Democratic India News

Democratic India News News and Views For People of India "Democratic India News" is लोकतांत्रिक भारत की आवाज News and views Page for people of India.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमान दुर्घटनेत अपघाती मृत्यू #भावपूर्णश्रद्धांजली
28/01/2026

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमान दुर्घटनेत अपघाती मृत्यू

#भावपूर्णश्रद्धांजली

'बिनविरोध’ प्रभागांमध्येही मतदान बंधनकारक करण्यासाठी बॉम्बे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखलठाणे | ९ जानेवारी २०२६ :महा...
11/01/2026

'बिनविरोध’ प्रभागांमध्येही मतदान बंधनकारक करण्यासाठी बॉम्बे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
ठाणे | ९ जानेवारी २०२६ :
महानगरपालिका निवडणुकांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून देताना मतदान न घेण्याच्या पद्धतीला आव्हान देत सामाजिक कार्यकर्ते अजय जेया यांनी बॉम्बे उच्च न्यायालयात जनहित याचिका (PIL) दाखल केली आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निवडणूक कार्यक्रमाचे काटेकोर पालन करावे आणि एकच उमेदवार शिल्लक राहिला तरीही मतदान व मतमोजणी प्रक्रिया पार पाडावी, असे निर्देश देण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.
ही याचिका महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक ५(अ), १४(अ), १७(ब), १८(ब), १८(क) आणि १८(ड) या सहा प्रभागांशी संबंधित आहे. ३१ डिसेंबर २०२५ रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी झाल्यानंतर २ जानेवारी २०२६ रोजी एक वगळता सर्व उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. परिणामी, उर्वरित उमेदवारांना मतदान न घेता बिनविरोध निवडून घोषित करण्यात आले. यामुळे मतदारांचा ‘नोटा’ (NOTA – None of the Above) या पर्यायाद्वारे असहमती नोंदवण्याचा घटनात्मक अधिकार हिरावून घेतला जातो, असा याचिकाकर्त्याचा युक्तिवाद आहे.
याचिकेत नमूद करण्यात आले आहे की, नोटा पर्यायामुळे ‘बिनविरोध निवडणूक’ ही संकल्पनाच बदलली आहे. एकच उमेदवार असला तरी मतदार नोटा निवडू शकतात. अशा परिस्थितीत नोटाला अधिक मते मिळाल्यास नव्याने निवडणूक घेण्याची गरज भासू शकते, ज्यामुळे लोकशाही उत्तरदायित्व अधिक मजबूत होते, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.
तसेच, काही प्रभागांमध्ये सत्ताधारी पक्षाशी संबंधित उमेदवारांच्या फायद्यासाठी इतर उमेदवारांवर दबाव टाकून सामूहिक माघारी घडवून आणल्या जात असल्याची प्रवृत्ती वाढत असल्याबद्दलही याचिकेत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली आहे. अशा प्रकारांमुळे मुक्त व निष्पक्ष निवडणुकांच्या संकल्पनेला धक्का बसतो आणि लोकशाही प्रक्रियेवरील जनतेचा विश्वास कमी होतो, असे याचिकेत म्हटले आहे.
ही याचिका कोणत्याही विशिष्ट उमेदवाराच्या निवडीला आव्हान देत नसून, मतदान न घेता उमेदवार निवडून घोषित करण्याच्या कायदेशीर व घटनात्मक वैधतेवर प्रश्न उपस्थित करते, असे स्पष्ट करण्यात आले आहे. १५ डिसेंबर २०२५ रोजी जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार संबंधित प्रभागांमध्ये मतदान घेऊन, उमेदवारांसह नोटा मतांची मोजणी करूनच निकाल जाहीर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
या प्रकरणाची सुनावणी लवकरच होण्याची शक्यता आहे.

