22/07/2020
*श्रमजीवीच्या आक्रमक भूमिकेमुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची उडाली तारांबळ*
*तब्बल सात महिन्यांच्या पाठपुराव्यानंतर जीर्ण झालेला विजेचा खांब बदलला*
*वसई / दिनांक 22 जुलै*
वसई तालुक्यातील टोकरे- खैरपाडा ग्रुप ग्रामपंचायतीमधील मौजे सामंत पाडा येथे गेल्या अनेक वर्षा पासून जीर्ण झालेल्या विजेच्या खांबापासून गावाला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे सदर वीजेचा खांब बदलण्यासाठी गावकऱ्यांनी अनेक अर्ज विनंत्या करूनही महावितरण कंपनीकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर श्रमजीवी संघटनेच्या आक्रमक भूमिकेमुळे आणि निर्वाणीचा इशाऱ्या मुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आणि जीर्ण झालेला विजेचा खांब अखेर बदलला. त्यामुळे सामंत पाडा ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण असून याबाबत त्यांनी श्रमजीवी संघटना व सतत पाठपुरावा करणारे *विलास मोरघे*(का.सचिव,श्र.का.संघटना) यांचे आभार मानले आहेत.
सामंत पाडा येथे गेल्या अनेक वर्षा पासून जीर्ण झालेल्या विजेच्या खांबापासून गावाला धोका निर्माण झाला होता. या खांबामुळे गावातील माणसांना, लहान मुलांना, पाळीव प्राण्यांना कधीही अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा अर्ज विनंत्या करूनही महावितरणकडून या गंभीर विषयाकडे लक्ष दिले जात नव्हते. मात्र सध्या पावसा मुळे हा खांब आणखीनच धोकादायक बनल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे श्रमजीवी कामगार संघटनेचे का.सचिव श्री. विलास मोरघे यांनी स्वतः जबाबदारी घेऊन संबंधितांशी फोन करून आक्रमक भूमिका घेत महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांलअधिकाऱ्यांला धारेवर धरले आणि "दोन दिवसांत जर विजेचा खांब बदलला नाही तर तुमच्या कार्यालयात घुसून आंदोलन करण्याचा निर्वाणीचा इशारा दिला." विलास मोरघे यांच्या इशाऱ्या मुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आणि तातडीने जीर्ण झालेला विजेचा खांब बदलला. वीजेचा खांब बदलण्यात आल्याने गावात असलेले भीतीचे वातावरण जाऊन पुन्हा एकदा आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी पालघर जिल्हा परिषदेचे सदस्य व श्रमजीवी संघटना वसई ता. सचिव श्री गणेश उंबरसाडा, पालघर तालुका अध्यक्ष दिनेश पवार यांनी सतत पाठपुरावा केला. तर, वीजेचा खांब लावत असताना घटनास्थळी विलास मोरघे(का.सचिव,श्र.का.संघटना), सुदाम दळवी, अंकुश बुजड व इतर ग्रामस्थ यांनी उपस्थित राहून काम करून घेतले. *हा प्रश्न सोडवला म्हणून सर्व ग्रामस्थांनी संघटनेचे व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.*