02/07/2026
परमपूज्य श्री श्री श्री १००८ केदारनाथ रावल जगद्गुरू श्री भीमाशंकर लिंग महास्वामीजी, केदारपीठ जगद्गुरू वीरशैव-लिंगायत समाजातील आद्यपंचाचार्य पिठाधीश यांच्या समवेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली.याप्रसंगी नांदेडचे श्री.किशोर स्वामी तसेच श्री. विनय कोरे हे देखील उपस्थित होते.
यावेळी परमपूज्य महास्वामीजींनी देवेंद्रजींना आशीर्वाद देत, पुढील वर्षी मे महिन्यात केदारनाथ येथे होणाऱ्या केदारनाथ मंदिर कपाट (दरवाजा) उद्घाटन सोहळ्याच्या भव्य कार्यक्रमासाठी सस्नेह निमंत्रण दिले.
या भेटीदरम्यान लिंगायत समाजाच्या विविध प्रश्नांवर, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक उपाययोजना तसेच शैक्षणिक, सामाजिक व धार्मिक विषयांवर सविस्तर व सकारात्मक चर्चा करण्यात आली. लिंगायत समाजाच्या हितासाठी शासनाने संवेदनशील भूमिका घेऊन उर्वरित महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.