Vishal Awatade

Vishal Awatade Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vishal Awatade, Advertising/Marketing, Virwade(B. K. ) Tal:Mohol Dist:Solapur, Solapur.

शंभु समशेरीचे पुण्यजाहली स्वराज्यदौलत धन्यबेशक रणमर्द मराठामर्द सिवाका छावा !!हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर ...
20/03/2023

शंभु समशेरीचे पुण्य
जाहली स्वराज्यदौलत धन्य
बेशक रणमर्द मराठा
मर्द सिवाका छावा !!

हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती, धर्मवीर संभाजी महाराजांनी हिंदू धर्मासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. शत्रूच्या हाती सापडल्यानंतर अनेक हालअपेष्टा सहन केल्या. मात्र, शरणागती पत्करली नाही. स्वराज्याची आणि हिंदुत्वाची अस्मिता मरणानंतर देखील जिवंत राखत, एक दैदीप्यमान पराक्रमी म्हणून त्यांचे शौर्य इतिहासात अजरामर झाले.

रणधुरंधर, महापराक्रमी, संस्कृतपंडित, अजिंक्ययोद्धा छत्रपती संभाजी महाराज यांना बलिदान दिनी शतश: नमन !!🚩🚩💐💐🙏🙏

31/10/2021
19/09/2021

तरण्या बांड पोरांना लाजवेल अशा आवेशात शिवकालीन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके करून त्यांचा प्रसार आणि प्रचार करणारे रायगड शिवराज्याभिषेक सोहळा ,दिल्लीतील शिवजयंती ,तसेच महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आपल्या शिवकालीन युद्धकलेची कला सादर करणारे आपले लाडके शेलारमामा सहयाद्री शिलेदार दत्तू विठू पाटील यांचे दुःखद निधन झाले .
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

20/08/2021
25/06/2021

वयोवृद्ध महिलेच्या घरावर ताड़पत्री टाकून पाऊसा पासुन बचाव करतांना पोलीस अधिकारी आणि कर्मचारी.....

प्रत्येक अडचणी मध्ये धावून येणाऱ्या पोलिस बांधवांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.....

18/06/2021
"समृद्ध शहरांवर हल्ला करून करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनानींवर तुटून पडणे यात संताजीची ख्याती होती. ज्याला ज्या...
18/06/2021

"समृद्ध शहरांवर हल्ला करून करून त्यांचा नाश करणे आणि नामांकित सेनानींवर तुटून पडणे यात संताजीची ख्याती होती. ज्याला ज्याला म्हणून संताजीशी मुकाबला करण्याचा आणि लढण्याचा प्रसंग आला त्याच्या नशिबी तीन परिणाम असत एक तर तो मारला जाई किंवा जखमी होऊन संताजीच्या कैदेत सापडे किंवा त्याचा पराजय होई आणि त्याचे सैन्य गारद होई. जो यातून वाचेल त्याला आपला पुनर्जन्म झाला असे त्याला वाटे. युद्ध करण्यासाठी जिकडे जिकडे म्हणून संताजी जाई तिकडे त्याचा मुकाबला करण्यास बादशाहच्या प्रतिष्ठीत सरदारापैकी एकही तयार होत नसे. जगात धड़की भरून सोडणारी फौज घेऊन संताजी कोठेही पोहचला की वाघासारख्या काळीज असलेल्या सेनांनीची हृदये कंपायमान होत "

मोगल इतिहासकार खाफिखान याने सरसेनापती संताजी घोरपडे यांच्या पराक्रम आणि युद्धकौशल्य याचे हे वर्णन, सरसेनापती संताजी घोरपडे यांचा मोगल सरदारांना केवढा धाक आणि दरारा वाटत होता हेच या वर्णनातून दिसून येते.. 🙏🚩 पोस्ट साभार : Raj Jadhav


#श्रीशंभूछत्रपतीराज्याभिषेकसोहळा
#राजधानीरायगड

आज १७ जून १६७४" राष्ट्रमाता / राजमाता जिजाऊ स्मृती दिन "विनम्र अभिवादनछत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळाझाल्यानंतर अवघ...
17/06/2021

आज १७ जून १६७४
" राष्ट्रमाता / राजमाता जिजाऊ स्मृती दिन "
विनम्र अभिवादन

छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा
झाल्यानंतर अवघ्या ११ दिवसांनी"आऊसाहेब जिजाऊ"
यांच किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या"पाचाड"
या गावी निधन झालं.
लाखो-करोडोंचा हा महाराष्ट्र दुखाच्या छायेखाली गेला.
स्वराज्याची प्रेरणाच स्वराज्यातून निघून गेली.

