Pradnya's authentic goan recipes and masala's

Pradnya's authentic goan recipes and masala's Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pradnya's authentic goan recipes and masala's, Advertising/Marketing, Thane.

.this page helps u know about my journey,my products and my goan saraswat cuisine recipes...for my product booking u can WhatsApp me on 8975151922 or call me on 7738813444...

HelloGoan. Authentic  online cooking classes ..Classes will start from 13th sept..Since many prefer classes in marathi ....
17/08/2022

Hello
Goan. Authentic online cooking classes ..

Classes will start from 13th sept..
Since many prefer classes in marathi ..So it will b marathi only.

*Fees will be 500 rs per dish /class

* It will be twice in week
Tuesday and Saturday.
Tuesday will be veg dish and saturday non veg dish..

* Ingredients required will be informed 1or 2 days in advance incase if u want to prepare along with me..

* Limited seats
advance booking need to be done if interested.

* Classes will be conducted through zoom meeting..

* Schedule for September month is aa follows in case if interested you can book ur slot accordingly

13th Sept (Tuesday)..
Authentic traditional Goan veg dish Khatkhate
17th Sept(saturday)
Authentic Goan prawns curry with raddish/drumstick
20th sept(Tuesday)
Authentic Goan chanyache masala tonak
24th sept(saturday)
Authentic Goan Bangdyache(mackeral) spicy aambot tikhat
27th sept(Tuesday)
Goan traditional sweet dish Mangane

Pl note all tips and minute details will be given while teaching with proper measurements

Do forward to ur relatives and friends ..if interested book ur slot in advance
Online payment ..

  RECIPES  post  Traditions and Customs #पातोळी रेसिपीश्रावण महिन्यात निसर्गाचं रूप आणखी  बहरून येत ..हिरवा निसर्ग  मनाल...
10/07/2022

RECIPES
post
Traditions and Customs
#पातोळी रेसिपी

श्रावण महिन्यात निसर्गाचं रूप आणखी बहरून येत ..हिरवा निसर्ग मनाला चैतन्य देत..निसर्ग आपल्याला भरभरून देतो.. .गोव्यातील महिला श्रावणात आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबासाठी श्रावणातील रविवारी सूर्याची पूजा करतात ज्याला गोव्यात"आयतार पुजणे"म्हणतात.."
शिरवड"नावाच्या झाडाला येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या पांनाना त्या दिवशी विशेष महत्व असत...या पांढऱ्या रंगाच्या पंनाना तोडून महिला गोलाकार घुमटी सारखं एकत्र जुळवून त्याला सूर्याचं प्रतीक म्हणून पूजतात
श्रावणातल्या प्रत्येक 4 किंवा 5 रविवारी काही ना काही गोड पदार्थ बनविला जातो. घरातील महिला पाटावर सुंदर रांगोळी काढून पूजा मांडली जाते. फणसाच्या आठल्या मातीच्या मडक्यात किंवा कोळशावर भाजून त्या हळदीच्या पानावर अगदी बारीक होईपर्यंत कुटतात. कोळशावर भाजलेल्या आठल्या आणि हळदीच्या पानाचा सुंदर सा वास त्या पिठाला येतो..हे तयार झालेलं पिठ सूर्य देवाला नैवद्य असतो..

पहिल्या रविवारी गोड पदार्थात मुठल्या (रेसिपी already share केली आहे); पातोळ्या हा गोड पदार्थ दुसऱ्या रविवारी;गोड अन्न ही खीर तिसऱ्या रविवारी तर गोड पोळे हे पदार्थ बनवले जातात(प्रत्येक घरी पदार्थात फर बदल असू शकतो)

पातोळ्या

Stuffing साठी
1 कप ओल खोबर;3/4 कप किसलेले गूळ..कढईत बारीक flame वर मेल्ट करून घेणे.मिश्रण एकदम ड्राय झाल्यावर त्यात वेलची पूड घालणे..