ठाणे महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने सहकारनगर परिसरात शिवसेना-भाजपा, रिपब्लिकन सेना व महायुतीचे अधि...
08/01/2026

ठाणे महानगर पालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या अनुषंगाने सहकारनगर परिसरात शिवसेना-भाजपा, रिपब्लिकन सेना व महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून हनुमंत जगदाळे, प्रशांत (राजा) सुभाष जाधवर, सौ. सरिता दिगंबर ठाकूर, सौ. वनिता संदीप घोगरे यांच्या वतीने कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधला व सेवाभावी व पारदर्शक कार्याचा भक्कम निर्धार पुन्हा एकदा व्यक्त केला.

07/12/2025

शास्त्री नगर , सहकार नगर व लोकमान्य नगर विकासासंदर्भात ज्येष्ठ नगरसेवक हनुमंत जगदाळे यांचे मोठे विधान

शास्त्री नगर , सहकार नगर आणि लोकमान्य नगर परिसरातील विकासकामांबाबत सुरु असलेल्या चर्चांना आज ज्येष्ठ नगरसेवक मा. हनुमंत जगदाळे यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देत नागरिकांची संभ्रमातून मुक्तता केली.

जगदाळे म्हणाले, “नागरिकांनी कुठल्याही अफवा किंवा संभ्रमाला बळी न पडता आपल्या हक्काच्या घरासाठी ठामपणे उभे राहावे. काही मंडळी जाणूनबुजून विकास प्रक्रियेबाबत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु सत्य परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे.”

ते पुढे म्हणाले,
“एक जनप्रतिनिधी म्हणून मी स्पष्ट शब्दांत सांगू इच्छितो की— शास्त्री नगर, सहकार नगर व लोकमान्य नगर येथील कोणतेही घर सर्व कायदेशीर कागदपत्रांची पडताळणी करु, ठा. म. पा. कडून नकाशे मंजूर केल्या शिवाय व ठा. म. पा. मधून काम चालू करण्याची परवानगी दिल्या शिवाय ( CC ) कोणत्याही नागरिकांचे घर खाली केले जाणारं नाही अशी ग्वाही देतो.
प्रत्येक नागरिकाला समूह विकास योजनेच्या माध्यमातून मालकी हक्काचे घर मिळावे ही भावना महाराष्ट्र शासन तसेच राज्याचे उप मुख्यमंत्री व नगर विकास मंत्री एकनाथ राव जी शिंदे साहेब यांची पहिल्या पासूनच आहे व त्यांना आमचे नेहमी सहकार्य आहे परंतु योजना राबवत असताना नागरिकांना मालकी हक्काचे घर मिळण्या बरोबरच कायदेशीर प्रक्रिया राबवण्यासाठी सहकार्य असणे गरजेचे आहे व ते नागरिकांनी करावे तरचं आपल्या विभागाचा विकास होण्यासाठी आपल्या सर्वांचा हातभार लागू शकतो”

परिसरातील रहिवासीही स्वतःच्या भागातील विकासाबाबत सकारात्मक असून, सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर विकासकामांना लवकरच सुरुवात होईल, असा त्यांना विश्वास आहे.

जगदाळे यांच्या ठाम विधानामुळे नागरिकांचा आत्मविश्वास अधिक दृढ झाला असून, हक्काचे तसेच अधिकृत घर मिळण्याचा मार्ग आता अधिक स्पष्ट आणि सुकर होणार असल्याची भावना रहिवाशांमध्ये व्यक्त होत आहे.

उत्तर प्रदेश पुलिस के उपनिरीक्षक मनोज कुमार उपाध्याय का चयन अंतरराष्ट्रीय एशियन मास्टर्स एथलेटिक्स चैम्पियनशिप के लिए 🏆🇮...
03/11/2025

उत्तर प्रदेश पुलिस के उपनिरीक्षक मनोज कुमार उपाध्याय का चयन अंतरराष्ट्रीय एशियन मास्टर्स एथलेटिक्स चैम्पियनशिप के लिए 🏆🇮🇳

उत्तर प्रदेश पुलिस के उपनिरीक्षक मनोज कुमार उपाध्याय का चयन अंतरराष्ट्रीय एशियन मास्टर्स एथलेटिक्स चैम्पियनशि....

