या शाळा बदला
फिस भरतांना ओढाताण होणार नाही
त्या शाळेत टाका
लोकांच्या हसण्याचा नाही स्वतःच्या खिशाचा विचार करा !
दिवस राहत नसतात
मार्ग निघत असतात
कोणतंही काम करण्याची
लाज बाळगू नका
अगदी भाजी पोळी करण्या पासून ते
ड्रेस मटेरियल विकण्या पर्यंत काहीही करा
घरातल्या मोबाईलची संख्या कमी करा
इतरांशी स्पर्धा करू नका , तुलना करू नका
कोणाच्याही लग्नाकार्यात उपस्थित राहण्या पेक्षा चार पैसे कमवण्यासाठी वेळ खर्च करा
कमी पगारावर join व्हायची वेळ आली तरी पटकन हो म्हणा
हेच मार्ग आहेत संकटातून बाहेर पडण्याचे !
नातेवाईकांना , लोकांना शिव्या देऊन काहीही होत नसतं
कोणी न कोणी मदत करतच असतं
आणि एक गोष्ट लक्षात ठेवा
उद्या दिवस सुधारल्या नंतर ज्यांनी मदत केली होती
त्यांच्या वरच तगंड वर करू नका !
कारण मदत करणाऱ्याचे अनुभव फार चांगले नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे !
हे मत बदलण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा
सगळं चांगलं होईल
काळजी करायची नाही आणि
हिंमत हारायची नाही !!!
*हिम्मत हरू नका दुसऱ्याला दोष देऊ नका पहा आपल्यातील बदल आपल्यात बदल नक्कीच घडवून देईल.*