Batter साठी
1 कप पाणी त्यात तूप आणि मीठ घालुन गरम करून घ्यावे..त्यात 1 कप तांदूळ पिठी घालून बारीक flame वर शिजवून घ्यावे(2/3 minutes)..5 मिनिट्स कवर करून ठेवावे..नंतर आणखी थोडे पाणी आणि थोडस तेल घालून batter सैल करावे म्हणजे ते हळदीच्या पानावर व्यवस्थित spread करता येईल..

हळदीचे पान व्यवस्थित धुवून ..ओल करून घ्यावं ..पाहिजे असल्यास तुम्ही लहान घेऊ शकतात त्यावर batter व्यवस्थित spread करावं.. ओले हात करून व्यवस्थित batter हलक्या हाताने घ्यावं..
Batter पातळ spread करावे..stuffing करावं आणि सगळ्या बाजूने थोड पाणी लाऊन सील करून घ्यावं..

Steamer मध्ये पाणी गरम करून घ्यावे ..सगळ्या पातोळ्या अलगद ठेवून 20/30 मिनिट वाफवून घ्यावा..10 मिनिट गार होवू द्याव्या..आणि मग सर्व्ह कराव्या..तव्यावर तुपात भाजून सुद्धा ह्या पातोळ्या छान लागतात...
लवकरच ही रेसिपी माझ्या you tube channel वर दाखवीन ..

माझी. रेसिपी माझ्या नावा सकट शेअर करण्यास माझी हरकत नाही..🙏

देव बरे करू 🙏

प्रज्ञा शिर्वैकर
गोरेगांव मुंबई

   Recipes #रविवार ;पोळे आणि सुशेगाद गोंयकार..पूर्वी गोव्यात बहुतेक घरी रविवार असला की breakfast menu ठरलेला असायचा गरमग...
08/07/2022

Recipes
#रविवार ;पोळे आणि सुशेगाद गोंयकार..

पूर्वी गोव्यात बहुतेक घरी रविवार असला की breakfast menu ठरलेला असायचा गरमगरम पोळे;बटाटा भाजी किंवा कुठलेही तोणाक..मग सुशेगाद गोंयकार मस्त गरम गरम पोळे ;मसाला तोणाक /बटाटा भाजी आणि गरम गरम चहा .सोबत गप्पा ... आहा हा ..घरातल्या गृहिणी पण उत्साहाने गरम गरम पोळे तव्यावरून एक एक काढून द्याच्या..आमच्याकडे अजून ही माहेरी रविवारी हाच बेत असतो..आई तर मी माहेरी गेली की आवरजून रविवारी पोळ्या सोबत माझ्या आवडीचे अळसांद्याचे तोणाक बनवते..आता माहीत नाही गोव्यात किती घरी हा breakfast menu असतो ..

पोळे ...परफेक्ट बनवणे पण एक कला आहे..पोळे जितके पातळ निघतात तितकेच चविष्ट लागतात..आई शेपुचे गोड पोळे पण खूप छान बनवते..घरभर मस्त सुगंध दरवळतो.. असो..

रेसिपी..(मराठी).
3 कप तांदूळ आणि एक कप उडीद डाळ आणि एक चमचा मेथी दाणे .6 तास भिजत घालावे..नंतर पाणी घालून एकदम बारीक वाटावे..मीठ घालून रात्र भर झाकून ठेवावे..दुसऱ्या दिवशी गरम गरम.पोळे काढावे

ह्या सोबत शिळ (आदल्या दिवशी च)चिकन सुद्धा भरी लागत..माझं favourite combination ...

आज कोंकणी t पोस्ट नाही😂..

प्रज्ञा शिर्वैकर
गोरेगाव मुंबई

देव बरे करू🙏
माझी पोस्ट नवा सकट शेअर करू शकतात..