आमचा शिवबा पोरका झाला, आमचा बाळशंभू पोरका झाला,
आमचा रायगड पोरका झाला, आमचा सह्याद्री पोरका झाला,
आणि आमचं"स्वराज्य"पोरकं झालं.
आधार गेला आमचा, आता उरला फक्त घनदाट अंधार……

याच"जिजाऊ"ज्यांच्या प्रेरणे उजळे स्वराज्य ज्योती,
याच"जिजाऊ"ज्यांनी घडविले"राजे शिवछत्रपती".

जिजाऊ तुम्ही नसता तर नसते झाले शिवराय नी शंभु छावा....!
जिजाऊ तुम्ही नसता तर नसता मिळाला स्वराज्य ठेवा ....!
जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे ......!
जिजाऊ तुम्ही नसता तर दिसले नसते विजयाचे सोहळे ..... —

आऊसाहेब जिजाऊना त्यांच्या ३४७ व्या पुण्यतिथी निमित्त भावपूर्ण आदरांजली आणि मानाचा मुजरा.....

तुमच आमच नात काय
जय जिजाऊ जय शिवराय

* #छत्रपती_संभाजी_महाराज_सेवा_समिती🚩*

16/06/2021
12/06/2021

खरा दुर्गसेवक ही पोस्ट share केल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही .....

हौसे-मौजेच्या पाळण्यात राजगडाच्या 'दुर्गमपणाची' अवहेलना नको...!

● राजगड हा अतिशय उंच.त्याची उंची पाहता तो सर्व किल्ल्यांमध्ये श्रेष्ठ आहे. त्याचा घेर 12 कोसांचा .त्याच्या उंचीची व मजबुतीची कल्पनाच करवत नाही. या डोंगरातील द-याखो-यातून आणि घनदाट अरण्यातून कोणीही फिरू शकत नाही. अपवाद फक्त वारा आणि पावसाच्या पाण्याचा. किल्ल्याच्या तटाखाली भयंकर द-या आणि त्यांतून जाणा-या अवघड वाटा आहेत. तेथून माणूस जाणे केवळ अशक्य आहे. - साकी मुस्तैदखान आपल्या मासिरे आलमगिरीमध्ये लिहितो.

● " या किल्ल्याचे मी वर्णन तरी कसे करू ?काय या किल्ल्याची उंची! काय त्याचा विस्तार. जणू काही आकाशच पसरले आहे. त्याचे उंचच उंच टोक पाहून छातीच दडपते.त्याच्या प्रचंड वजनामुळे सर्व पृथ्वीचा भार सहन करणारा पाताळातील वृषभ नेहमीच ओरडत असावा. राजगड किल्ला म्हणजे जणू डोंगरांचीच रांग.त्याला सगळीकडून वेढा घालणं केवळ अशक्य. त्याचा घेर तब्बल बारा कोसांचा.. - महंमद खाफीखान

●" राजगड हा डोंगरी किल्ला अभेद्य आहे. मावळ्यांचा पुढारी शिवाजी याला राज्यविस्तारासाठी त्याचा भरपूर उपयोग झाला.... - जेम्स डग्लस.

खाफीखान,मुस्तैदखानासारख्या शत्रूंनाही ज्या किल्ल्याच्या दुर्गमतेचा धाक आणि दरारा वाटत होता असा हा राजगड.ज्या किल्ल्याच्या उंचीकडे,विस्ताराकडे पाहून हे परकीय लोकही आश्चर्याने तोंडात बोटे घालतात त्या किल्ल्याची खरी ताकद कशात असेल तर त्याच्या देवदुर्लभ दुर्गमतेत.आंग्ल इतिहासकार डग्लस देखील एके ठिकाणी म्हणतो- शिवाजी महाराजांचे दुर्ग म्हणजे भारतातील त्यांच्या शत्रूंना धाक होता.

