Kirti Printlinks

Kirti Printlinks Kirti Printlinks is a leading Print House in thane catering to its clients in the area of designing, printing, advertising and branding.

अविनाश जाधव - ठाण्याच्या राजकीय वर्तुळात आपल्या बेधडक व आक्रमक शैलीमुळे  प्रसिद्ध असलेला, सामान्य ठाणेकरांच्या मनात एक ह...
21/10/2024

अविनाश जाधव - ठाण्याच्या राजकीय वर्तुळात आपल्या बेधडक व आक्रमक शैलीमुळे प्रसिद्ध असलेला, सामान्य ठाणेकरांच्या मनात एक हक्काचा माणूस म्हणून रुजलेला, तुमच्या कामासाठी चोवीस तास उभा राहिलेला आणि तुमचे काम चोवीस तासात करून देण्याची खात्री देणारा, जनसामान्यांच्या न्यायहक्कासाठी रस्त्यावर उतरणारा ठाण्यातील एकमात्र लोकप्रिय आणि डॅशिंग युवा चेहेरा. अडचणीत सापडलेला एखादा माणूस अविनाशकडे गेला आणि रिकामा परतला असं घडलेलं माझ्या नजरेत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी आज अविनाश जाधव यांची ठाणे शहर विधानसभेसाठी मनसे पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आणि त्याच्या चाहत्यांनी अक्षरशः जल्लोष केला. अनेक अडचणींनीं मेटाकुटीला आलेल्या ठाणे शहराला पूर्वपदावर आणण्यासाठी ज्या धडाडीच्या नेतृत्वाची गरज आहे ते नेतृत्व देण्याची क्षमता असलेला माझा लाडका 'नेता' अविनाश जाधव उद्या या शहराचा 'आमदार' असेल याची आम्हा सर्वाना खात्री आहे. ठाणेकर मतदारांनी दिलेल्या संधींचं सोनं करण्यासाठी अविनाश जाधव नेहेमीच कटिबद्ध असेल याची ग्वाही त्याच्याबरोबर काम करणारा प्रत्येक पदाधिकारी देईल. तरुणांच्या गळ्यातला ताईत असलेल्या या लोकप्रिय नेत्याला या निवडणुकीत भरभरून यश मिळो हीच आई एकविरेचरणी प्रार्थना. जय महाराष्ट्र !

रिक्षावाला म्हटला की तो तुम्हाला नकार देणार, जास्त भाडे वसूल करणार, उर्मट बोलणार, कोणाशीतरी फोनवर बोलत राहणार, सुट्ट्या ...
24/09/2024

रिक्षावाला म्हटला की तो तुम्हाला नकार देणार, जास्त भाडे वसूल करणार, उर्मट बोलणार, कोणाशीतरी फोनवर बोलत राहणार, सुट्ट्या पैशावरून कटकट करणार - म्हणजे यातलं काहीतरी एक नक्कीच करणार. पण प्रत्येक गोष्टीला एक अपवाद असतोच आणि तुम्ही खूपच नशीबवान असाल तर तुम्हाला तो स्पेशल रिक्षावाला भेटतोच. ज्या जगात कोणाला तुमच्या आयुष्याशी देणंघेणं नाही, तुमच्या मनातल्या ताणतणावाची जाणीव नाही त्याच जगात तुमचा विचार करणारा, एखाद्याच्या गेलेल्या दृष्टीचा विचार करणारा, निसर्गसंपदेच्या विनाशाने संकटात असलेल्या सृष्ट्टीचा विचार करणारा आणि हे करताना स्वतःच्या खिशाला चाट देऊन तुम्हाला आनंद देणारा एक हसतमुख रिक्षावाला या जगात आहे... मुख्य म्हणजे तो आमच्या ठाण्यात आहे.

संजय शुभांगी जगन्नाथ वरणकर नावाचा हा सज्जन रिक्षाचालक माणुसकीचा झरा आहे असंच समजा. रुग्णाकडून पैसे घेत नाही, अपंगाकडून पैसे घेत नाही वगैरे ठीक आहे - पण तुम्हालासुद्धा याच्या रिक्षात मोफत प्रवास करण्याची संधी रिक्षातील एका डब्यात ठेवलेल्या एका लकी ड्रॉ द्वारे देतो हे पाहूनच गंमत वाटली. रिक्षात झाडे आहेत, सुविचार आहेत, पोलिसांचे नंबर आहेत, सामाजिक संदेश आहेत, हळद कुंकवाचा करंडा आहे इतकच नाही तर तुम्ही गुटखा वगैरे न खाता एखादी चांगली गोष्ट खावी म्हणून एक डबाभर खाऊ पण आहे - तोही मोफत. रिक्षाच्या मागे सिग्नल्स चा अर्थ लिहिलाय. मी म्हटलं हे कोणासाठी तर म्हणाले लाल सिग्नलला उभे असताना मागे जो टॅ टॅ करत हॉर्न वाजवत राहतो त्याच्यासाठी. जेव्हा यांची रिक्षा समोर आली तेव्हा वाटलं यांच्या लहान मुलांनी ही रिक्षा सजवली आहे पण नंतर समजलं की संजयभाऊ स्वतः उत्साही असल्याने ही क्रिएटिव्हिटी त्यांचीच होती. नौपाड्याला एका हॉस्पिटलच्या बाहेर रुग्णाची वाट पाहत असल्याने त्यांच्याकडे वेळ होता - मला पण कुतूहल होते म्हणून यांच्याशी छान दहा मिनिटे गप्पा मारता आल्या. त्या दहा मिनीटात आपली दुःख विसरून दुसऱ्याचा विचार करत आनंदाने कसं जगायचं हे शिकवणारा हा रिक्षावाला आवडला बाबा आपल्याला... बघा कधी भेटतोय तुम्हाला !

22/10/2022
11/01/2022

With variety of products and print services Kirti Printlinks Thane is here to offer you the best quality printing for all your commercial needs.

Address

Ramkrishna Chs, Opp CKP Hall, Kharkar Lane
Thane
400601

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm

Telephone

+912225446949

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kirti Printlinks posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Kirti Printlinks:

Share