 #नीर फणसाची काप..निव्वळ स्वर्गसुख..(recipe in both Konkani and marathi)निरफणस..(Breadfruit) गोंयकाराचा जीव की प्राण ..अ...
05/07/2022

#नीर फणसाची काप..निव्वळ स्वर्गसुख..(recipe in both Konkani and marathi)

निरफणस..(Breadfruit) गोंयकाराचा जीव की प्राण ..असा क्वचितच कोणी तुम्हाला गोव्यात सापडेल ज्याला फणस आवडत नाही.. शिवराक(व्हेज)..जेवण आणि पानात खोबरेल तेलात ..आईच्या हातचा घरगुती इन्स्टंट फ्राय मिक्स लावून तळलेल्या चुरचुरीत निर्फनसाची काप..गरम गरम म्हणजे ..आहाहा ..स्वर्ग सुख...
हे इन्स्टंट फ्राय मिक्स म्हणजे आई मला हे रेडिमेड पाठवते ह्याचात सर्व add असत तांदूळ पीठ;हळद ;मिरची पावडर ;मीठ आणि आईने बनवलेलं घरगुती मसाला ..म्हणजे नुसती रोल करायची काप आणि डायरेक्ट मस्त तव्यावर..हयात सगळ फ्राय करता येते व्हेज आणि नॉन व्हेज...पाहिजे असल्यास कळवा.. फ्राय करत असताना जो मस्त सुगंध दरवळतो ना ..भूक लागलेली नसताना पण लागते ..आणि किती काप जेवण होण्या आधीच पोटात जातात ह्याचा नेम नसतो..😂😂

रविवारी आमच्याकडे नीर फणस येणार आहेत .so रविवार मेनू sorted.❤️.गोव्याहून. .ऑर्डर नोंदणी चालू आहे ..booking in full swing 😂😂..

रेसिपी(कोंकणी त)
सगळ्यात पयली निर पणस तासून ताच्यो उब्यो पातळ काप करून घेवप..हाव डायरेक्ट इन्स्टंट फ्राय मिक्स मसाला लावून फ्राय करता (सगळे आसता तातूत)

पुण तुमका मसाला लावून नाका जाल्यार तुम्ही simple फ्राय करू शकतात..

कापा करतकच तांका मीठ;मिरची पावडर आणि हळद पावडर लावपाची. बारीक रवा घेवपाचो तंतूत्त दोन चमचे तांदूळ पीठ;मिरची पावडर;हळद पावडर आणि मीठ घालपाचे..कापा व्यवस्थित तातुत रोल करून खोबरेल तेलात चुरचुरीत फ्राय करपाची( खोबरेल तेल ना जाल्यार सादे तेल वापरपाक जाता)..

देव बरे करू 🙏

रेसिपी(मराठी)

सगळ्यात आधी निरफणस तासून ..त्याच्या उभ्या पातळ काप करून घ्यायचा..मी डायरेक्ट इन्स्टंट फ्राय मिक्स मसाला लावून फ्राय करते (सगळ असत त्यात)

पण तुम्हाला मसाला लावून नको असल्यास तुम्ही simple फ्राय करू शकतात..

कापा केल्यावर त्याला मीठ;मिरची पावडर आणि हळद पावडर लावावी . बारीक रवा घ्यायचा त्यात दोन चमचे तांदूळ पीठ;मिरची पावडर;हळद पावडर आणि मीठ घालायचं..काप व्यवस्थित तातुत रोल करून खोबरेल तेलात चुरचुरीत फ्राय करायची ( खोबरेल तेल नसेल तर regular तेल वापरू शकतात )..

आवडल ना ❤️

रेसिपी आवडल्यास माझ्या नावा सकट शेअर करावी

प्रज्ञा शिरवईकार

(मी बनवलेले निर फणसाची काप)❤️

  pure veg dishes special(long post in konkani marathi with marathi repost )  post(both in marathi and Konkani)केळीच्या ...
04/07/2022

pure veg dishes special(long post in konkani marathi with marathi repost )
post(both in marathi and Konkani)