महाराष्ट्रातील किल्ले शत्रूंबरोबर लढले,पडले,ढासळले ,कोसळले आणि पुन्हा- पुन्हा ताठ मानेने उभे राहिले ते त्यांच्या दुर्गमतेच्या जोरावरच.दुर्गमता हिच इथल्या किल्ल्यांची खरी ताकद आणि ओळख.

महाराज स्वतःच एके ठिकाणी म्हणतात-आमच्या या कठीण प्रदेशात कल्पनेचा नुसता घोडा नाचवणे देखील कठीण मग तो प्रदेश काबीज करण्याची गोष्टच कशाला.

'दुर्गम इति दुर्ग' हेच इथल्या दुर्गांच्या यशाचे खरे सूत्र आहे हे देखील थोरले महाराजच आम्हाला सांगून गेले.

ज्या दुर्गांच्या दुर्गमपणांनी शत्रूंच्या मनातही वेळोवेळी धडकी भरवली त्या दुर्गांचा दुर्गमपणा पर्यटन आणि विकास या गोंडस नावांखाली हिरावून घेणे म्हणजे शिवविचारांशी प्रतारणा केल्यासारखेच नाही आहे का? महाराजांनी ज्या दुर्गनितीने हे गडकोट जोपासले त्या दुर्गनितीलाच खिंडार पाडून किल्ल्यांवर हव्या त्या गोष्टी करण्याचा अधिकार आपल्याला खरच आहे का?

राजगड किल्ला तर शिवविचारांचा आणि महाराष्ट्राला लाभलेल्या दुर्गसंपत्तीचा खराखुरा आत्मा आहे .महाराजांच्या विचारांशी प्रतारणा करून त्यांच्या आवडत्या राजगडाच्या दुर्गमपणाला हात घालण्याच पाप 'दुर्गांचा देश' म्हणविणा-या महाराष्ट्र भुमित तर न झालेलेच बरे आहे.

आपले दुर्ग एवढे दुर्गम का होते व महाबलाढ्य शत्रूही त्यांच्या दुर्गमत्वाची एवढी स्तुती का करत होते हे जर नव्या पिढीपर्यंत योग्य रित्या पोहचवायचे असेल तर दुर्ग आहे तसेच जोपासणे व दुर्गम म्हणूनच नव्या पिढीला दाखवणे कधीही योग्य राहील..नाहीतर रोपवेत बसून राजगडावर पोहचणा-या आमच्या नव्या पिढीला 'दुर्गम इति दुर्ग ' म्हणवणारे महाराज कसे बरे समजतील..?

खाफीखान,मुस्तैदखानाच्या राजगडाविषयीच्या भितिला देखील भविष्यात काल्पनिक आणि अनाठायी ठरवले गेल्यास नवल वाटायला नको.

( सिंहगडावर जायला एवढी सोपी वाट असताना तानाजी मालुसरे एवढ्या अवघड जागेतून गड का चढले ..हा गड तर जिंकायला किती सोप्पा आहे .. ?

गाडीमार्गाने गडावर जाणा-या लहान मुलांना पडलेले असे बाळबोध प्रश्न मी अनेकदा ऐकलेले आहेत.)

सिंहगड,प्रतापगड,रायगड,प्रचंडगडा सारख्या महत्वपूर्ण पण आपला दुर्गमपणा हरवून बसलेल्या किल्ल्यांच्या पंक्तीत गडांच्या या राजाची वर्णी लागू नये एवढीच इच्छा.कारण महाराष्ट्राला लाभलेल्या दुर्गसंपत्तीत तो एकमेवाद्वितीय आणि अनमोल असा आहे.त्याला जोपासण हे आपलं कर्तव्य आहे ना की त्याच्या समस्येत भर घालणं.

राजगडावर सध्या खरच काही करण्याची गरज असेल तर ती त्याच्या तटाबुरूजांना सावरण्याची.गेली कित्येक वर्षे स्वराज्याची राजधानी असलेल्या या गडाकडे सर्वांचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे.महाराजांची जिवंत सावली असलेला हा गड राजांच्या विचारांतूनच जेवढा आम्ही जोपासू तेवढीच आणि तीच खरी शिवविचारांना मानवंदना असेल.रोपवेचा खुळचट विचार महाराजांच्या या राजदुर्गाला केवळ आणि केवळ यातना देणाराच ठरेल.