28/09/2025

🚨 अतिवृष्टीचा इशारा!
मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पूरस्थितीची शक्यता 🌧️
📞 मदत: १९१६ / ९३७२३३८८२७ / ८२७५१५२३६३

आज (३ सप्टेंबर २०२५) झालेल्या GST परिषदेतर्फे घोषित केलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा आजची जीएसटी संबंधित मुख्य घोषणा१. ज...
03/09/2025

आज (३ सप्टेंबर २०२५) झालेल्या GST परिषदेतर्फे घोषित केलेल्या महत्त्वाच्या निर्णयांचा
आजची जीएसटी संबंधित मुख्य घोषणा

१. जीएसटी स्लॅबमध्ये मोठा बदल
GST परिषदेत निर्णय घेण्यात आला की, आताच्या चार स्लॅब्स — 5%, 12%, 18%, आणि 28% — आता फक्त दोन स्लॅबमध्ये रूपांतरित होतील: 5% आणि 18%. यासोबत, ’पण, तंबाखू, गुटखा, उच्च श्रेणीच्या गाड्या इत्यादी’ वस्तूंवर नवीन 40% स्लॅब सुद्धा लागू केला जाणार आहे

प्रभावी तारीख म्हणून २२ सप्टेंबर २०२५ निश्चित करण्यात आला आहे, त्या दिवशी नवीन स्लॅब्स लागू होतील.

२. दरांमध्ये होणारी घट आणि बदल
दैनंदिन उपयोगाच्या वस्तूंवर — जसे कि टूथपेस्ट, शॅम्पू, साबण, इ., जीएसटी 18% वरून 5% करण्यात येईल

इलेक्ट्रॉनिक्स (टीव्ही, एसी), लहान गाड्या — जीएसटी 28% वरून 18% पर्यंत कमी होईल

जीवन व आरोग्य विमा पॉलिसीज — या अब्जेक्टवर GST माफ करण्यात येणार, म्हणजेच 0% GST

ब्रेड (रोटी, पराठा, पनीर), पॅक केलेले पदार्थ — यावर जीएसटी 5% किंवा शून्य (0%) करण्यात येणार

३. सुविधा आणि व्यवहार सुधारणा
एमएसएमई आणि स्टार्टअप्ससाठी GST नोंदणी कालावधी — 30 दिवसांऐवजी आता फक्त 3 दिवसांत पूर्ण होईल.

निर्यातकांसाठी ऑटोमॅटिक GST रिफंड सुविधा सुरु केली जाणार आहे

📰 हिंदू स्थलांतरितांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णयभारतामध्ये स्थलांतर करून आलेल्या हिंदू धर्मीय नागरिकांसाठी केंद्र सरक...
03/09/2025

📰 हिंदू स्थलांतरितांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय

भारतामध्ये स्थलांतर करून आलेल्या हिंदू धर्मीय नागरिकांसाठी केंद्र सरकारने महत्वाचा दिलासा दिला आहे.
ज्या हिंदू स्थलांतरितांनी ३१ डिसेंबर २०२४ पूर्वी भारतात प्रवेश केला आहे, त्यांना आता भारतात राहण्यासाठी पासपोर्टची गरज भासणार नाही.

⭕🚦 वाहतूक नियंत्रण अधिसूचना 🚧दि. २९ ऑगस्ट २०२५ ते ३ सप्टेंबर २०२५ दरम्यानआनंदनगर सिग्नल (ठाणे-घोडबंदर रोड) येथे मेट्रो ल...
29/08/2025

⭕🚦 वाहतूक नियंत्रण अधिसूचना 🚧

दि. २९ ऑगस्ट २०२५ ते ३ सप्टेंबर २०२५ दरम्यान
आनंदनगर सिग्नल (ठाणे-घोडबंदर रोड) येथे मेट्रो लाईन ४ च्या रेल्वे ट्रॅकवर ६ कोच बसविण्याचे काम करण्यात येणार आहे.

🛑 नागरिकांना विनंती आहे की, या काळात पर्यायी मार्गांचा वापर करावा व वाहतूक कोंडी टाळावी.

Address

Thane

Alerts

Be the first to know and let us send you an email when Democratic India News posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Democratic India News:

Share