केळीच्या पानावर शिवराक जेवण

कालच्या माझ्या आंबट बटाटा पोस्टला (कोंकणी t लिहिलेल्या)उदंड प्रतिसाद मिळाला..थोड्या ग्रुप मेंबर्स ना आवडल नाही की मी कोंकणीत्त रेसिपी पोस्ट केली ..जरी request असला तरी .म्हणून मी परत रेसिपी मराठीत repost केली आणि स्पष्ट केलं की ह्याच्या पुढे रेसिपी मी मराठीतच पोस्ट करेन. तरी पण खूप मेंबर्स च्या मेसेजेस आल्या की मी कोंकणी तच लिहावं..मेसेंजर वर पण खूप मेसेजेस आल्या. Request आल्या..मग ठरवलं जर इतके माझ्या कोंकणी भाषा प्रेमी आहेत ; आणि जर मी माझ्या गोव्याच्या रेसिपीज त्या पण माझ्या आपल्या मातृ भाषेत कुठेतरी गोव्याच्या बाहेर वेगळ्या platform वर पोचवू शकते तर का नाही..थोड तरी आपल्या जन्मभूमी साठी आपण करू शकतो ना..

कोंकणी भाषिक रसिकांसाठी .

आमच्या गोव्यात जश्यो नॉन वेज डिशेस फामादआसत तश्याच व्हेज सुद्धा.
आता रोकडोच श्रावण म्हायनो येतलो आनी हाव आमच्यो गोयच्यो रेसिपीज पोस्ट करतलेच
तर माका खरेच अशे दिसता शिवराक जेवण जितले सोबीत केळीच्या पानावर दिसत तितले स्टीलच्या ताटानी दिसना..एक वेगळीच feel येता..
जरा आमच्या गोयच्या शाकाहारी जेवणात ..खूपशे पदार्थ फामाद आसात

* रोस..

टोमॅटो सार
वरण ताच्या वयर तूप
चण्याचो रोस
डाळी तोय
डाळीची रोस तेफळा घालून(सांगो; मुळे; भेणे;मुंडल्यो ;भिकणा घालून)

*ग्रेवी डिशेस

खतखते
मुगागाठी
तोणाक

भाजी
खयची भाजी शिवराक करू येता

गोडशे
पातोळ्यो
मुठले
सुकुर उणे
पायस
मणगणे
शेवया खीर

आणि भरपूर शिवराक पदार्थ आसात .. जशे सासव; आमाड्याची करम;ऋषीची भाजी; उडीद मेथी;
नाल्लाचो गोड रोस ; हिट; शिरवळ्यो.. कापा ;निर फणसाची भाजी ......लिस्ट goes on..

रेसिपी हाव पोस्ट करतलेच..आज म्हले तुमका रूच हाडची😂...
देव बरे करू🙏

पोस्ट नावासकट पाहिजे असल्यास शेअर करावी

प्रज्ञा शिरवईकार
गोरेगांव मुंबई

Repost (marathi)
आमचा गोवा जसा नॉन वेज डिशेस साठी नावाजलेला आहे तसाच व्हेजसाठी सुद्धा
आता लवकरच श्रावण महिना येणार आनी मी आमच्या गोव्याच्या रेसिपीज पोस्ट करनारच
तर माझं अस प्रामाणिक मत आहे की शाकाहारी जेवण जितk सात्विक आणि सुंदर केळीच्या पानावर दिसत तितक स्टीलच्या ताटात दिसत. नाही एक एक वेगळीच feel येते..
जरा आमच्या गोव्याच्या शाकाहारी जेवणात ..खूपशे पदार्थ नावाजलेले आहेत

* रोस..(आमटी)

टोमॅटो सार
वरण ताच्या वरती तूप
चण्याची रोस
डाळी तोय
डाळीचा रोस तेफळा घालून(सांगो; मुळे; भेणे;मुंडल्यो(अरवी) ;भिकणा (फणसाच्या आठळ्या) घालून)

*ग्रेवी डिशेस

खतखते
मुगागाठी
तोणाक

भाजी
खयची भाजी शिवराक करू येता(कुठलीही भाजी शाकाहारी करता येते)

गोडशे(गोड पदार्थ)
पातोळ्यो
मुठले
सुकुर उणे
पायस
मणगणे
शेवया खीर

आणि भरपूर शिवराक पदार्थ आहेत .. जशे सासव; आमाड्याची करम;ऋषीची भाजी; उडीद मेथी;
नाल्लाचो(नारळाचा) गोड रोस ; हिट; शिरवळ्यो.. कापा ;निर फणसाची भाजी ......लिस्ट goes on..