गडसर्वांना पाहता यावा हा विचार जरी चांगला असेल तरी रोपवे हा त्याला पर्याय असू शकत नाही .जर खरच गडावर काही करायचे असल्यास राजगडावर येणा-या वाटांपैकी पाली दरवाजा व चोर दरवाजाच्या वाटेवर आवश्यक व अवघड ठिकाणी गडाला साजेशा अशा दगडी पाय-या नक्कीच बांधता येऊ शकतात. जेणेकरून घसरड्या वाटांवरून चढण्याचा त्रास असलेल्यांना ,लहानांना,वयस्करांना गड चढाई सुलभ होऊ शकेल.

दुसरी गोष्ट पाली दरवाजा आणि चोर दरवाजा मार्गावर गर्दी होते म्हणून रोपवेचा पर्याय पुढे आल्याचे सांगितले जात आहे .या समस्येवर खरेच तोडगा काढायचा असल्यास गुंजवणे दरवाजा ची वाट तिथल्या वृक्षसंपदेची व गडाची हानी न करता वापरात आणणे व तो मार्ग पाली दरवाजा प्रमाणे गढचढाईस योग्य करने हाच एकमेव पर्याय गडाच्या दृष्टीने योग्य आणि फायदेशीर असू शकतो. अर्थात हे ही आवश्यक असल्यासच.

शिवविचारांना व गडाला अनुसरून अशा ब-याच गोष्टी राजगडावर करता येऊ शकतात.परंतू रोपवेचे खूळ राजगडाला न चिकटलेलेच बरे.नाहीतर महाराजांच्या 'दुर्गम दुर्ग 'विचारांतल हे शेवटच दुर्गपुष्प देखील आपल्या हातून गेलेलं असेल.

पर्यटनाला चालना द्यायला आणि हौसे-मौजेचे पाळणे बांधून मजा-मस्ती करायला महाराष्ट्रात महाबळेश्वर-माथेरान सारखी असंख्य पर्यटन स्थळे आहेतच की.ज्या ठिकाणी असे असंख्य पाळणे बांधून पर्यटनाची योग्य भरभराट करता येऊ शकते.परंतू किल्ले ,रोपवे आणि गाडीरस्ते हे चुकीचे समीकरण राजकारण्यांच्या 'किल्ले संवर्धन यादीतून' कायमचे बादच करायला हवे.तरच किल्ले योग्यरीत्या जोपासले जातील अन्यथा भविष्यात किल्ल्यांचे महाबळेश्वर-माथेरान व्हायला वेळ लागणार नाही.

किल्ल्यांना खरी गरज आहे ती 'संवर्धनाची' ना की 'अनावश्यक पर्यटन वाढीची'

पोस्ट साभार - श्री. अमित निंबाळकर यांच्या फेसबुक वॉलवरून

*रणमर्दांच्या इतिहासाची स्मारकं झुल्याच्या पाळण्यात बसून बघायची नसतात 🚩*
12/06/2021

*रणमर्दांच्या इतिहासाची स्मारकं झुल्याच्या पाळण्यात बसून बघायची नसतात 🚩*

11/06/2021

अशा प्रवृत्ती चा खरच राग येत असेल तर पोस्ट share केल्याशिवाय पुढे जाऊ नका 😡

का आमचा सह्याद्री पोखरताय ? तुमच्या रिसॉर्ट च्या गॅलरी मधून बघायच्या view साठी ? की इथे आता वर्षानुवर्षे डोंगर वरपर्यंत फोडणारी खाण सुरू केलीये .. ?

आपले सजग पर्यावरण मंत्री ह्याची दखल घेतील ही माफक अपेक्षा

#ब्रह्मगिरीवाचवा
#मीएकदुर्ग

Address

Virwade(B. K. ) Tal:Mohol Dist:Solapur
Solapur
413253

Telephone

+919527199279

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vishal Awatade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Vishal Awatade:

Share