रेसिपी मी पोस्ट करणारच..आज विचार केला तुमच्या तोंडाला पाणी आणुया 😂...
देव बरे करू🙏

माझी पोस्ट माझ्या. नावासकट शेअर. करावी🙏

मी बनवलेलं गोव्याच्या शाकाहारी(व्हेज ) जेवण

04/07/2022

Recipes
#आजीची स्पेशल रेसिपी..(कांदा घालून डाळीची आमटी/रोस)

काही पदार्थ आपल्याला खूप जवळचे असतात.तशी माझी आजी मला खूप जवळची होती आणि अर्थात तिला मी..तिच्या हातचा प्रत्येक पदार्थ मला खूप आवडायचा..मग ती साधी लाल माठची भाजी सुद्धा..अशीच एक आमटी मला जी खूप आवडायची ती म्हणजे कांद्याची फोडणी घालून डाळीची आमटी..तशी ही आमटी आमच्या फॅमिली त खूप नावांनी ओळखली जाते..माझी आत्याची मुल जेव्हां मुंबईहुन सुट्टीत आमच्याकडे गोव्यात यायची तेव्हा ही आमटी आजी खास बनवायची सोबत सुकट बांगड्यांची किस्मुर..खूप छान लागते..म्हणून त्यांनी ह्याला मामाईची आमटी अस नाव दिलं आहे ..आम्ही ह्याला डाळीचो रोस(आमटी).. म्हणतो..खूप अप्रतिम लागते..बस गरम गरम भात आणि ही आमटी ..सोबत भाजलेला पापड/बटाट्याच्या कचऱ्या(काप)आणि नॉन व्हेज खात असाल तर सुकट बांगड्यांची किसमुर किंवा तळलेल्या माशाचा तुकडे अप्रतिम मेनू...

रेसिपी
प्रथम तुर डाळ चांगली धुऊन ..कुकर मध्ये शिजवून घेणे..
सुके धणे बारीक flame वर तेला शिवाय असेच खरपूस भाजून घेणे.
ओल खोबर;मिरची पावडर(मी आमच्या गोव्याचा मिरची पावडर वापरते);हळदी पावडर;भाजलेले धणे आणि थोडीशी चिंच आणि थोड पाणी घालून बारीक वाटून घेणे .
हे वाटण शिजवलेल्या डाळीत घालणे..मीठ घालणे..बारीक गॅस वर उकळी येऊ देणे..गॅस बंद करणे.

फोडणी: बारीक चिरलेला कांदा तेल बारीक flame वर खरपूस होई पर्यन्त saute करणे..आणि मग ही फोडणी डाळीत ओतणे..मस्त चरर अस आवाज येयला पाहिजे..मस्त..

नक्की करून पहा..व्हिडिओ लिंक पाहिजे असल्यास शेअर करेन..

खरच थोड्या डिशेस खूप simple असतात..पण तेवढ्याच चविष्ट..जेव्हा जेव्हा मी ही आमटी बनवते तेव्हा तेव्हा त आजीची आठवण आल्याशिवाय राहत नाही..❤️

प्रज्ञा शिर्वाईकर
गोरेगांव मुंबई

 #गोवा मनसून स्पेशल #पावसाळी  डिशेसखरतर मी स्वतःला खरच भाग्यवान समजते..की iam born and brought up in Goa.. आता कामा निम्...
04/07/2022

#गोवा मनसून स्पेशल

#पावसाळी डिशेस

खरतर मी स्वतःला खरच भाग्यवान समजते..की iam born and brought up in Goa.. आता कामा निम्मित मुंबईत राहावं लागत खर पण असा एकही दिवस जात नाही की गोव्याची आठवण येत नाही...गोवा आणि निसर्ग हे समीकरण तर जग प्रसिद्ध आहे..गोव्याला निसर्गाची देणगी देवाने दिली आहेच ..पाऊस पडल्यावर तर गोव्याच्या निसर्गाचं रूप आणखीच बहरून येत(मराठी माझी जरा कच्ची आहे आता ते तुम्हाला पाठ झालं असणार )..असो पण गोवा हा विषय आला की भरभरून बोलावस अस वाटत.. आता खास अश्या गोव्यातल्या पावसाळी डिशेस बद्दल..तसा आपला गोव्यात खवय्यांसाठी भरपूर ऑप्शन्स असतात..आणि पावसाळ्यात तुम्ही गोव्यात गेलात तर आवर्जून तुम्ही टेस्ट कराव्याच अस माझं प्रमाणिक मत..

*रोस ऑमलेट..
मस्त जोरात पावसात .हे गोव्याचे स्ट्रीट फूड नक्की taste करा..ते पण कुठे .तर रस्त्याच्या कडेला ..छोटे गाडे असतात....तुम्ही घरी पण बनवू शकतात..मी आता मुंबईत घरीच बनवते ..मी बनवलेल्या रोस आम्लेट चा फोटो खाली दिला आहे..रेसिपी नंतर देते..नाही ते पोस्ट आणखी मोठी होईल ..

*मिरची भजी;पाव आणि चण्याची भाजी/रस्सा..

पावसातच नाही तर हा 12 ही म्हयने गोव्याचा अप्रतिम ब्रेकफास्ट ज्याला जगात कुठेही तोड नाही . मस्त पाऊस आणि गरम गरम मिरची भजी. आणि तोररद (कडक)पाव;buns आणि गरम वाफाळलेला चहा...निव्वळ स्वर्गसुख .

*अळम्याचे तोणाक..(local mushroom masala)
गोव्यात जुलै च्या आसपास अळमी म्हणजेच लोकल mushroom मिळतात.. खूपच चविष्ट आणि आप्रतीम ..ही एक तर फ्राय करतात किंवा मसाला gravy बनवतात..एकदा नक्कीच टेस्ट करा याची चव जीभेवर जाऊन रेंगाळत राहील..ही खात्री.मी तर खूप मिस करते..

पोस्ट जरा मोठी झाली .तश्या आणखी भरपूर डिशेस आहेत..आमचं गोवा आहेच..सुंदर..ती हिरवळ ;तो पाऊस..आता आमचं ते पूर्वीच नळ्यांच घर नाही आहे. तो पाऊस वेगळा होता...आता फक्त राहिल्या त्या आठवणी ..

पोस्ट हे शेयर करायची असल्यास माझ्या नावासकट शेअर करावी..

प्रज्ञा शिर्वैकर
गोरेगांव मुंबई

  recipes #आंबट बटाटा..(खास कोंकणी भाषिक रसिकांसाठी कोंकणी मध्ये)सुटल ना तोंडाला पाणी..हो हो गोव्याची अशीच एक अप्रतिम डि...
04/07/2022

recipes
#आंबट बटाटा..(खास कोंकणी भाषिक रसिकांसाठी कोंकणी मध्ये)

सुटल ना तोंडाला पाणी..हो हो गोव्याची अशीच एक अप्रतिम डिश आहे..जी तुम्ही नुसती पण खाऊ शकतात .काही देवकार्य असेल तची रस्सा भाजी म्हणून ह्या डिश ला मानाच स्थान प्राप्त होते. उपवासाला चालणारी अशी ही डिश आंबट बटाटा. सोपी तितकीच चविष्ट अशी ही डिश...आम्हा सारस्वतांमध्ये आवर्जून बनवलेली जाणारी..ह्या डिश मध्ये तुम्हाला सगळी चव मिळेल कडवटपणा;तिखटपणा; आंबट चव तसच गोड चव.

ही खूप सोपी रेसिपी आहे म्हणून खास कोकणी भाषिक रसिकांसाठी ..कोंकणी मध्ये..

रेसिपी
सगळ्यात पयली बटाटा च्यो उब्यो पातळ फोड्यो करून घेवच्यो..
गरम उदकात आमटाण भिजत घालप
वाटण..अर्ध्या वळ्याची सोय;मिरी; आणि सुकी कोथमीर समकी बारीक वाटून घेवप..

एका आयदनात थोडे तेल गरम करून .. तातूत थोडीशी सासवा; आर्धो चमचो मेथी;हिंग आणि कडीपत्ता घालून फोणा मारप.. बटाटाची कापा घालप.;हळद पावडर; ( half spoon)मिरची पावडर(1 and half spoon) आणि मीठ घालप..सारखे मिक्स करप आनी .इल्लेशे शिजपाक उदक घालप..वयल्यान एक ताटली धापप..
बटाट शिजतकच वाटप घालप..consistency adjust करप.. आमटाणी चे उदक घालप .. इल्लेशे गोड ..मीठ आनी जाय जाल्यार घालप.. जा आमची आंबट बटाटा भाजी(gravy) तयार .

जरूर करून पळयात..आणि कळयात..

देव बरे करू 🙏

रेसिपी नावा सकट शेअर करण्यास हरकत. नाही🙏

तुम्हाला समजेल का माहित नाही..पण जर नसेल समजली तर बिनधास्त विचारा नक्की. सांगेन.

प्रज्ञा शिरवैकर
गोरेगांव मुंबई

;

नमस्कारखास गोव्याचा पारंपरिक दिवाळी  फराळ...तुमच्यासाठी.. बनवा तुमची ही दिवाळी खास ...बुकिंग ची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर....
10/10/2021

नमस्कार
खास गोव्याचा पारंपरिक दिवाळी फराळ...तुमच्यासाठी.. बनवा तुमची ही दिवाळी खास ...बुकिंग ची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर..लिस्ट खालीलप्रमाणे..

तारवटी मिरची शेव
गोव्याचा चिवडा काजू घालून
गोव्याची खास चकली
शंकरपाळी
तिखट पोहे
चूरमा
काजू लाडू
शुद्ध तुपातले बेसन लाडू
फेनोरीं
शेव लाडू

या शिवाय खास भाऊबीज;तसेच तुमच्या प्रियजनांना भेट देण्यासाठी खास गोव्याचे खास विविध प्रकारचे लाडू बॉक्स...
बुकिंग सुरू..लवकर तुमची ऑर्डर बुक करा .
Last date of booking 20th October

बुकिंग साठी..

Whatsapp or cll 9819230388
Pradnya Shirwaikar
Goregaon Mumbai

श्री शांतादुर्गा विज्यते...आज महापंचमी स्पेशल..पुरी बटाटा भाजी;खतखते;चण्याचा रोस;भात;पापड;फ्लॉवर आणि मिरची भजी ;पापड ; श...
12/08/2021

श्री शांतादुर्गा विज्यते...

आज महापंचमी स्पेशल..पुरी बटाटा भाजी;खतखते;चण्याचा रोस;भात;पापड;फ्लॉवर आणि मिरची भजी ;पापड ; शेवयाची खीर;,आणि डाळिंब ...

Place your order for goan homemade authentic snacks..last date 3rd AugustFaral rates Tarvoti mirchi shev rs 150(200 gms)...
03/08/2021

Place your order for goan homemade authentic snacks..last date 3rd August

Faral rates
Tarvoti mirchi shev rs 150(200 gms)
Churma rs 165(250 gms)
Shev ladoo rs 180 pkt
Tikshe fov rs 200(250 gms)
Mila rs 225(250 gms
Goan special chiwdo with cashews rs 230(250 gms)
Aambade (hog plum ) sweet lonche rs 850 kg
Tarvoti mirchi papad rs 80 pkt
Triphala rs 65(100 gms
Cashew nuts ladoo rs 1500 kg
Goan home made samar masala rs 1300 per kg

Whatsapp or cll 9819230388
Pradnya Shirwaikar
Goregaon Mumbai

Address

Thane
40063

Telephone

+917738813444

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pradnya's authentic goan recipes and masala's posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share